आक्षेप - शेवट सुचवा

Submitted by एस अजित on 25 March, 2010 - 11:10

'बेटा हे माझे तुला शेवटचे पत्र. तुझ्या मनात माझी काय प्रतिमा शिल्लक राहीली आहे मला माहीत नाही. ती कशी असावी याचा माझा काही आग्रह नाही, पण माझ्या मनातील विचार तुला कळावे म्हणून हा पत्रप्रपंच.

तो माझ्या आयुष्यात आपल्या बाबांच्यापुर्वीच आला होता. बी.ए. ला आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. त्याच्यासोबत असताना मला एक छानशी अनुभुती होत असे. सुरक्षित वाटत असे. विविध विषयांवर एकमेकांचे विचार ऐकणे, तासंतास एकमेकांशी बोलत राहणे, महाविद्यालयातील विवीध कार्यक्रमात दोघांनी मिळुन भाग घेणे सगळं छान सुरु होतं.

बी.ए. च्या दुसर्‍या सेमिस्टरला आपले बाबा आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजु झाले. अल्पावधीतच ते आमच्या वर्गात प्रिय झाले. आमच्यासोबत ते बर्‍याचवेळा येत असत. आमच्या वयातील अंतर काही फार नसल्याने ते आम्हाला आमच्यातील एक वाटत असत. त्याच्यातील आणि माझ्यातील जवळीकीचा अंदाज सुरुवातीलाच बाबांना आला. त्याबद्द्ल त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा देखिल केली होती.

पहिलं वर्ष व्यवस्थित पार पडलं. आप्पांनी माझ्यासाठी स्थळं बघायची का अशी आईकडे विचारणा केली. आईनं ते माझ्या कानावरं घातलं. बी. ए. पुर्ण होऊ दे असं मी त्यावेळी आईला सांगुन वेळ निभावून नेली. या संदर्भात आप्पांशी स्पष्टपणे मी बोलणे त्याकाळी अजिबातच शक्य नव्हते. जी काही चर्चा व्हायची ती आई मार्फत.

मी हा प्रसंग त्याच्या कानावर घातला. शिक्षण अजुन सुरु असल्याने काय करावे असा प्रश्न होताच. तरी मी घरी तसे सांगावे असं त्याचं मत होतं. माझ्याने त्यावेळी हिंम्मत झाली नाही, पण अगदीच प्रसंग उभा राहील त्यावेळी धीर करु असं ठरविले.

तसा प्रसंग एवढ्या लवकर समोर उभा ठाकेल असे वाटले नव्हते. एक दिवसं कॉलेजसाठी निघतांना आईने मला ते सांगितले एक स्थळ सांगुन आले आहे. उद्या ते आपल्या घरी येणार आहेत तुला बघायला, आणि मुलगा तुमच्याच महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पायाखालची जमिनच सरकल्यासारखे वाटले.

आईला सगळा प्रकार सांगितला. आई प्रचंड घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. ती मटकन खाली बसली. आप्पाना हे कसे सांगावे हा गहन प्रश्न तिच्यासमोर उभा राहीला. मीच तिला आधार देऊ लागले. थोड्या वेळाने शांत झाल्यावर तिने मला महाविद्यालयात जायला सांगितले. म्हणाली मी बोलुन बघते आप्पांशी. ऐकतील की नाही हे मी नाही सांगु शकत. घरातुन निघताना आईला विचारले मुलाचे नांव काय ? आईने आपल्या बाबांचे नाव सांगितले. मला हसावे की रडावे तेच कळेना. धीर करुन महाविद्यालयात गेले.

त्याच्या कानावर सगळं घातलं. दोघेही गंभिर झालो. थोड्यावेळाने आपले बाबा आमच्या जवळ आले. मला विलक्षण संकोचल्यासारखे झाले. काय विचित्र परिस्थितीत मी अडकले होते माझं मलाच ठाऊक. काय करायचं ठरवलं आहे ? आपल्या बाबांनी आम्हाला सरळ सरळ प्रश्न केला. सरं तुम्ही या स्थळाला नकार द्या. काय म्हणून ? आपल्या बाबांनी मला विचारले. माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले.

दोघांनी माझी समजुत काढ्ली. आप्पा काय म्हणतात यावर संगळं अवलंबून होते. घरी जाऊन काय वाढुन ठेवले आहे याची भयंकर धास्ती वाटत होती. भीत भीत घरात प्रवेश केला. घरात विलक्षण शांतता होती. घरात फक्त आईच होती. तिच्यासमोर उभी राहीले. आईने मान हलवुनच सांगितले. नाही. शक्य नाही.

