माझी गोष्ट

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज काल माझ्या आयुष्यात काही तरी वेगळ घडतय. वेगळ म्हणजे नक्की काय ते अस सुसंगत पणे नाही सांगता येणार पण तरीही एक प्रयत्न करतो. आता हेच बघा ना मी कोण हे सांगायच्या आधीच तूम्हाला दूसरच काहीतरी सांगायला सुरूवात केली. अस हल्ली सारख घडतय. माझ मन थार्‍यावर नाही. कसली तरी टोचणी लागून राहीलीये मनाला. आता राहील मी कोण्?.सांगतो. माझ नाव राकेश. देसाई वकिलांकडे मी असिस्टंट म्हणून सुरूवात केली. ते त्यांच्या निव्रुत्ती नंतर ही अजून तिथेच आहे. आज काल त्यांचा मुलगा वकिली बघतो. कधी तरी माझा सल्ला विचारतो. आता माझी चाळीशी आलीये. म्हणजे काही फार वय नाही. Life begins at 40 म्हणतात ते काय उगाच? पण आजकाल थोडासा थकवा जाणवतो कधीतरी. राहूल म्हणायचा तू एकट्याने रहातोस जास्त विचार करतोस म्हणून असेल. राहूल माझा एकूलता एक मित्र. ते पूढ सांगतो सविस्तर.
...............................................................................................................................................................................

