फिरतांना चांदण्यात

Submitted by गुरूजी on 4 September, 2012 - 01:25

फिरतांना चांदण्यांत, धरलास माझा हात
सजणा रे सावर ही बावरली, चंद्ररात

झोपलेल्या खेड्यातून, मी आले एकलीच
दिवे दूर नारद हे, पडले पीछे कधीच
त्या तिथल्या वेलीपण जाणतात

कशी सांग तुझ्यावीन, तरून जाउ पुनवलोट
तुझी हवा छळते रे,अन काजवे फितूर
नाकातुन मालकंस, हातातुन पारिजात

येउ चल फिरून गडे, ना मेले घर अजून
तुळस माझी इथेच का, पडली रे हिरमसून
डोळ्यांतून शशी तुझा, माझ्या उरी पहाट...
..................................................................गुरूजी भाउसाहेब आळंदीकर(चोराची)
अध्यापक शिक्षक, एक शिक्षकी शाळा
आळंदी(चोराची)
तालुकास्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षक
मोबाईल- बी एस एन एल.
(ही गझल मी मागच्या जन्मात १८५७ साली लिहिली असून माझ्याकडे वंशावळींच्या चोपड्यांची तशी प्रत आहे. नंतर सुरेश भटांना ती दृष्टांतपाठामुळे आकलन झाली आणि त्यांनी तशीच लिहिण्याचा यत्न केला........कितीही काफिये, मतला जुळला तरी ही गझल व भटांची गझल वेगळी आहे. तेंव्हाच्या काळातली ही पहिली मराठी गझल असल्याचा दावा मी केला होता. तेंव्हा मराठी हझल शैशवावस्थेत असल्यामुळे वृत्तात काही डायरीतल्या खोडतोडीसारखी खोडतोड जाणवेल.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुर्जीsssssssssssssssssssssssssss..! काय केलेत हे ? Sad

-------> आहो इथे आधीच देवसरांच्या एका गझलेवर प्रतिसादकांनी उछाद नावाचा खेळ मांडलाय. आता आणखी एक मैदान झाले. DesiSmileys.com

हरहर! कोण हे अधःपतन! एव्हढ्या अनमोल शोधावर कोण दुर्लक्ष! आत्ता तर्कतीर्थ असते तर समस्त गझलकारांना खडसावले असते. जगदंब. गझलेच्या कंपनी सरकारचा निषेध.

गुरुजी वा वा
एखाद्याच्या थोबाडीत हणावी तर कशी याचे उत्तम उदाहरण !!

एक विनन्ती
हे विडम्बन/ काहीच्या काही लेखन आहे अशी टीप तळाशी अवश्य द्यावी म्हणजे आपला हेतू निरामय आहे हे स्पष्ट होईल [यातून , आपण ज्याना टार्गेट केले आहे त्या महोदयान्ची , टीप देणे ही "टीप-शैली" सुद्धा विडम्बनात्मकरित्या हाताळली जाईल]

आळंदी(चोराची)>>>>एखादा सन्दर्भ कसा चपखलतेने वापरावा याचे 'आदर्श' उदाहरण!!
यावर पोट दुखेस्तोवर हसलोय राव!!..सहीच !!

वैवकु

बा वैभवा, तुझ्या प्रतिसादाने भारावून उपरण्याने वडस वाढलेले डोळे पुसले. आमच्या काळी मागच्या जन्मी काहीच्या काही कविता वा विडंबन हे छचोर प्रकार नसल्यामुळे मला निमिषभर उमजलेच नाही तू काय वदतोस ते. केशवकुमार नावाच्या सगळ्याच गोष्टींमधे आडदांड असलेल्या तेंव्हाच्या एका माझ्या दृष्टीने 'शिक्षकबंधु' ने हा प्रकार सुरू केल्याचे स्मरते. असो. पण मी असे काही येथे टाकणार नाही. कारण माझ्या दृष्टीने हीच गझल ओरिजिनल असल्यामुळे मी असे लिहीणे योग्य नाही. उलट भटांनीच खरे म्हणजे प्रेरणास्थान म्हणून माझे नाव सांगणे अभिप्रेत होते. असो. 'सुप्रियाताई' म्हणजे सुप्रिया सुळेदेखील मीच पक्षाची गझलेप्रमाणे ओरिजिनल वारसदार म्हणून खाजगीत सांगतात. खरे खोटे त्या 'शाम'लाच माहित. येथे शाम म्हणजे श्रीकृष्ण धरावा..भलतेसलते अर्थ काढू नये. असो. 'कैलासा'पासून उगम पाउन गझल गंगेसारखी येथे वाहते आहे ही संतोषजनक बाब आहे. असो. गोळ्या घ्यायची घटिका झाली असल्यामुळे थांबतो. ह्या गोळ्या म्हणजे शक्तीवर्धक नसून गझलवर्धक आहेत.