भोलागडी.......................! भाग २

Submitted by श्रीमत् on 23 August, 2012 - 12:13

http://www.maayboli.com/node/37250 (भोलागडी भाग १ वाचण्यास येथे टिचकी मारा.)

दिवसभराची काम आटपुन दिवेलागणीच्या सुमारास आबासाहेब घरी आले. त्यांच्यापाठोपाठ अशोकही घरी आला. "या अशोकराव तुमच्यासाठी खुशखबर आहे. काय झाल आबा?. " अरे काही नाही सकाळी्च पेन्शन आणायला गेलो होतो ना तेव्हा तसाच जिल्हा परिषदेच्या ऑफिसात जाऊन आलो लवकरच आपल्या शाळेला अनुदान आणि शिक्षक मिळणार आहे. त्यात यात्रा दहाच दिवसांवर आली आहे.
एक दोन दिवसात मिटिंग घेऊन सर्व तयारी केली पाहीजे.

"व्वा काय सांगता आबा अशोक खुश होऊन म्हणाला. चला या गावच्या गढुळ झालेल्या वातावरणात काहीतरी चांगल ऍकायला मिळालं. एवढ्यात आतुन आवाज आला बापबेट्यांच संभाषण संपल असल तर हात पाय धुऊन आत या पान तयार हायती.

रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झाली. अशोक ह्या सर्व प्रकरणाचा विचार करत बिछान्यावर आडवा झाला. त्याच्या मनात एक ना हजार शंका आता घर करु लागल्या. आपण काय करतोय याची पुर्ण जाणीव असुनही आता मध्येच हे सुमीचं काय प्रकरण आहे? का आई म्हणते तस खरचं काही असतं. माडीच्या खिडकीतुन छान हवेची झुळुक येत होती. विचारांच्या गर्तेत त्याला कधी डोळा लागला ते कळालच नाही.

मध्यरात्री हळच अशोक ला आपल्याला कोणीतरी हलवुन जाग करत आहे याचा भास झाला. सुरवातीला त्याने दुर्लक्ष केल पण परत तेच आता मात्र त्याला पुर्ण खात्र्री झाली की आपल्याला नक्कीच कुणीतरी हलवले. त्याने तोंडावरची वाकळ बाजुला केली. तश्या माडीच्या खिडक्या जोरात उघडझाप करु लागल्या आत येणारया वार्‍याचा रोरावणारा आवाज तो स्पष्ट पणे ऍकु शकत होता. तो खिडकीच तावदान लावयला गेला आणि समोरील द्रुश्य पाहुण अवाक झाला. दोन डोळे त्याच्याकडेच रोखुन बघत होते. त्याला हातवारे करुन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याने झटकन कपाटातुन विजेरी काढली आणि तो खाली गेला. तशी ती आक्रुती त्याच्यापासुन दुर जाऊ लागली. अशोकला आपल्या बाजुला कुणीच दिसत नव्हते. समोर विजेरीच्या प्रकाशात तो वाट शोधत चालु लागला.आपल शरीर आता आपल नसुन आपण कोणत्या तरी वेगळ्याच विश्वात अलगद तरगंत आलो आहोत याची जाणीव त्याला झाली. थोड्या वेळाने ती आक्रुती चालायची थांबली. आणि पुन्हा अशोकला खाणाखुणा करु लागली. पण त्याला काहीच समजेणा. त्याने आजुबाजुला पाहीले आणि आपण कशात तरी रुतत खाली जात आहोत म्हणुण विजेरी आजुबाजुला फिरवली तस त्याच्या काळजात धस्स झालं. तो दुसरीकडे कुठेही नसुन भोलागडीतल्या बांबराच्या मधोमध होता. चारी बाजुला फक्त तळ्याच हिरवगार पाणी आणि त्याला रोखुण पाहत काहीतरी सांगणारी सावली. अशोकला जोरात ओरडावेसे वाटत होते. पण त्याच्या गळ्यातुन आवाजच निघत नव्हता.
तो त्याचे हातपायही हलवु शकत नव्हता. हळुहळु त्याचा संपुर्ण देह पाण्याचा खाली जात होता. आधी पाय मग कंबर , मान आणि शेवटी…………….! एक मोठ्ठा बुडबुडा पाण्याच्या तरंगातुन वर आला बांबरातल हिरवगार पाणी त्रुप्तीचा ढेकर देऊन पुन्हा शांत झाल होतं.