मी एकटाच रहातो माझ्या रॉ हाउस मध्ये. एकटा म्हटल तर लग्न केल नाही हे मुद्दाम सांगतो. तश्या कॉलेज मध्ये बर्‍याच सुन्दर मूली होत्या. पण कोणाशी मुद्दाम ओळख वाढवायच्या भानगडीत पडलो नाही. नाही म्हणायला ती करमरकर माझ्या मागे होती अस एक दोघंकडून ऐकलेल पण मी तिच्याशी ओळ्ख वाढवायला गेलो नाही. राहूल माझा एकूलता एक मित्र. माझा स्वभाव तसा एकलकोंडा. तसे व्यवसायाच्या निमीत्ताने बर्‍याच लोकांशी संबध आले. पण एका विशीष्ठ मर्यादेच्या पलिकडे मी कधी गेलो नाही.
...............................................................................................................................................................................
महिन्या भरा पूर्वीची गोष्ट असेल. कदाचीत काही दिवस पुढे मागे असतील नक्की आठवत नाही. मोतीला मी रोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचो. मोती म्हणजे माझा आणखी एक स्नेही माझा कुत्रा. खेळकर. त्या दिवशी नेहेमीच्या बागेत कसलीशी सभा होती म्हणून जरा दूसर्‍या लांबच्या बागेत गेलो. तशी ही दूसरी बाग मला आवडत नसे. पण मोतीला फिरायला न्यायच म्हणून नाइलाजाने गेलो. माझ्या नेहेमीच्या दोन चकरा मारून मी बाकावर बसलो. मोतीचा पट्टा सोडला. खर तर त्याला पट्टा बांधायची गरजच नव्हती.इतका तो समंजस जीव. पण लोकांच्या समाधानासाठी म्हणून रस्त्यावरून नेताना पट्टा बांधायचा झाल. बाका वर बसून मी अश्याच कसल्यासा विचारात होतो. इतक्यात मोती जोरजोरात भूंकला. मला वाटल त्याला काय हाड-बिड दिसल असेल. पण त्यांच भुंकण थांबत नव्हत. त्याला चूचकारायला म्हणून त्याच्या जवळ गेलो. तर तीथे कसलीशी एक जुनीशार पेटी दिसली.पेटी म्हणजे काही फार मोठी नाही. साधारण फुटभर लांब सुद्धा नसेल. अगदी जुन्या पद्धतीची- तश्या प्रकारची एक पेटी माझ्या आजोबांकडे बघीतल्याच स्मरत. मोती सारखा नखाने खरवडत होता त्या पेटीवर. म्हटल काय आहे ते बघाव जरा.म्हणून उघडायला गेलो. पण ते झाकण बेट उघडेच ना. मी ही मग हट्टाला पेटलो. उघडत नाही म्हणजे काय. मी ही खूप जोर काढला शेवटी उघडल एकदाच. आत काही नव्हतच फारस एका अंगठी शिवाय. मी ती अंगठी उचलली मात्र. इतक्यात काहीतरी हातावरुन गेल्यासारख वाटल. बुळबूळीत काहीस. नक्की आकार कळला नाही पण अस उभट लांबट काहीस. स्पर्श जाणवला आणि नाही सुद्धा. म्हणजे धड थंड नाही धड गरम नाही असा. म्हणजे मेंदूला निट आकलनच झाल नाही त्याच्या आकार मान, तापमाना बद्दल. साप तर नसेल? अंगावर एक शीरशीरी जाणवली. शहारा आला. पण काही का असेना. मला काही नुकसान तर नाही ना केल त्याने. ठीक आहे तर. मी ती अंगठी निरखून बघीतली. कसलस चिन्ह होत वाटत. राहूलला विचारायला पाहीजे. त्याला असल्या गोष्टीत भरपूर रस असतो. आता बराच उशीर झालाय निघायला हवय. अंधार पडतोय. भरभर घराकडे चालायला लागलो. आज मोती दमल्या सारखा वाटतोय. नेहेमी तो पुढे पुढे असतो तर आज खेचून न्यायला लागतय त्याला. भूक लागली असेल त्याला.घरी जायला नाखूष असल्या सारखा का वाटतोय आज? तूला उद्या आणीन रे परत.
....................................................................................................................................................................................
घरी येऊन छानशी आंघोळ केली. आंबलेल अंग जरा हलक झाल. आज दूपारी अशीला बरोबर चांगल जेवण झालेल. म्हणून आता फक्त दूध केळ खाईन म्हणतो. मोतीलाही घातल दूध. त्याला थोपटल जरास. तो थोडासा शांत झाला. चला आता दूध केळ खाउन घेऊया. मग थोड्या वेळ पेपर वाचला. झोपण्यापूर्वी सहज म्हणून बघीतला. तर मोती चक्क झोपला होता. तो असा झोपत नाही रात्री फारसा. आज काय झाल त्याला. आणि झोपलाय तो ही कुशीवर नाही. पाठीवर. माणसा सारखा. दचकायलाच झाल जरा . कुत्रे अशे कधी पाठीवर निजतात का? काही माहीती नाही बूवा. आणि झोपलाय पण अगदी लहान मुलासारखा. हे काय आणिक खुळ. जाऊदे.
................................................................................................................................................................................
त्या दिवसापासून मोती अगदी बदललाय. फिरायला जायला मागत नाही. दिवसाचे १६-१६ तास झोपून काढतो. आज काल कुशीवर निजत नाही तो. चक्क पाठीवर निजतो लहान मुला सारखा. आणि खातही नाही फारस. त्या अंगठी बद्दल राहूलला लवकर विचारायला हवय. परवाच्या दिवशी मोती निजला तो असाच रात्री रडत उठला. रडत? हो हो शब्द बरोबर आहे रडतच उठला. म्हणजे भूंकला असेल पण मला तरी ते भूंकण रडल्या सारख वाटल. त्याला भूक लागली असेल म्हणून थोडस दूध घातल. आज त्याच्या तोंडातून लाळ गळली. हा अस का वागतोय? पशू वैद्या कडे न्यायला हव ह्याला उद्याच्या उद्या. पण ती वेळच आली नाही त्या दिवशी जो मोती निजला तो शेवटचाच. सकाळी उठलाच नाही.
