आज भीती वादळाची राहिली नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 27 August, 2012 - 09:48

गझल
आज भीती राहिली ना वादळाची!
जाहली तडजोड माझी आणि त्याची!!

लावुनी वाटेकडे बसलेत डोळे.....
जाणली तृष्णा न कोणी पावसाची!

कोण वाचवणार येथे वासरांना?
माणसे करतात कत्तल माणसाची!

ऊन क्षणभर, तर कधी, सर पावसाची!
जिंदगी वाट्यास आली श्रावणाची!!

जाहली मोठी....मुले जी बाळ होती;
घर पहाते वाट आता नातवाची!

नेहमी करते कुणी का रोषणाई?
रोजची का रात्र असते चांदण्याची?

आज जेव्हा पोचलो साठीमधे मी.....
जाणवे मर्जी जराशी प्राक्तनाची!

गोष्ट कायमचीच हृदयी कोरली मी....
ती सशाची अन् धिम्या त्या कासवाची!

आज थोडेफार जो मी काय आहे...
ती कृपा सारी असे हितचिंतकाची!

आतड्यांना पीळ पडतो! जीव तुटतो!
पाहतो जेव्हा टवाळी लेखनाची!!

पिंजले काळीज जेव्हा हे धडकते;
ही गझल तेव्हाच झाली या जगाची!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सर एकदम मस्त !! भावस्पर्शी!!
स्टाईल नेहमीपेक्षा हटके आहे आज .वा वा छान

सगळे शेर आवडले

आज थोडाफार मी जो काय आहे / (जो काहि आहे )>>>>>> असे वाचले बरा वाटल्यास हा बदल आपण स्वीकारू शकता

पहिली ओळ वाचताना खटकते . मत्रा योग्य अहेत ना हे तपासाल का एकदा?

मक्त्यात पहिली अन् दुसरी ओळ यात काळ अलग अलग आहेत ('धडकते' अन् 'झाली') त्यामुळे तुमच्या मनातला नेमका अर्थ समजायला जड जातोय (की असे आहे... 'पिन्जले' अन् 'झाली' ही जोडी आहे क्रियापदान्ची अन् 'धडकते' हे काळजाला दिलेले विषेशण की काय ; ते आहे ??)

देव सर गझल खुप छान आहे,

पण----- आतड्यांना पीळ पडतो! जीव तुटतो!
पाहतो जेव्हा टवाळी लेखनाची!! ..... हा शेर वाचुन हबकलोच. काय बोलावं आता?

बाकी सगळे शेर मनापासून आवडले. ... अभिनंदन. Happy

वैभवा!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
थोडाफार/थोडेफार दोन्ही चालेल. ब-याचवेळा गुणगुणल्यावर थोडेफार ठेवले, कारण ते कानाला बरे वाटले.
वैभवा, बरे मला जागे केलेस ते. मतल्यातली ओळ धांदलीत चुकीची लिहिली. तुझा प्रतिसाद आल्यावर माझे चिठोरगे काढून पाहिले तर पहिली ओळ वेगळीच होती. मी अवाकच झालो. संपादित केले आहे. खूप खूप धन्यवाद! तू जागरूक होतास म्हणून माझा प्रमाद मला ताबडतोब समजला. पुन्हा अशी धांदल होवू देणार नाही. झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व! परत तुला धन्यवाद!
मक्त्यात तू कंसात लिहिलेलाच अर्थ बरोबर आहे. तेव्हा मक्त्यात कुठलीही चूक नाही. असो.
असेच तुला काही चुकीचे वाटले की, कळवीत जा.
......प्रा.सतीश देवपूरकर

वैभवा! ही गझल आज सकाळी महाविद्यालयास जाण्यापूर्वी एकटाकी ३ तासात लिहून हातावेगळी झाली. इतके खयाल उचंबळून आले होते. एरव्ही असे एकटाकी इतके शेर एका गझलेतील मी लिहीत नाही.
......प्रा.सतीश देवपूरकर

आपला अनुभव (दुसरा प्रतिसाद) शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद !!!

माझी केस उलटी आहे एकदम .......मी शक्यतो गझला एकटाकीच लिहितो .........एक शेर आता एक उद्यापरवा असे मला नाहीच जमत
एक गझल करायला मल जेमतेम १/२ -१ तास पुरतो
अर्थात दोन-चार गझला अशाही आहेत त्याना दोन-तीन दिवस लागलेत ; पण त्यापेक्षा जास्त दिवस गझल पोटात बाळगणे (मूल गर्भात बाळगणे) ......मला गझलवेणेच्या कळा सहनच होत नाहीत
असो..........
धन्यवाद सर ............
आपला
"वैभवा"

मोहिनीजी!
एकटाकी म्हणजे काय? एकच टाकून अख्खी गझल सुचते ती?<<<<<
वा! वा! मोहिनीजी! सुंदर विनोद!

.........प्रा.सतीश देवपूरकर

आतड्यांना पीळ पडतो! जीव तुटतो!
पाहतो जेव्हा टवाळी लेखनाची!! >>>>>> कशाला आतड्यांना पीळ पाडताय प्रोफेसर, थांबवा आता हे.
ही प्रतिक्रिया मस्तय

Mohini Pawaar | 28 August, 2012 - 11:51

एकटाकी म्हणजे काय? एकच टाकून अख्खी गझल सुचते ती?

एकटाकी म्हणजे एकदा टाक हृदयाच्या दौतीत बुडवला की, त्यातच पूर्ण गझल लिहून होणे!<<<<<<<

मग तुमच्या गझला इतक्या लांबलचक होतात कश्या पेनाच्या निबेला काही खास रक्तशोषक सिस्टीम बसवलीत की काय एका दमात लिटर अर्धालिटर रक्त लागत असेल नै तुम्हाला ...सहज जिज्ञासा म्हणून विचारले