जीवन माझे..

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 August, 2012 - 11:36

जीवन माझे परीट-घडीचे
वापरले! विस्कटले नाही...
अनुभवांचे अत्तर त्यावर
शिंपडले ! दरवळले नाही...

क्षणा-क्षणाने संपे कण-कण
मोजत बसले ! जगले नाही...
आकांक्षांचे पिक लावले
तगले पण, फळ-फळले नाही.

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy