प्रश्नच आहे.

Submitted by suneha on 31 August, 2012 - 02:11

ते वाकड्या बांध्याच काळं झाड,
ते झुकलेले रांगडे चौकस माड,
विचारताहेत मला येशील का
निदान एक दिवसा-आड?

ती मनमौजी बोगनवेल बहरवेडी,
तो पाकळ्यांचा गालीचा पांघरलेला रस्ता,
तो एका पायानं लंगडणारा वेल्हाळ कुत्रा,
विचारताहेत मला काय तुझा पत्ता?

ती चिमणी वेडी गुलुगुलू पाखरं,
ते चहाचं अंधार-गुडूप बुटकं टपरं,
ती वाट वळणाची उलटी फिरून,
विचारतेय मला, गेलीस ना सारं विसरून?

त्यांना सगळ्यांना काय सांगायचं?
खोट्या शब्दांनी झुलावायचं ,
खरं सांगून दुखवायचं,
की सगळ अधांतरीच सोडायचं?
प्रश्नच आहे.
नेहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users