संपले. माझ्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. आता काय? थोड्यावेळाने आप्पा बाहेरुन आले. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर बसुन मला समोर उभे केले. माझ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले. तुला कसे सांभाळेल तो? शिक्षण सुरु, नोकरी नाही. आप्पा नोकरी मिळेल ना बी. ए. झाल्यावर. आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय? तो आपल्या जातीचा नाही त्यामुळे हे शक्य नाही. उद्याच्या तयारीला लागा, आणि हो या प्रकाराची कुठेही वाच्यता केलेली मी खपवून घेणार नाही.

माझे प्राणच कंठाशी आले. आता सगळं काही आपल्या बाबांच्या हाती होते. दुसर्‍या दिवशी तो सोपस्कार पार पडला. आता आपल्या बाबांकडून काय उत्तर येते यावर संगळं अवलंबून होते. दुसर्‍या दिवशी मला महाविद्यालयात जाण्याची हिंम्मतच होईना. काय करावे काही सुचत नव्हते. पण गेले नाही तर त्याच्याशी बोलणे कसे होणार या विचाराने मनाचा निग्रह करुन मी महाविद्यालयात गेले. आपल्या बाबांनी आम्हाला दोघांना बोलावुन घेतले. परत एकदा विलक्षण विचित्र परिस्थीती उभी राहीली.

आपले बाबा आम्हाला म्हणाले तुम्ही थोडं धाडसं केलं तर काही बिघडणार नाही. काही काळानंतर संगळं काही सुरळीत होईल अश्या घटना घड्ल्या आहेत. त्यात आजकाल एवढं विशेष राहीले नाही. मी तुमच्या सोबत आहे. त्याचं म्हणणं होतं मी आप्पांना समजवावे. त्याला आमच्या नात्यात कुणाचाही आक्षेप नको होता. जे कधीही शक्य नव्हते.

मग माझ्या अग्निदिव्याचा दिवस उजाड्ला. आपल्या बाबांचे आणि माझे रितसर लग्न झाले. एका जिवलग मित्राप्रमाणे त्यानी मला सांभाळले. लग्न झाल्याबरोबर पहिल्या एकांतात त्यांनी मला विचारले तुला त्याच्याकडे जायचे आहे का? आता तु माझी बायको आहेस, आणि मी तुझ्या सोबत आहे.

मी आपल्या बाबांना विचारले सगळं माहीत असुन देखील तुम्ही लग्नाला का तयार झालात? ते म्हणाले हे बघ मी तुला नकार दिल्याने काय फरक पडला असता? मला आधीपासुनच सगळं माहीत होतं म्हणून ठीक, त्यामुळे तुझ्या मनात अपराधी भावना निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. समजा मी नकार दिला असता आणि तुझं लग्न तिसर्‍या कुणाशी झाले असते तर तिघांची फसवणूक झाली असती. मी तुला परत एकदा सांगतो, तुला त्याच्याकडे जायचे असल्यास माझी हरकत नाही फक्त जाण्यापुर्वी सांगून जा.

माझ्यात तेवढी हिंम्मत नव्हती. मनाचा निग्रह केला. आपल्या बाबांचा स्विकार केला. तुझा जन्म झाला. तुझं शिक्षण, लग्न, तुझं मातृत्व संगळं व्यवस्थित पार पडलं तु सुखात आहेस हे बघुन जीवन धन्य झाले. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली. विचारले तुला त्याच्याकडे जायचे असेल तर तु अजुनही जाऊ शकतेस.

मधल्या काळात आई गेली, आप्पादेखील गेले. हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का? माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.'

या कथेचा शेवट ती आपल्या आयुष्याच्या शेवटाने करते असा माझा विचार होता. तो मी तुमच्यावर सोपवतो. वाचकांनी आपल्या सोईचा शेवट सुचवावा.

१. मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली.

२. आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतच आयुष्य घालविले.

३. आक्षेप आणि परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.

मित्रहो प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. धन्यवाद.

गुलमोहर: 

आपल्या दोन मुलातलं एक मूल तुमचं नाही हे सांगून प्राण सोडणा-या कलावंतीण मधल्या उषा नाईकची आठवण झाली...त्या नायकाची जी अवस्था झाली तीच इथे वाचकांची झालीये Proud

१. मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली.
२. आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतच आयुष्य घालविले.
३. आक्षेप आणि परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.>>>>>>>>>

मला या तीनहि हुन अधिक चांगला शेवट सुचला आहे.

मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली. आईने परिस्थितीशी तड्जोड न करुन त्याच्याबरोबर आयुष्य घालविले. नंतर परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.

आपल्या दोन मुलातलं एक मूल तुमचं नाही हे सांगून प्राण सोडणा-या कलावंतीण

तो चित्रपट पडछाया ना?

