निवडुगांचा बहर..

Submitted by गिरिश सावंत on 6 July, 2012 - 01:17

जून अख्ûर आले की, सर्वत्र वास दरवळतो तो `ब्रह्मकमळां'चा!..
कुंडीतील झाडांवर एखाद-दुसरे फुलणारे हे फुल सद्या 30-40 अशा संख्येने फुललेले पहायला मिळते.

044

IMG_7288

IMG_7275

IMG_7281

आमच्याकडे ब्रह्मकमळ फुलली आहेत, फोटो काढायला या, असा दररात्री एक तरी फोन येतच असतो. एकेकाळी काहींच्या घरात क्वचितच येणारी ब्रह्मकमळे सर्वांसाठी आकर्षणाचा विषय होता. त्यानंतर वृत्तपत्रांमधूनही अमूक-तमूक च्या घरी ब्रह्मकमळे फुलली होती, अशी छायाचित्रेही प्रसिद्ध होत. मात्र अलिकडे ब्रह्मकमळांचा तर बहरच आलेला दिसतो. उदंड झाली ब्रह्मकमळे असा विचार येत असताना ब्रह्मकमळांमागचे वास्तव शोधायला गेले असता वेगळीच माहिती पुढे येते. आपण ज्या पांढऱया फुलांना ब्रह्मकमळ नावाने संबोधतो ती मूळातच ब्रह्मकमळे नाहीत असे वनस्पती शास्रज्ञ ठासून सांगतात. एस्र्रस्रँ8''4Z ङ्म78स्री3ं'4Z या शास्रीय नावाने ओळखली जाणारी ही पांढरी फुले म्हणजे निवडुंग वर्गातील झाडाला येणारी फुले आहेत.
मूळ ब्रह्मकमळ फक्त हिमालयातच फुलते. भारत सरकारतर्फे मूळ ब्रह्मकमळाचे महत्त्व अधोरेखित करताना 1982 मध्ये ब्रह्मकमळाचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकिटही प्रसिद्ध केले आहे.

011

जरी आपण भावनेच्या भरात निवडुंगाच्या फुलांना ब्रह्मकमळांचे नाव देत असलो तरी त्यामागील सत्यता माहित असण्û गरजेचे आहे.
ब्रह्मकमळ - या मराठी नावाने ओळखल्या जाणाऱया या कमळाला `बेथेलहॅम लिली' (Bethelham Lily) असे म्हणतात. त्याचे मानसशास्त्राeय गोत्र `एपिफायलम' असून त्याच्या `एपिफायलम फायलॅन्थस' आणि `एपिफायलम क्रॅनिटम' अशा दोन जाती आहेत. हे झाड निवडुंग (कॅक्टस) वर्गातील एक झुडुप आहे. कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असून, फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. शाकीय (Vegitative) पद्धतीने पुनरु त्पादन होणाऱया या वनस्पतीचा पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग म्हणजेच या वनस्पतीचे खोड होत. अशा प्रकाराच्या खोडांना पर्णकांडे(Phylloclades) असे म्हणतात. या पर्णकांडाला असणाऱया खाचातूनच या कमळाचा उगम होतो. पानासारख्या दिसणाऱया या पर्णकांडावरच फुले उमलतात. म्हणूनच या वनस्पतीला लॅटीन भाषेत एपिफायलम (Epiphyllum) असे म्हणतात. नीलगिरीच्या जंगलातही याच प्रकारची मोठी फुले आढळतात. त्यांचा रंग गुलाबी असून, ती दिवसा उमलतात.

