गणपती बाप्पा मोरया!!! : मानाचा पाचवा गणपती - केसरी वाडा गणपती.

Submitted by शोभा१ on 24 August, 2012 - 03:13

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पुण्यात सन १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तो हेतू आता कुठेच पहायला मिळत नाही. आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप पाहून फ़ार वाईट वाटते. असो.
पुण्यातला मानाचा पाचवा गणपती ’केसरी वाडा’ गणपती. याची स्थापना, टिळक पंचांगाप्रमाणे होते. यावर्षी गणेश स्थापना, मंगळवारी, २१ तारखेला झाली. तुम्हीही दर्शन घ्या. Happy

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ९७ वर्षापूर्वी, १९१५ साली, केसरी वाड्यात केलेल्या भाषणातील त्यांचा आवाज, आज संध्याकाळी ६- ६.१५ वाजता ऐकवणार आहेत. ज्याना ह्या संधीचा फ़ायदा घ्यायचा असेल त्यानी आज संध्याकाळी ६ वाजता केसरी वाडा येथे गणपती मंडपात जावे. Happy

१. गणपती बाप्पा मोरया.

DSCN3936

२. नविन गणपती, गणपती मूर्ती, आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची मूर्ती.
DSCN3941
३.गणपती मंदीर.
DSCN3942

४.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
DSCN3943

५.तिथे काढलेली सुंदर रांगोळी.
DSCN3945

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

अरेव्वा...केसरीवाड्यातल्या गणपतीची स्थापना झालीसुद्धा! Happy

सुंदर मुर्ती!
टिळकांचा आवाज ऐकण्याची इच्छा तर आहेच. पण कसं जमेल ते जमो.

टिळक पंचांगानुसार झाली असेल स्थापना... दाते पंचांगानुसार गणपती १९ सप्टेंबरला आहेत.

हा दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात काढलेला फोटो

DSC06479_1.JPG

टिळक पंचांगानुसार झाली असेल स्थापना>>>

आमच्या घरी (आईकडे) सुद्धा ५-६ वर्षापुर्वीपर्यंत टिळक पंचांग वापरात होते. एरवी काही वाटायचे नाही पण दर ४ वर्षानी गणपती आणि दिवाळी वेगळ्या वेळी यायचे ते फार पकाऊ वाटायचे. सणासुदीचे वतावरणच नसायचे. शेवटी मी आणि बहिणीने ते बदलून दाते पंचांग करायला लावले.

आताही बाबांची गणपती बसवायची फार इछा होती. पण बिचार्यांचे आमच्या पुढे काही चालले नाही.

मंगलमुर्ती मोरया....__/|\__
धन्यवाद श्रींचे दर्शन घडवल्याबद्दल.