एक सुर्यास्त पर्थमधला....

Submitted by विशाल कुलकर्णी on 17 August, 2012 - 03:42

त्या दिवशी डॅरेनतर्फे (माझा बॉस) आम्हाला, म्हणजे मी, हान यांग(चीन), विन्स्टन कोह(सिंगापूर), किथ डॉयर(ईस्ट ऑस्ट्रेलिया) आणि सारा मार्शल(न्युझीलँड) अशा आमच्या गृपला डीनरचे आमंत्रण होते. अजुन बराच वेळ असल्यामुळे अस्मादिकांनी समुद्रकिनार्‍यावर जावून सुर्यास्त अनुभवण्याची कल्पना मांडली जी सर्वानुमते संमत झाली. आम्ही राहात असलेले हॉटेल आणि समुद्रकिनारा यांच्यामध्ये एका पार्कींग लॉटचेच काय ते अंतर होते. त्यामुळे सगळे चालतच निघालो...

हॉटेलच्या पार्किंगमधून बाहेर पडलो की समोर उभा राहणारा क्लॉक टॉवर..
प्रचि १

प्रचि २
हॉटेलकडून रस्त्याच्या त्या बाजुला असलेल्या समुद्रकिनार्‍याकडे जाताना...

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६
ही जी एखाद्या बुरुजासारखी बांधकामं दिसताहेत ना, तीथे स्वच्छ पाण्याचे नळ, तसेच शॉवर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. समुद्रकिनार्‍यावर फिरुन आल्यानंतर हाता-पायाला लागलेली रेती झटकून स्वच्छ होण्यासाठी.

प्रचि ७

प्रचि ८
मधुनच आपले अस्तित्व दाखवून देणार्‍या इंद्रधनुष्याचे मनोहारी दर्शन झाले आणि हरखून गेलो.

प्रचि ९

प्रचि १०
त्याचवेळी समुद्राच्या विरुद्ध बाजुला म्हणजे शहराच्या दिशेला देखील अजुन एक इंद्रधनुष्य दिसु लागले होते

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
सागर किनार्‍यावर येणार्‍या पर्यटकांना सावली आणि आरामासाठी बांधण्यात आलेल्या मंडपातून टिपलेला हा फोटो

प्रचि १४
थोड्याच वेळात पावसाची एक हलकीशी सर येवून गेली आणि वातावरण बदलायला सुरूवात झाली.

प्रचि १५
परतीच्या प्रवासाला लागलेल्या भास्कररावांचे निसटते दर्शन झाले

प्रचि १६
इतका वेळ आमची गप्पांची गाडी विविध ट्रॅक बदलत धावत होती. पण आता सगळेच स्तब्ध झालो.

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
सागरकिनार्‍यावरील त्या भव्य मंडपाचा परतताना घेतलेला हा फोटो. मागे जी इमारत दिसत्येय ते 'हॉटेल रँदेव्ह्युज'! कंपनीने आमची मुक्कामाची सोय या हॉटेलात केलेली होती.

प्रचि २६
इथून थेट पोटपुजेला निघायचे असल्याने पर्थ शहराकडे निघालो. डॅरेनतर्फे ठरलेले टार्गेट मागे टाकून नवा रेकॉर्ड सेट केल्याबद्दल आमच्यासाठी {अस्मादिक आणि विन्स्टन (सिंगापूर ऑफीसमधील सहकारी)} ही खास पार्टी होती.
डॅनियल शीन (ऑस्ट्रेलिया), विन्स्टन कोह आणि अस्मादिक

प्रचि २७
मध्येच एका ठिकाणी ट्रॅफीक सिग्नलवर थांबलेलो असताना घेतलेला हा त्या दिवसातला शेवटचा फोटो.

विशाल...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यु मंडळी Happy
इंद्रधनुष्याचे दोन फोटो तेवढे माझ्या ब्लॅकबेरीने काढलेले आहेत. मध्येच पाच-दहा मिनीटे माझ्या कॅमेर्‍याची लेन्सच उघडेना. काय झाले ते कळायलाच मार्ग नाही. नंतर दहा मिनीटांनी बॅटरी बाहेर काढली व नीट पुसून परत लावली आणि आपोआपच सुरु झाला कॅमेरा Uhoh

किती स्वच्छ नयनरम्य किनारा.इथले अनेक दुर्दैवी किनारे आठवले.तरीही प्रचि ८ मधलं इंद्रधनुष्य तिरंग्यासारखं वाटलंच.. :)) छान आहेत सर्व प्र.चि.

छान फोटो.
एका देशातला किनारा, दुसर्‍या देशातल्या किनार्‍यासारखा नसतो, नाही का ?

वॉव !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

यो ते फ़ोटो खासच आहेत, अजुन बायकोला पण दाखवले नाहीत Wink
मंजु, नक्की सांगता येणार नाही, पण त्या दिवशी तरी आम्ही साधारण असाच अनुभव घेतला. मे बी शेवटी शेवटी क्षितिजावर ढग जमा झाल्याने तसे वाटत असेल Happy

सुंदर.

इंद्रधनुष्याचे दोन फोटो तेवढे माझ्या ब्लॅकबेरीने काढलेले आहेत. मध्येच पाच-दहा मिनीटे माझ्या कॅमेर्‍याची लेन्सच उघडेना. काय झाले ते कळायलाच मार्ग नाही. नंतर दहा मिनीटांनी बॅटरी बाहेर काढली व नीट पुसून परत लावली आणि आपोआपच सुरु झाला कॅमेरा >>>> हे अमानवीय मध्ये घाल. Proud

लाजो, कालच्या रवीवारीच आलो परत भारतात << अरे, काय रे हे....आधी म्हणाला असतास तर फोनवर तरी बोललो असतो.

मागे पण आला होतास ना तु पर्थ ला? परत येणर असशिल तर कळव. मी माझा फोन नंबर कळवेन Happy

Pages