आईईईईईईईईईईगंग्ग्ग्ग्ग्ग..........आणि मध्यरात्री पुन्हा तीच जोरदार किंकाळी सार्या गावात दुमदुमली. तसा अशोक जोरात दचकुन ऊठुन बसला त्याच संपुर्ण शरीर घामाघुम झाल होतं. आपल्याला पडलेल्या या विचित्र स्वप्णाचा त्याला काहीच अर्थ लागत नव्हता. तो हलकाच बिछान्या वरुन ऊठला. उठल्यानंतर त्याला जाणवल की आपल्या संपुर्ण शरीरातील त्राण गेल आहे. कसाबसा चालत माठाजवळ गेला आणि थंड पाण्याचे हाबके त्याने स्वताच्या तोंडावर मारले. थोड पाणी पिल्यानंतर आता त्याला बर वाटु लागलं होतं.

नेहमीप्रमाणे नानु गुरव भल्या पहाटेच घागर घेऊन भोलागडीच्या दिशेने निघाला. रात्रभर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर बर्यापैकी चिखल झाला होता. सकाळच्या धुक्यात चिंब वारा अजुनच अंगाला झोंबत होता. शांततेमुळे पाटाच्या पाण्याचा खळखळणारा आवाज अधिक स्पष्टपणे जाणवत होता. त्यात काल रात्रीची किंकाळी त्यानेही ऐकली असल्यामुळे कधी नव्हे ती त्याचीही पा्चावर धारण बसली होती.

चालता चालता नानु गुरव मास्तराच्या घरासमोर आला तसा समोरील द्रुश्य पाहुन सर्रकन त्याच्या अंगावर काटा उभा राहीला. घराबाहेर मस्तपैकी सडा रांगोळी केली होती. आणि खिडकीच्या आतुन दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता. त्या मंद प्रकाशातही कसली तरी सावली सरकल्याचा भास त्याला झाला. आणि उगाच वाटुन गेले की कोनीतरी आतुन त्याच्यावर डोळे वटारुन बघतय. त्याने डोळे किलकिले करुन पाहीले तर खरच दोन डोळे त्याच्याकडे त्वेषाने पाहात होते. ईतक्यात दरवाजा आतुन जोरात ठोकण्याचा आवाज ऐकु येऊ लागला. नाही सोडणार………..नाही सोडणार…….मला बळी पाहीजे……..गुरवा! जा त्यांना घेऊन या, माझी पोरं कुठ आहेत? मी कुणालाच नाही सोडणार. नानु गुरवाने घागर तिथेच टाकली आणि जिवाच्या आकांताने तो मंदीराच्या दिशेने पळत सुटला. जणु काही ती सावली त्याचा पाठलाग करत असावी.

मंदीरात शिरताच त्याने जिवाच्या आकांताने घंटा वाजवण्यास सुरवात केली. घंटेच्या अशा विचत्र आवाजाने सारा गाव जागा झाला. आबासाहेब आणि अशोकससुद्धा तडक मंदीराच्या दिशेने निघाले. मंदीरात पोहचताच पाहतात तर काय नानु गुरव तोंडाला फेस येऊन जमीनीवर पडला होता. त्याची दातखिळी बसली होती. आणि अंग तापानं फणफणले होते.तो डोळ्यांनी खाणाखुणा करुन झाला प्रकार सांगण्याचा प्रयत्न करत होता पण शरीर साथ देत नव्हते.

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीमत्, आजून येऊ द्या आणि भरभर येऊ द्या! उत्सुकता ताणली गेलीये. सामना जबरी रंगला पायजे!! Happy
आ.न.,
-गा.पै.

मस्तंच!

फक्त एक सजेशन आहे. संवाद आणि बाकी कथा हे वेगवेगळ्या पॅरा मध्ये लिहाल का? वाचताना गोंधळल्या सारखं होतं..

गा.पै. एकदम जबरी Happy
निलिमा.धन्यवाद.
भानुप्रिया तुमच्या सजेशनचा नक्की विचार करेन. धन्यवाद. Happy

चांगला वेग आहे कथेचा.

भानुप्रियाशी सहमत.

"या अशोकराव तुमच्यासाठी खुशखबर आहे. काय झाल आबा?. " >>> यात दोघांच्या तोंडची वाक्य एकाच ठिकाणी आली आहेत.

पुढील भाग लवकर येऊद्यात.

आबासाहेब.

छान कादंबरी आहे, पण पहिला भाग मोठा होता , आताचा भाग फारच छोटा झालाय असे वाटतेय. पण उत्सूकता छान ताणलीय.

पु.ले.शु

मस्त