ते बोगोर बुदुर म्हणजे इश्क करे टापुर टिपिर सारखच वाटत. आणी हे लेखक महाशय कुठे परागंदा झाले. प्रतिसादातील मुक्ताफळे वाचुन गायब झाले वाट्टं.

मुलीला आपले बाबा किती हुषार आहेत याची कल्पना आली. अजूनही त्याच्याकडे जायचं का असं विचारून त्यांना सुटका तर हवी आहे पण स्वतःचं उदात्तीकरणही ते करू पाहत आहेत हे तिच्या लक्षात आलं. मग तिने आईला समजावलं.

आई म्हणाली..

बरं झालं बाई ! माझ्या मेलीच्या हे डोक्यातच आलं नाहि. तू म्हणतेस तसंच असेल. आपल्या बाबांनी या पद्धतीने अनेकांना गंडवलं आहे पण माझ्यावरच ते प्रयोग करतील असं वाटलं नाही.. बरं झालं गं बाई तुला सांगितलं ते. आता बघतेच यांच्याकडं !

आई,

तुझं पत्र वाचलं. लग्नाचा घोळ झाला त्यावेळीं, त्या वयात व त्या आवेगात तूं आत्महत्या केली नाहीस; त्यामुळे, आतां तूं तसं कांही करशील ,किंवा करावंस, असं मला अजिबात वाटत नाही.
मी पण एव्हाना दुनिया पाहिली आहे, हे कां विसरतेस ? शाळा-कॉलेजमधे एकमेकांबद्दल तुम्हाला वाटलं तसं वाटणं याची अगणित उदाहरणं आहेत; त्यापैकीं १% तरी प्रकरणांचं पर्यवसान लग्नात होतं का? तरी पण उरलेल्या त्या ९९% टक्के मुला-मुलींची इतर कुणाबरोबर लग्न होऊनही त्यातल्या बहुतेकाना खरंखुरं प्रेम मिळतंच ना , अगदीं आपलं शाळा-कॉलेजातलं पहिलं प्रेम एकमेकांना सांगूनही त्यांच्यातल्या प्रेमाला, विश्वासाला तडा न जातां !! स्वतःच्या त्या प्रेमाचा नसता बाऊ करून तूं स्वत:च्या आयुष्याचा उगीचच विचका करून घेतलास व घेतेयस असं नाही वाटत तुला ?
अर्थात, त्या सर्वांपेक्षां तुला किती आत्यंतिकतेने तुझं पहिलं प्रेम अजूनही जाणवतं यावर मी कसं बोलूं ? पण, कसल्यातरी आभासी गोष्टीसाठी खर्‍याखुर्‍यावर लाथ मारण्यापूर्वीं पुन्हां एकदां विचार कर, इतकंच.

या सर्वाला बाबाही जबाबदार आहेतच; पण कसे, हें तूं आम्हाला सोडून गेलीसच तर त्यांची समजूत काढताना मी त्यानाच सांगेन !

*******
बेटा,
माझ्या डोळ्यात अंजनच घातलंस तूं ! तुझ्या वयाची असताना मला जर एवढी अक्कल असती, तर उगीचच मृगजळामागे अशी खुळ्यासारखी धावत राहिले नसते मी आयुष्यभर !! आय अ‍ॅम प्राऊड ऑफ यू माय बेबी .

*****

<<<आपले बाबा, आपले बाबा, आपले बाबा..>>> Rofl

मला तर किती वेळ कळ्लच नाही. लेख्नन नक्की कोण करतय?????
म्हणजे....मुलीची सावत्र बहीण? बाबाची नाजायज मुलगी की....अजून कोण?????

<<<आप्पांनी माझ्यासाठी स्थळं बघायची का अशी आईकडे विचारणा केली.>>>
त्या काळी बायकांची परवानगी घेतली जायची????????? अशक्य

बाकी सर्व प्रतिसाद अशक्य Rofl

कधी उन्च अम्बरी, कधी खोल डोही गेले ए ए ए

माझे मन तुझे झाले, माझे मन तुझे झाले, माझे मन तु......... झे झाले मन झाले.

हे वरचे कथालेखक अजीत, त्या माझे मन तुझे झाले चे ( ई ई ई टिव्हीवरची रात्री साडे आठ वाजता) लेखक आहेत का? सेम इस्टोरी. नायक शेखर प्रोफेसर, नायिका शुभ्रा त्याच कालिजात आणी माकडासारखा दिसणारा आणी शारुखची भ्रष्ट नक्कल करणारा दुसरा येडा नायक यश.

पक्की डोकेउठाड सिरीयल आहे. त्या यशला आणी त्या बावळ्ळ्ट्ट शुभ्राला चान्गले दणकावेसे वाट्टे.

Pages