'चॅम्पियन्स'च्या शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 29 August, 2012 - 13:20

'चॅम्पियन्स' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२ रोजी पुण्याच्या सिटिप्राइड अभिरुची चित्रपटगृहात संध्याकाळी सव्वासहा वाजता आयोजित केला आहे.

चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'चॅम्पियन्स'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

या खेळाची चार तिकिटं आपल्याकडे आहेत.

या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया माध्यम प्रायोजकांना मायबोलीच्या संपर्कसुविधेतून इमेल पाठवावी. इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा.

एका मायबोलीकराला एकच तिकीट मिळेल, याची कृपया नोंद घ्यावी.

या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहून नेहमीप्रमाणेच मायबोलीकर या खेळाबद्दल व चित्रपटाबद्दल भरभरून लिहितील, ही खात्री आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण कोण जातंय मग? Happy

नेहमीसारखेच फोटो आणि वृत्तांत येऊ द्यात.

या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहून नेहमीप्रमाणेच मायबोलीकर या खेळाबद्दल व चित्रपटाबद्दल भरभरून लिहितील, ही खात्री आहे.>> तिकीट घेणार्‍या सगळ्यांनी सहसा लिहायलाच पाहिजे. माध्यम प्रायोजकांचे प्रतिनिधी म्हणून ती त्यांची नैतिक जबाबदारी बनते. Happy