हटकून येते सर वळीवाची

Submitted by Kiran.. on 7 September, 2012 - 14:41

हळदीने तू भरलेली गं,
नेसशील शालू हिरवा
राहिलो मी भाग्यफाटका,
आडात घुमतो जसा पारवा

तुझेच पैंजण छुमछुमते अन
हासणे मनी खळाळते
हुरहुरणा-या संध्याकाळी,
उरतो अजुनी नभी मारवा

हात दिले तू हातात परक्या,
नजर परकी मलाच माझी
हटकून येते सर वळीवाची,
मनात भरतो निळागारवा

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काव्य गंडले हो किरण.

अळवाची सर म्हणजे नेमके काय? 'वळीव' माहिती आहे.

>>>हळदीने तू भरलेली गं,
नेसशील शालू हिरवा
राहिलो मी खिसाफाटका,
आडात घुमतो जसा पारवा<<<
'हळदीने भरलेली' हे पोत्यात / पिशवीत भरलेली या अर्थाचे वाटते. हिरव्या शालूत गुंडाळलेले हळदीचे पोते नजरेसमोर आले. 'जसा' या शब्दामुळे पारव्याचा संबंध 'खिसाफाटक्या'शी जोडल्या जातो. समजा रिकामटेकडा पारवा आडात घुमलाच, तर त्याचा फाटक्या खिश्यांशी काय संबंध?

>>हात दिले तू हातात परक्या,
नजर परकी मलाच माझी
हटकून येते सर अळवाची,
मनात भरतो निळागारवा<<
आडात घुमणार्‍या पारव्याला सोडून ती परक्याला आपलेसे करून गेली याचा हटकून 'अळवाची' सर येण्याशी संबंध अनाकलनीय आहे. निळा रंग उदास मनाचे प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न असल्यास गारवा कशाबद्दल आहे? काही कळले नाही.

काहीच नाही Happy असाच आपला टीपी Wink

खवटुन्निसाब्वा
आपण एक आदरणिय महिला आहात. आम्ही आपणास निराश केले याचा अत्यंत खेद वाटतो. आपल्याला आवडेल, रुचेल आणि पटेल अशी एक मार्केट यार्डातील छंदमुक्त गझल घेऊन येण्याचा लवकरच प्रयत्न केला जाईल याबद्दल आश्वासन देण्यात येत आहे. सध्या तरी ज्या डोक्यावर आपण मार्केट यार्डात पोती उचलायची त्याच डोक्याने आपण उपमा वगैरे प्रकारांवर विचार करण्यात आपले डोके "वाया" घालवू नये ही नम्र विनंती. आपल्यासाठी इथे अनेक गद्य गझला टनाने अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत तिकडे तुमची गंभीर सॅडीस्टिक फुगडी* घालावी.

खुमखुमीच असेल तर मग....

वेडी

एका ढगाला कुशीत घेऊन झोपली,तेव्हा तिला गर्भ राहिला.
पुढे सर्व सुरळीत झाले.आपल्या घरातील मातीचे मडके
मनमुराद फोडून ती देहान्ताच्या यात्रेला निघाली.
वाटेत तिला गाढव भेटले,तिने त्याची समार्म्भपूर्वक पूजा केली.
धुपाटण्यांतला उरलासुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली,
"ह्याचीसुद्धा राख होती तर कोणाला काय सांगणार होत्यें?
पण दैव शिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढें जाते."
नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली;आणि म्हणाली,

"आता मी कूणाचे काही लागत नाही,पौर्णिमीवढेहि".
पुढे सर्व सुरळीत झाले(हे मागे सांगितलेच आह.े)
वेडीला वीज झाली;आपले स्तन विजेला देऊन
वेडी आपली पुढे गेली;वाटेमध्ये विदूषक भेटला;
राजा भेटला,राणी भेटली;’अ’ भेटला,’ब’ भेटला;
पण वेडी शहाणी होती;तिने कोणालाच ओळखले नाहीं.

या कवितेची समिक्षा करावी ..कुठल्याही आयडीने Rofl

या कवितेची समिक्षा करावी ..कुठल्याही आयडीने >>>>व्हय बा,जे काय करायच ते रिया बाईच करतिल,किरण्याची कविता पडली की ही बाई पयलीच अस्ते बघा,म्या पयली,म्या पयली करत,बाकी कवितेबद्द्ल रियाबाईनी चांगलि म्हणल्यावर आमची काय हिंमत राव ,वाईट म्हणायची.