.................................................................................................................................................................................
इतके दिवस मी हलगर्जी पणा केलाय. पण आज राहूलला बोलवायलाच हव. त्या अंगठीबद्दल ज्याचा मला इतके दिवस विसर पडलाय त्या बद्दल सांगायलाच हवय. तस मी राहूलला रात्री बोलावून घेतला. तो ही आला बापडा लगेच. बर्‍याच दिवसांनी आम्ही भेटत होतो. ख्याली खुशालीच्या गोष्टी झाल्यावर मी त्याला ती अंगठीची गोष्ट सांगीतली. तेंव्हा पासून मोतीच बदललेल वागण ते परवाचा त्याचा म्रूत्यू. सगळ सगळ सांगीतल. फक्त त्या अगम्य, वर्णन न करता येणार्‍या स्पर्शा बद्दल काहीच सांगीतल नाही. मनाचे भास ते. कशाला सांगायचे. ते सगळ त्याने गंभीरपणे ऐकून घेतल. मला शंका वाटली की तो मला हसेल म्हणून. माझ्या मनाचा वेडगळ पणा म्हणून. पण तो हसला नाही. त्याने ती अंगठी बघायला मागीतली. ती अंगठी त्याने वरखाली करून बघीतली. त्याच्या N95 ने त्या अंगठीचा फोटो काढून घेतला. आणि त्याबद्दल कोणा जाणकाराला विचारतो म्हणाला. रात्रीच जेवण आणि ड्रींक्स घेऊन तो गेला सुद्धा. मग पुढे आठवडाभर मला भरपूर काम होत. केस अंतीम टप्प्यात आलेली. त्याची तयारी होतीच. थोडक्यात नेहेमीच्या रहाट गाडग्यात मी इतका गूरफटून गेलो की त्या अंगठी बद्दल आणि राहूलच्या feedback बद्दल त्याचा फोन येइपर्यंत अगदी विसरूनच गेलो होतो. बोलल्या प्रमाणे तो रात्री आला. थोडासा गंभीर वाटला. ड्रींक्स नको म्हणाला. मला वाटल्या प्रमाणे अंगठीच्या रहस्याची उकल त्याने केली होती. जास्त प्रस्तावना न करता त्याने अंगठीची कथा सांगीतली ती अशी.
...............................................................................................................................................................................
खूप वर्षापूर्वी म्हणे कुठल्याश्या एका राज्यात राजकन्येच कोणा एका सैनीकावर प्रेम बसल. दोघांचे संबंध आले. आणि त्यातून तिला दिवस राहीले. राजाला ह्या गोष्टीची खबर लागताच तो पिसाळला. त्याने त्याच नाव शोधण्यासाठी जंग जंग पछाडल पण तिन बिलकूल दाद लागू दिली नाही. आणि एक दिवस ती त्या सैनीकाचा हात धरून पळून गेली. तेंव्हा ती ८ महिन्यांची गर्भवती होती. तिच्या अंगावर दागीने नव्हते. फक्त बरोबर एक अंगठी होती. वाटेतच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. आणि जे पोर निपजल ते मेलेलच होत. नंतर त्या सैनीकाच्या मनात पाप आल. त्याना तिची अंगठी चोरली आणि तिला ठार मारून तो पळून गेला म्हणे. मग पुढे वर्षभरात तो मेला. त्याला म्हणे कोणत तरी लहान मूल दिसत होत मरताना अस लोक सांगतात. एवढ सांगून राहूल थांबला. एक दिर्घ श्वास घेऊन म्हणाला. ही जी अंगठी माझ्या जवळ आहे ती तीच अंगठी . आणि आजही म्हणे ते अर्भक आपल्या आईच्या अंगठीच रक्षण करत.
..................................................................................................................................................................................
त्या रात्री खूप उशीर झाला म्हणून राहूल माझ्याकडेच राहीला. आणि सकाळी तसाच चहाही न घेता निघून गेला. तसा विक्षीप्त वागायचा खरा कधीतरी. मग काही दिवस त्याची काहीच खबर बात नव्हती. आणि अचानक बातमी कळली की राहूल गेला. म्हणजे वारला. काही आजार नसताना. डॉक्टरांनी निदान केल की हार्ट फेल. पण बहूदा त्यांनाही खात्री नसावी नक्की मृत्यूच कारण काय असाव ह्याबद्दल.
..................................................................................................................................................................................
मी गेले काही दिवस विचार करतोय. त्या गोष्टी पून्हा आठवायचा प्रयत्न करतोय. मला ती अंगठी सापडण. तो लिबलीबीत स्पर्श. कोणाचा होता? त्या मृत अर्भकाचा तर नसेल. पून्हा अंगावर काटा आला. ते अर्भक आईच्या अंगठीच रक्षण करतय म्हणे अजून. ती अंगठी ज्याला ज्याला मिळतेय त्याचा मृत्यू होतोय. मग मी जीवंत कसा? का माझ मरण कोणी दूसरा अंगावर घेतोय? आधी मोती, मग राहूल. म्हणजे ? म्हणजे ? माझ मरण टाळायच असेल तर काहीतरी तातडीने कराव लागणार खास.
....................................................................................................................................................................................
आज मी देसायांच्या मूलाला जेवायला बोलवलय. ड्रींक्स आहेतच बरोबर. त्यालाही थोडस आश्चर्य वाटल. पण यायला तयार झालाय तो. माणसाला आपल आयुष्य खूप प्यार असत नाही का हो?
******************************************************************************************
समाप्त

