तंत्र विद्येची ओळख-भाग ३

Submitted by छोटाभीम on 17 August, 2012 - 00:58

भाग १ http://www.maayboli.com/node/35261

भाग २ http://www.maayboli.com/node/37192

तर मंडळी आपण तंत्र विद्येचा आढावा घेत आहोत,बर्याच जिज्ञासू लोकांनी अधिक मोठे लेख लिहिण्या विषयी सांगितल आहे ,परंतु कार्य-बाहुल्या मुळे ते शक्य होत नाही...नंतर सर्व भाग एकत्र प्रकाशित करेन...

तर या तंत्रा मध्ये एकटोप्लाझ्म नावाच्या द्रव्याची विशेष महती आहे . एकटोप्लाझ्म नावाचे द्रव्य मानवी शरीरा सभोवती लपेटलेले असते .ज्याला ऑरा असे म्हणतात .हे द्रव्य अतिशय विरळ असून ते वायुरूप असते . या द्रव्यला जीव-द्रव्य असेही म्हणतात .

निरोगी व्यक्तीचा ऑरा चांगला सशक्त/ शुभ्र असतो ,तर एखादा किंवा अनेक शारीरिक/मानसिक रोग झालेल्या व्यक्तीचा ऑरा हा निर्बल व काळपट/पिंगट असतो

जगात अनेक ठिकाणी अनाकलनीय रोगांचे निदान करण्यासाठी / आध्यात्मिक रोगांचे निदान करण्यासाठी ऑरा रीडिंग चा आधार घेतला जातो .

तर पूर्वोल्लेखीत वामाचारी दुष्ट तान्त्रीकाना या एकटोप्लाझ्म मध्ये फार रस असतो . दुसऱ्या व्यक्तीचे एकटोप्लाझ्म पळवणे /त्यासाठी ऑरा वर हल्ला करणे यासाठी ते नानाविध उपाय योजत असतात .

हे सर्व प्रकार जाणीवेच्या निराळ्या पातळीवर घडतात ज्याला astral world असे नाव आहे. भारतीय आध्यात्म-शास्त्रात त्याला भुवर्लोक असे म्हणतात .

अमेरिका-स्थित डॉक्टर ब्रूस गोल्डबर्ग या शास्त्रज्ञाने लिहिलेल्या self-defense from psychic attacks या पुस्तकात या प्रकार बाबत सविस्तर चर्चा केलेली आहे .

तर हे शाक्त तांत्रिक रात्रीच्या वेळी व विशेषत: पहाटे सूक्ष्म-देहाने संचार करून लोकांचे व मृतात्म्यांचे एकटोप्लाझ्म पळवतात .त्यासाठी आपले भूवर्लोकीय पातळी वरील गुंड-मवाली त्यांनी पाळलेले असतात .यालाच astral group किंवा underworld असे म्हणतात .व या गुंडाना energy vampires अशी संज्ञा आहे .

हे मवाली जिवंत व मृत अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तीचे एकटोप्लाझ्म पळवतात , त्यासाठी ते स्मशानात जावून तेथील मृतात्म्यांना वश करून त्यांचे जीव-द्रव्य पळवतात .

(क्रमश:)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकटोप्लाझम नही जानते?
आमचे येथे ठोक व किरकोळ भावात एन्डोप्लाझम व एक्टोप्लाझम मिळेल.
सर्व कंपन्यांची क्रेडीट कार्डे स्वीकारली जातील.

(विक्रेता गुंड) इब्लिस.

किरण, इब्लिस जरा दम धरा.
ते आपलं थेम्बथेंब ज्ञानामृत सोडतायत ते चमचाभर तरी होऊ द्या. मग तुमची खरेदी विक्री चालू करा. Happy

छोटा भीमराव, लिहा हो तुम्ही. थोडा फार मॅटर झाला की मग आम्ही आमचे प्रश्न विचारू.
पण हे तुम्ही स्वतः अभ्यासून, अनुभवून सांगताय की इकडचं तिकडचं कॉपी पेस्ट?
स्वतः अनुभवून सांगत असल्यास मला (तरी) वाचण्याची उत्सुकता आहे.

कार्यबाहुल्यामुळे मोठे भाग टाकता येत नसतील तर दोन भाग तरी एकत्र करून टाका. विषय इंटरेस्टिंग आहे पण फार त्रोटक माहिती वाटते.
माझी एंक मैत्रीण रेकी करते, ती पण या ओरा विषयी बोलत असते. आमचा एंक मित्र अचानक गेला, तो तिला दिसायचा, ती म्हणायची कि त्याला काहीतरी सांगायचे आहे, म्हणून तो तिला दिसतो. खर खोट माहित नाही आणि मला या सगळ्या गोष्टी गोंधळात टाकतात, म्हणून जास्त खोलात शिरत नाही.
एकटोप्लाझ विषयी वाचून वाटल याचा काही संबंध असेल का म्हणून लिहितेय.

बरोबर मीमराठी जी , तुमची रेकी करणारी मैत्रीण म्हणते ते बरोबर आहे ,मृतात्मे एकटोप्लाझम च्या माध्यमातून प्रकटीकरण करून /व्यक्त होवून आपल्या अतृप्त इच्छा व्यक्त करू शकतात/,पण सर्वाना हे समजेल/दिसेल असे नाही.तुमची मैत्रीण रेकी/साधना करत असल्याने तिला ते अधिक प्रकर्षाने जाणवते .
साती जी धन्यवाद !

माझे लेखन स्वत:चे व स्वानुभवा वर आधारित आहे , मी गेल्या ५-६ वर्षापासून दिवाळी अंकात आध्यात्मिक लेखन करीत आलेलो आहे .................धन्यवाद !

मी गेल्या ५-६ वर्षापासून दिवाळी अंकात आध्यात्मिक लेखन करीत आलेलो आहे

@ छोटा भीम
अभिनंदन आणि कौतुक !!

या लेखांची लिंक मिळेल का ? किंवा स्कॅन करून टाकू शकाल का ?
किमान कुठल्या दिवाळी अंकात कुठला लेख ते इथं सांगाल का ? वाचनायलातून मिळवता येतील असं वाटतंय.

ज्योतिष,अध्यात्म आणि विज्ञान - लेखमाला २००६ ते २०१० पर्यंत दरवर्षी प्रसिद्ध झालेले आहेत , ज्योतिष-चितामणी या टोपण-नावाने !!!!!!!!!!!!!!!

त्याच-प्रमाणे गोव्यातून प्रसिद्ध होणाऱ्या "सुनापरांत'या दैनिकात माझ्या लेखांचे कोकणी भाषांतर प्रसिद्ध झाले आहे !