वर्तुळ

Submitted by हर्ट on 23 August, 2012 - 07:01

वर्तुळ

माझ्याभोवती माझ्या
नैसर्गिक मर्यादांचं
कुंपण वेढलेलं आहे
त्यापलिकडे
मला माझं आकाश
विंधायचं आहे
नव्या चंद्रांना शोधायचं आहे!

माझ्या
सिमित ... पर्याप्त
स्वकेंद्रीय वर्तुळात
गुरफटून
माझा अभिमन्यू झाला आहे
ठरलेल्या चाकोरीच्या
आत आत घुटमळणारा
श्वास नकोसा झाला आहे!

माझ्या अस्थिर जिवाची
अविरत अथक धडपड
सुरु असतानाच
'हे विश्वची माझे घर'
असे मला आकळते
आणि ओंजळभर चंद्र
वार्‍यावर भिरकावून
फक्त एक
स्थिर बिंदु
होऊन जावेसे वाटते आहे...

- बी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद संर्वाचे!

पेशवे, तुम्ही माझ्या कवितेवर का हसत अहात? मी तुमच्या कवितांची स्तुती करावी आणि तुम्ही.. तुम्ही पेशवे!!!!

ओंजळभर चंद्र
वार्‍यावर भिरकावून
फक्त एक
स्थिर बिंदु
होऊन जावेसे वाटते आहे...

हे काही कळेना. काहीही आहे का हे? बिनबुडाच्या शब्दांची सरळ वाक्ये मधे तोडून केलेली कवित आहे का ही?

पेशवे.. मी गम्मत म्हणून तसे लिहिले. स्मित का केलेस ते कळले मला.

मोहिनी पवार, धन्यवाद. तुझे लेखन वाचायला आवडेल.