विषय: 
प्रकार: 

खल्लास लिहिलंय!! शैली आवडली तुझि!

अरे ही अश्शीच्या अश्शीच कथा गुलमोहरावर मला वाटता एक्-दोन वर्षापूर्वी वाचलेली आहे. कुणी लिहीली होती आठवत नाही..तूच लिहीली होतीस का..?
चू.भू.दे.घे.

आवडली..
वाचता वाचता अंगावर काटा आला..

केदार....सहीच आहे गोष्ट, मतकरींची 'ऐक टोले पडताहेत' आठवली.

केदारभाऊ, लिहिलयस छान पण अर्धवट सोडून दिल्यासारख वाटतय! Happy
दिसाईन्च्या मुलाच पुढ काय झाल?????

रत्नाकर मतकरी स्टाईल...

सगळ्यांचे धन्यवाद मनापासून Happy
.
योग : अशी कथा आली होती का आधी? ती मी लिहलेली नव्हती. हे कथाबीज माझ्या एका मित्राने सूचवल आणि मी त्यात थोडासा फेरफार करून माझ्या पद्धतीने लिहीण्याचा प्रयत्न केलाय Happy
.
लिम्बूदा : नाही हो. अर्धवट नाही सोडलीये कथा. तस वाटतय का पण. मग ही माझ्या लिखाणातली त्रुटी असेल Sad पूढच्यावेळी नक्की चांगला प्रयत्न करेन मी Happy
.

केदोबा
अरे घाबरलो रे.
तु त्या चाफ्याच्या नादी लागुन भुतकथा लिहायला लागलास की. Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

केद्या एकदम झकास रे ! तु पण आता भुताखेतांच्या नादी लागलास तर ! भुत्या म्हणतो तशी 'ऐक टोले पडतायत' ची आठवण करुन देते कथा. आणखीही खुप फुलवता येईल. ( हे दुसर्‍याला सांगायला मजा वाटते ) Happy Lol पण अप्रतीम लेखनशैली आहे दोस्त तुझ्याकडे. इतके दिवस काय उनाडक्या करत होतास रे ? तु लिही खुप छान लिहू शकतो रे तु !

ही कथा वाचली त्याच दिवशी मला रस्त्यात अन्गठी मिळाली...

मायबोलीकरहो, पुढची कथा अशी केली तर?

