गाथाचित्रशती विषय क्र.२ आपल्याला सतत हसत ठेवणारे विनोदी कलाकार

Submitted by स्मितू on 28 August, 2012 - 08:16

खरतरं रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला कुठेतरी फ्रेशनेस हवा असतो... रोज तेच कंटाळवाणे कामं,रोज तेच सकाळी उठा,मुलांची शाळेची तयारी,नवर्‍याचा टिफिन आपला टिफिन.तेच ऑफिस... सगळे कसे तेच ते कधी कधी कंटाळवाणे होते...

अशावेळेस मला आठव्ण येते...ती विनोदी सिनेमांची आणि त्यातल्या विनोदी कलाकारांची मग काय एक एक जुन्या सिनेमां पासुन मी आठवायला सुरवात केली कोण कोण ते विनोदी कलाकार जे आपल्याला सतत हसवत ठेवतात .... मी आठवण करत गेले आणी.... एक एक नांव डोळ्यासमोर येत गेलं असे म्हणतात कोणालाही रडवणे सोपे आहे पण हसवणे फर कठिण आहे .

..keShto.jpeg
केष्टो मुखर्जी. हिंदी सिनेमातले एक प्रतिभावंत कलाकार होते, आणि आपल्या हास्य अभिनयामुळे ते ओळखले जात होते. त्यांनी दारु पिणार्‍या व्यक्तीची भुमिका फार म्हणजे फारच छान केल्या... प्रत्यक्ष जीवनात त्यांनी कधी बाटलीला स्पर्श सुद्धा केला नाही. १९७० च्या मां और ममता ह्या चित्रपटात त्यांनी दारुड्याची भुमिका केली,तेव्हापासनं किती तरी चित्रपटात त्यांनी अशा भुमिका केल्या. पडोसन ,परिचय आश्या बर्‍याच सिनेमात त्यांनी विनोदी भुमिका केल्या आहेत.शोले सिनेमातील त्यांचा अभिनय खुप छान होता.

index.jpeg
भगवान दादा... एक ठुमदार व्यक्तीमत्व, भगवान दादांमध्ये संवाद आणि नाच ह्या दोन शैली ने त्यांनी सिनेसृष्टीत आपले स्थान पक्के केले. त्यांचा सर्वात गाजलेला सिनेमा अलबेला होता. भोली सुरत दिलके खोटे, आणि शोला जो भडके हे गाणे त्यांच्या नृत्य शैलीने इतके गाजले की आजही तरुण पिढीच्या तोंडुन हे गाणे ऐकायला मिळते.

jonny.jpeg
जॉनी वॉकर..
एक साधारण रंग रुप असुनही असामन्य अशी व्यक्ती ,हिंदि सिनेमात विनोदी कलाकार म्हणुन खुप प्रसिद्ध होता. त्यांनी ३०० हुन जास्त सिनेमात सह अभिनेता म्हणुन काम केले आहे...

utpal.jpeg
उत्पल दत्त... हिंदी सिनेमातील अभिनेता,निर्देशक,लेखक, नाटककार होते. त्यांची सर्वात गाजलेली विनोदी भुमिका गोलमाल (१९७९) होती त्यांना तिन सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेता फिल्मफेयर पुरस्कार १९७० मध्ये मिळाला होता.

Indian-comedians1_17932.jpg
राजपाल यादव हा पण एक नावाजलेला विनोदी कलाकार आहे. त्याची गाजलेले सिनेमे,समय के खिलाफ, दौड़, मालामाल, वीकली और चुप चुप के.
lever.jpeg
जॉनी लिव्हर बॉलिवुड मधील सगळ्यात लोकप्रिय हास्य कलाकार म्हणुन प्रसिद्ध आहे. जॉनी लिव्हर स्टँडिंग कॉमेडी सुद्धा करतात. विनोदी भुमिकेत गाजलेले सिनेमे इश्क, साजन चले ससुराल, जुदाई .