IMG_7283

`बेथेलहॅम लिली' प्रकारातली दुसरी जात आपल्या भारतात आढळते. निवडुंगाच्या कुळात जन्मलेली ही जात मूळ परदेशीयच. मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका इत्यादी भागातून ही जात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली. त्यामुळे एकेकाळी ही झाडे काही मोजक्या ठिकाणीच ही झाडे आढळत होती. त्यामुळे क्वचितच दिसणाऱया या फुलांना दुर्मिळ अशा ब्रह्मकमळाच्या नावाने संबोधण्याचा प्रघात पडला असावा. असा वनस्पतीशास्रज्ञांचा कयास आहे. मात्र अलिकडे याची लागवड जवळपास प्रत्येक घरात केली जाते आहे. आपल्याकडे आढळणारे `ब्रह्मकमळ' हे फडय़ा निवडुंग कुळातील एक झुडूप आहे.

022

खरे ब्रह्मकमळ हे हिमालयात आढळून येत असून ते पर्वतरांगांच्या टोकावर फुलते. हिमालयात जवळपास 3000 ते 4,600 मी. उंचीवर उमलणाऱया या ब्रह्मकमळाला नेहमी अतिथंड वातावरणच आवश्यक असते. या उलट आपल्याकडच्या फुलाला तीव्र ऊन गरजेचे असते. सूर्यफुलाच्या प्रवर्गातील हे फुल बर्फाच्छादीत वातावरणातही फुलू शकते. काहीशा निळसर जांभळट रंगांच्या या फुलाची पाने फुलांभोवती ऊबदार वातावरण निर्माण करतात. दातेदार 10 ते 21 सेंमी लांबीची पाने असलेल्या यातील फुलाचा व्यास जवळपास 15 सेंमीपर्यंत पाहायला मिळतो. हिमालयाच्या अतिउंच ठिकाणी आढळणाऱया या फुलांना आपोआपच अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. औषधी गुणधर्म असलेले हे फुल महत्त्वाचे मानले जाते. हे फुलही रात्रीचेच पूर्ण फुलते.हे फुलही जून ते ऑगस्ट या दरम्यानच फुलते.

033

याबाबत काही जाणकारांशी चर्चा केली असता ते सांगतात हिमालयात आढळणारे ब्रह्मकमळ आणि आपल्याकडे आढळणारे निवडुगांचे मोठे फुल ही दोन्ही फुले रात्रीचीच उमलतात. त्यामुळे माहितीतील विस्कळतीपणामुळे निवडुंगाच्या फुलाला ब्रह्मकमळच नाव दिले असावे, असे वाटते. तर निवडुंगाला कमळाप्रमाण्ûच मऊ पाने असतात. त्यामुळेही या फुलाला ब्रह्मकमळ म्हटले गेले असावे, असेही काही जण सांगतात. माहितीच्या महाजलात अशी अद्ययावत माहिती मिळत असताना आपल्याकडे फुलणाऱया निवडुंगाच्या फुलाला ब्रह्मकमळ म्हणण्û किती संयुक्तिक असेल याचा विचार करायला हवा.

हिमालयातील ब्रम्हकमळांचे फोटो आणि माहिती : आंतरजालावरून साभार

गावठी ब्रम्हकमळे माझ्याच अंगणातली

IMG_7273

( या बाबत मा.बो . करांनी खूप वेळा जागोजागी माहिती दिलीच आहे.. तरीही लिहिण्याचा हव्यास ... )

ता.क.
चूक भूल माफ करावी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गिरिश, सगळे फोटो आणि माहिती एका ठिकाणी संकलित झाली ते छान झाले.
या निवडुंगाने, माणसाचा वापर करुन स्वतःचा छान प्रसार करुन घेतला आहे.
आमच्या दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकावर या फुलांचा फोटो होतो. त्या काळी २/४ फुले जरी कोणाकडे उमलली, तर पेपरमधे बातमी यायची. फुलेही फार कमी फुलत. आता घरोघरी झाडेही आहेत आणि फुलतात देखील.

केनयामधे मोठ्या निवडुंगांना, यापेक्षा मोठी फुले येतात. नुसती पांढरीच नाहीत तर त्यात पिवळा, केशरी, गुलाबी असे रंगही दिसतात. पण तिथे अर्थातच यांचे कौतूक नाही. तिथे अगदी रस्त्याच्या कडेलाच दिसतात हि झाडे.