फू बाय फू...फुगडी गं फुगडी.

Submitted by सुधाकर.. on 7 September, 2012 - 07:02

मित्रांनो गौरी गणपतीच्या सणासाठी सदा उत्साहीत असलेल्या मायबोलीकरानां एक फुगडी गाणे देत आहे. खेळा.....!
--------------------------------------------------------------------

फू बाय फू... फुगडी गं फुगडी

कविता गझला झाल्या नुसत्या बेगडी गं बेगडी
काय करावे मला कळेना, कसे वाचावे मला कळेना
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी ----------॥१॥

जशी नेसावी नवंवधूने रोज नवी नवीच लुगडी
तशा या गझला तशा कविता रोजच येती घडोघडी
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी ----------॥२॥

एकच असतो गोमटा पण माबोलीवर किती आयडी
नेम नाही इथे कुणाचा कधी कुणाची फिरेल गाडी
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी ----------॥३॥

झुक झुक झुक झुक फिरते शब्दांची ही रेलगाडी
काय सांगावे कधी इथे उडेल कुणाची रेवडी
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी. -----------॥४॥

प्रतिसादाच्या अंगणी कुणी रोज घालते लंगडी
शब्दांच्या मग झाडून फैरी राख सांडते शेगडी
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी. -----------॥५॥

फू बाय फू... फुगडी गं ....फुगडी गं ....फुगडी गं....... फुगडी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांत माझी कविता फक्त तुलाच भावली. विषेश आहे. Happy या जगात सत्याला सामोरे जाणारे लोक फार कमी आहेत नै?

क्या बात है| Happy भारतीजी, आपल्याला ही कविता आवडेल असे वाटले न्हवते. ---- धन्यवाद.

मोहीने ...... तुझा तो बावळट जिम्या नुसता टाळ्याच का पिटतोय?

--------------- तू दारू पिऊन कविता वाचतेस का त्याच्या समोर? त्याला पण थोडी दे म्हण्जे मग तो बरोबर फुगडी खेळेल. Lol म्हणे झ्याकै, अजून लिही. कशाला? ... नुसत्याच बावळटावाणी टाळ्या पिटायला?