paresh.jpeg
परेश रावल एक प्रतिभावंत कलाकार इंजिनिअर बनण्याची इच्छा असलेले परेश रावल एक अभिनेता म्हणुन हिंदी चित्रपट सृष्टीत आले. हेराफेरी, फिर हेराफेरी, गरम मसाला, मालामाल वीकली और वेलकम ह्या चित्रपटात विनोदी कलाकार म्हणुन छान भुमिका केल्यात. परेश रावल ह्यांना १९९४ में वो छोकरी अआणि सर के लिए सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता म्हणुन पुरस्कार मिळाला होता. त्यांना १९९३ मध्ये सर साथी सर्वश्रेष्ठ खलनायक, २००१ आणि २००३ मध्ये सर्वश्रेष्ठ कॉमेडियन म्हणुन फिल्मफेयर पुरस्कार दिला गेला.। फिल्म हेराफेरी साठी त्यांना सर्वश्रेष्ठ कॉमेडियन चा पुरस्कार मिळाला होता .
आशा ह्या विनोद विरांना मानाचा मुजरा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन लिहायला हवे होते असे माझेच प्रामाणिक मत आहे.
>>>>>>>
माझेही... दोन्-दोन ओळी बघून मला वाचावेसेच नाही वाटले.. Sad
पण अजून ३ दिवस बाकी आहेत.. Happy

इथे लिहिण्यासारखे कितीतरी आहे.. लिहा लिहा.. काही निवडक लोकांबद्दल तरी लिहा.. ठराविक कालखंड घेऊन त्या काळातील विनोदवीरांवर लिहा.. अजून भरपूर लिहा..

मेहमुद्,किशोरकुमार---विसरलात का?>>>>>>+१००० त्या दोघांचा पडोसन विसरता येईल??

अजुन लिहा हो... हा विषय खुप मोठ्ठा आहे. अजुनही एक दिवस आहे.....

अजुन अनेक विनोद वीर आहेत अनुपम खेर, लक्ष्मिकांत बेर्डे, अशोक सराफ, कादर खान, शक्ति कपुर, जुन्या मधे गोप, टुणटुण, मनोरमा,

खुप आहेत हो....

हो पण आता खरेच वेळ नाही.... आता लेख मी स्पर्धेनंतर पुर्ण करेल... .मो कि मी, हिम्सकुल सॉरी... तो अपुर्णच राहु द्या सध्या ... ह्यावर प्रतिक्रिया कोणीही देऊ नये... Happy

केष्टो ! माय फ़ेव्हरीट !!
'बाँबे टु गोवा' मधली केष्टोची भुमिका विसरणे केवळ अशक्य आहे. संपुर्ण चित्रपटभर तो झोपलेलाच आहे. मध्ये एकदाच गाडीत साप निघाल्यावर त्याला जाग येते, डोळे उघडल्या उघडल्या समोर दिसतो तो साप ! तो बघितल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे क्षणभर घाबरलेले भाव आणि 'लगेचच परत काय व्हायचं असेल ते होवो' असा विचार करुन तो परत डोळे मिटतो आणि क्षणात घोरायला लागतो. अफाट...अफाट कलावंत होता केष्टो !

छान विषय घेतलाहेस स्मितू लेखासाठी, मस्त जमलायदेखील, फक्त अजुन माहिती अ‍ॅड करायला हवी. शुभेच्छा Happy

सरदार, हेराफेरी, फिर हेराफेरी, गरम मसाला, मालामाल वीकली और वेलकम ह्या चित्रपटात विनोदी कलाकार म्हणुन छान भुमिका केल्यात
>>
सरदार चित्रपटात परेश रावळ यांची विनोदी भूमिका होती हे वाचून मला मूर्च्छा आली आहे. !
अहो, त्यात त्यानी सरदार वल्लभभाई पटेल यांचा रोल केला आहे, कोण्या सरदारजीचा नव्हे ! धन्य आहे !

सरदार चित्रपटात परेश रावळ यांची विनोदी भूमिका होती हे वाचून मला मूर्च्छा आली आहे. !
बाळू जोशी +१०००००००००००००००००००००००००००००००

त्यात त्यानी सरदार वल्लभभाई पटेल यांचा रोल केला आहे, <<< आता एखाद्याला सरदार वल्लभभाई पटेल हे गुजराती फॅमिली कॉमेडीमधलं विनोदी पात्रच वाटत असेल तर काय करता बाजो? Wink

त्यात त्यानी सरदार वल्लभभाई पटेल यांचा रोल केला आहे, <<< आता एखाद्याला सरदार वल्लभभाई पटेल हे गुजराती फॅमिली कॉमेडीमधलं विनोदी पात्रच वाटत असेल तर काय करता बाजो?

सरदार ह्या चित्रपटाचे नांव चुकुन टायपल्या गेले... मला फक्त परेश रावल चे विनोदी चित्रपटच लिहायचे होते... लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद... ..चुक होते कधी कधी... .. म्हणुनच वाचक असतात ना... बाळु जी शुद्धीवर या :P....

अहो, तुम्हाला मुर्च्छा आली म्हणुन म्हणाले, ...............माझी चुक तर मी कबुल केली आहे ना ... चुक झाली होती ती दुरुस्त केली...