मकरंदभौ

गंमत सांगतो. काल एका आयडीला मेल केला. द्स-याच आयडीने त्यातले संदर्भ घेऊन माझ्या एका कवितेवर खवट प्रतिसाद लिहीला . आहे कि नाही जादू ? हसा बरं मग Rofl सदानकदा आपलं आंबट चेहरा Wink

मकरंददादा तुम्ही पण लिहा की चांगल्या चांगल्या कविता..मी वाचल्या वाचल्या लगेचच प्रतिसाद द्यायला येईन.
अर्थात चांगली असेल तरच हं! फुटकळ गोष्टींचा उदो उदो करायची सवय मला नाही.
तेंव्हा इथे टाईम वेस्ट नका करू
पटकन छानशी कविता लिहून काढा की लगेच साक्षात रियाबाई येतील हो तिथेही प्रतिसाद द्यायला
बाय द वे कोणाचही कोणतंही लिखाण शोधून दाखवा ज्यावर मी "मी पहिली, मी पहिली" अशी प्रतिक्रिया दिलीये
सापडलं तर मग बोलूयात पुढे
नाही सापडलं तर मात्र आधी आयड्यांचा अभ्यास करा आणि मग प्रतिसाद द्या बर! Happy
आणखी एक महत्वाची गोष्ट ! मी तुमच्याशी बोललेलेही नसताना माझ्या आयडीचा उल्लेख करून शक्यतो बोलणं टाळाच!

व्वा ! अप्रतिम !

<<<<आपल्याला आवडेल, रुचेल आणि पटेल अशी एक मार्केट यार्डातील छंदमुक्त गझल घेऊन येण्याचा लवकरच प्रयत्न केला जाईल याबद्दल आश्वासन देण्यात येत आहे. सध्या तरी ज्या डोक्यावर आपण मार्केट यार्डात पोती उचलायची त्याच डोक्याने आपण उपमा वगैरे प्रकारांवर विचार करण्यात आपले डोके "वाया" घालवू नये ही नम्र विनंती. आपल्यासाठी इथे अनेक गद्य गझला टनाने अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत तिकडे तुमची गंभीर सॅडीस्टिक फुगडी* घालावी.>>>>

जिथे-तिथे गझलेवर असबंध टीका का ?

-सुप्रिया.

थांब लिटल जिमी थांब, नको देऊस जीव. अरे पुन्हा पुन्हा हा जन्म नाही मिळत. नाही लिहिणार किरणू यापुढे काही, मी सांगते त्याला समजावून. काय म्हणालास? पारवा मारवा गारवा ही यमक देवमामांकडन ढापली आहेत त्याने? अरे असूदेत. तो प्रयोगशील कवी आहे. मराठी माणसांनी मराठी माणसांकडन यमक नाही घ्यायची तर कोणाकडून घ्यायची मग बेटा?

सुप्रियाजी

या कैतेखालचा पहिला आणि मोठ्ठाला प्रतिसाद दिसला असेलच आपल्याला Biggrin म्हणूनच असंब्द्ध असं काहीच नाही. प्रत्यक्षात मी गझलवेडा आहे म्हणूनच एल्गारची कॉपी मित्रांना भेट म्हणून देत असतो. ज्ञानेशची गझल सर्वात आधी वाचतो. वैभव जोशींच्या गझला मिळतील तिथून वाचतो. भीमराव पांचाळेंच्या कॅसेट्स, सीडीज ऐकतो. इलाही जमादारांच्या गझला मिळवून वाचतो..

तुमचा इथे काहीच संबंध नाही . Light 1

तुमचा इथे काहीच संबंध नाही .>>>>

अर्थातच ! माझा फक्त गझलेवरच्या असंबंध टीकेशी घनिष्ठ संबंध आहे .

बाकी कुणाशीच वा कशाशीच नाही

माफ करा. असं किमान तुमच्या अन्यत्र असलेल्या बेछूट प्रतिसादातून जाणवलेलं नाही. आणि इथे तर अजिबात संबंध नाही त्याचा. मुळात इथे गझलेवर टीका नाहीच. तुम्हाला ते एक्स्प्लेन केलेलं आहे.