....................................................................
....................................................................
आमचे वडील, म्हणजे सुप्रसिध्द वकील देसाई साहेब- गेले अन मी माझ्या आयुष्यातील पहिली केस जिंकली. योगायोगाचं मला नवल वाटलं. कोणाचं आयुष्य कसं तिरपागडं वळण घेईल, काही सांगता येत नाही.
....................................................................
त्यानंतर माझी घटस्फोटाची केस. बायको चक्क प्रेग्नंट होती. माझ्या बाजूने केसमध्ये काहीच दम नाही, हे मला कळून गेलं. तसा लहानपणापासूनच मी हुशार म्हणून प्रसिध्द. वयात आल्यावर काही लोक विक्षिप्त म्हणू लागले, एवढंच. त्या लोकाच्या बाजूने चक्क माझ्या बायकोनंच बोलावं?
कार अपघातात बायको गेली. पोटातल्या पोरासकट. मी स्वतःला वाचवलं. खुप दारू प्यालो होतो म्हणे मी.
पण तसा मी कितीही प्यालो तरी बुध्दी माझी शाबूत असते...
....................................................................
त्यानंतर एका मोठ्या राजकीय पुढार्‍याची केस जिंकल्याबद्द्ल माझी मिरवणूक निघाली. दुसर्‍याच दिवशी!
....................................................................
मला आजकाल व्यसनच लागलंय म्हणाना. प्रत्येक केसच्या आदल्या दिवशी कोणाचा तरी शेवट बघायचं. खरं तर देवानं जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा देवानं ठरवल्यावर किंवा त्याच्याच कर्मानं जायला हवा. पण काहींची जगायची लायकीच नसते. त्यांच्या शेवटात आपला हातभार लागला तर बिघडलं कुठं?
लोक मला उगीचच विक्षिप्त म्हणतात. माझ्या बुध्दीवर, यशावर जळतही असतील..
....................................................................
उद्या केस आहे म्हणुन सकाळपासून अस्वस्थ होतो.
मग संध्याकाळी माझ्या ऑफिसमधल्या राकेशनं मला 'जेवायला या' म्हणून सांगितलं..
माझ्या अंगात उत्साह सळसळला. राकेश चांगला आहे, पण एकटाच आहे. बिच्यार्‍याला आयुष्य म्हणजे नरक वाटत असेल नाही?
चला, जाऊद्या. आपण आपल्या परीनं होता होईल तेवढी मदत करावी, हेच बरं...
....................................................................
....................................................................

मस्तच साजीरा Happy नाण्याची दूसरी बाजू Happy पण अशी तुटक नको पूर्ण कथा लिहा Happy
.
आयला चाफ्याने प्रतिक्रीया दिली म्हणजे अगदीच काही टाकाउ झालेली नाही कथा Happy
.
जागोमोहन प्यारे Happy अंगठी तपासून घ्या बर Happy
.
झकोबा Happy तू भिऊ नको रे Happy मी आहे ना Happy

कसले भयानक लिहिलय....
अरे अन्गअवर काटा उभ्आ राहिला ना.....

जबरी रे केदार!!!!!!!!!!

धन्यवाद चिन्या Happy
अपेक्षा: न घाबरता वाच बघू Happy

केदार, आज वाचली मी ही कथा... आवडली... Happy
मला पण मतकरींची कथा आठवली... त्याच कथासंग्रहात अजून एक हातमोजा नावाची गोष्ट पण होती...
चांगलं लिहीलयंस.. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा! Happy

आई शप्पथ!! केदार कसली लिहिली आहेस कथा.
आणि साजीरा, मस्तच रंगवली आहेस रे कथा-- पुढचा भाग. जबरीच!!!!
अजुन खुलवली तर अजुनच मजा येइल.
अनघा

आभार दक्षीणा आणि अनघा Happy

Happy

******************************
__"()"
\__/ शुभ दिपावली !!!!!!!!!!!
दिसलीस तू, फुलले ॠतू

कूल!!!!!!!!!!!!!

साजिराचा प्रतिसादपण छान होता! त्या वकिलाच्या प्रेग्नंट सुनेचे बाळ मग त्याच्या बापाचा बदला घेतं त्या आंगठीच्या माध्यमातून! काय म्हणतोस?

धन्यवाद प्रिया , जाई जुई Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