<<<माफ करा. असं किमान तुमच्या अन्यत्र असलेल्या बेछूट प्रतिसादातून जाणवलेलं नाही.>>>

जोक अपार्ट...इथे काही आणी मेलमधे काही असल एक्स्प्लेन करण थांबवा किरण.

मी ही थांबतेय इथेच .

-सुप्रिया.

किरण, माझ्या प्रतिसादानंतर तुम्ही मूळ कवितेत 'अळवा'चा वळीव केलेला आहे. नंतर ४ ते ५ वेळा एडिट करून, टोकदार पोस्ट तयार करण्यापूर्वी तेवढे एक योग्य केले. तुमचे कोणाशी व्यक्तीगत वैर आहे याच्याशी मला अजीबातच देणेघेणे नाही. तुम्ही कविता लिहून प्रसिध्द केलीत, मी वाचली, जे समजले नाही त्यावर भाष्य केले. माझा आणि तुमचा कुठल्याही आयडीने संपर्क झालेला नाही, किंवा माझे आणि तुमचे व्यक्तिगत हेवेदावे नाहीत. तुम्ही मला कुठला आयडी समजून चालत आहा हे मला माहिती नाही. त्याचा येथे संबधही नाही. तेव्हा कृपया, >>>सध्या तरी ज्या डोक्यावर आपण मार्केट यार्डात पोती उचलायची त्याच डोक्याने आपण उपमा वगैरे प्रकारांवर विचार करण्यात आपले डोके "वाया" घालवू नये ही नम्र विनंती. आपल्यासाठी इथे अनेक गद्य गझला टनाने अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत तिकडे तुमची गंभीर सॅडीस्टिक फुगडी* घालावी.<< ही असली व्यक्तीगत विधाने टाळावी. मी अत्यंत सभ्य शब्दांत लिहिते आहे. तुम्ही देखिल ते भान सोडू नये ही विनंती. मी कुठे प्रतिसाद द्यावा हा पूर्णतः माझा निर्णय आहे.

तुमच्या प्रतिसादाला समर्पक असेच उत्तर आहे ते. सभ्य प्रतिसाद देताना पोत्याची आठवण येणे आणि विचित्र नावाने प्रतिसाद देणे हे समजण्यापलिकडचे आहे. ख-या नावाने द्या कि प्रतिसाद. २ वर्षे ४४ आठवडे जुनी प्रोफाईल (म्हणजे बिफोर ख्राईस्ट नाही. माबोवर खूप महत्वाचं आहे ते Rofl ). एकही विपु नाही. अद्याप लेखन नाही. कुठेच प्रतिसाद नाही. सबकुछ तो सामने है.
कविता एडीट केलीये ती तुमच्या प्रतिसादामुळे नाही तर दुस-या कुणाच्या सुचवणीमुळे,

>>>कविता एडीट केलीये ती तुमच्या प्रतिसादामुळे नाही तर दुस-या कुणाच्या सुचवणीमुळे,<<<<
बरे तर. तसेच असेल.

>>'हळदीने भरलेली' हे पोत्यात / पिशवीत भरलेली या अर्थाचे वाटते. हिरव्या शालूत गुंडाळलेले हळदीचे पोते नजरेसमोर आले.<<
या वाक्यांत काहीही असभ्य नाही. माझ्या आयडीच्या नावाशी तुम्हाला काही घेणेदेणे असू नये. अजीबातच वैयक्तिक लिहायचे नव्हते, परंतू तुमच्या रागीट आणि तिरसट प्रतिसादांतून 'हाताबाहेरची केस असल्यासारखे वागणे आहे' असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.

हाताबाहेरची केस असल्यासारखे वागणे आहे

Rofl

खवटुन्निसा.. तसं असेल तर थोडी कळ सोसा. हा काय प्रकार आहे त्याचा मस्त मजेमजेत खुलासा होईलच. सध्या प्रवासात आहे. हे असे आयडी काढून पराक्रम करण-यांना एक लेख अर्पण करणार आहे. काही काळजी करू नका. धमालच येईल बघा.

( पोते नजरेसमोर येणे हे त्या त्या व्यवसायाशी संबंधित असल्याने माझ्याही प्रतिसादात चिडण्यासारखे काहीच नव्हते. Lol )