तंत्र विद्येची ओळख-भाग २

Submitted by छोटाभीम on 16 August, 2012 - 02:29

आद्य शंकराचार्य ,चाणक्य आदी थोर समाज-सुधारक आणि संत मंडळीनीही या वामाचारी तांत्रिक परंपरेची वेळोवेळी निंदा केलेली असून वामाचारी तांत्रिक आणि त्यांच्या गिऱ्हाईका ना गुन्हा सिद्ध झाल्यास देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ही दिल्याचे उल्लेख आहेत.गुरुचरित्र या ग्रंथात जारण--मारण हे अति-निंद्य कृत्य असून ते करणारा नीच चांडाळ योनीत जन्म पावतो असं उल्लेख आहे .

या सर्व काळ्या तंत्र विद्येच्या मुलाशी "सायको-काय्नेसीस"नावाचे शास्त्र आहे . मानवी मन आणि त्याच्या शक्ती /मर्यादा या अनंत आहेत .शास्त्रज्ञांच्या मतानुसार मानवी मेंदूच्या एकूण शक्तींपैकी आपण फक्त १० % शक्ती वापरत असतो .इतर शक्तींचा वापर अज्ञान /विस्मृती आणि भ्रांती यामुळे करता येत नाही .जर विशिष्ट साधना /उपासना किंवा विज्ञान-निष्ठ brainwave entrainment सारखे उपाय केल्यास मेंदूच्या या सुप्त शक्ती जागृत करता येतात .तसे केल्यास मेंदू अधिक तल्लख आणि अंतर्मन अधिक शक्तिशाली बनते .परंतु या शक्तिशाली मनाचा वापर चांगल्या कारणासाठी करायचा कि वाईट? हे शेवटी आपल्या हातात असते .

तर सायको कायनेसीस या शास्त्रात अंतर्मनाच्या अद्भूत शक्तींचा वापर करून भौतिक जगतातील काही वस्तूंवर ताबा मिळवणे शक्य होते. तसेच दुसऱ्याच्या मनावर प्रभाव टाकणे , मृतात्म्याचा माध्यम म्हणून वापर करून काही गोष्टी घडवणे हे शक्य होते.

प्राचार्य अद्वयानंद गळतगे आणि डॉक्टर प.वि.वर्तक यांच्या पुस्तकांमध्ये सदर विषयांची चर्चा आहे .तसेच "मृत्यूनंतरचे जीवन "नामक एका पुस्तकात ही अश्या अनेक गोष्टींचा उल्लेख आहे .

(क्रमश:)

भाग १ http://www.maayboli.com/node/35261

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपला अभ्यास खूप दिसतोय छोटा भीमरावजी . पण भाग जरा मोठे करा कि ,म्हणजे वाचताना एकसंध समजेल......................................................

ते करणारा नीच चांडाळ योनीत जन्म पावतो असं उल्लेख आहे .

हायला, हे भारी है की.... पुढचा जन्म कुत्र्याचा की पिंपळाचा हेही बाकीच्याना फिक्स नसते.. आणि वामाचारी लोकाना मात्र दुसरा जन्म नक्की चांडाळाचाच म्हणजे माणसाचाच , हे मात्र फिक्स... अध्यात्मात असं म्याच फिक्सिंग म्हणजे इतरांवर अन्याव न्हाई का?

आजकाल चांडाळ कुठे दिसत नाहीत. सगळे वामाचारी आतमे मुक्त झाले की काय?

--- ( चांडाळ गेल्या जन्मी वामाचारी असतो.. मी तर शेळी हाये, म्या गेल्या जन्मी कोण असेन? )

.... इचारात पडलेली शेळी.

या विषयाबाबत काही फ्रीथिंकिंग...नीट चर्चा केली तर खूप छान विषय आहे..

मनुष्य स्वभाव क्लिष्ट आहे. बरेचदा बऱ्याच गोष्टी ज्याला सामाजिक मान्यता नसते, ते करण्याचा कल काही लोकांचा असतो. The silence of the lambs हा सिनेमा बघावा. Dr. Hannibal Lector ची व्यक्तिरेखा खूप उद्बोधक आहे. क्राईम कशाला म्हणावा आणि कशाला म्हणू नये हे वेगवेगळ्या काळात नियम आणि मान्यता वेगळ्या होत्या..

तंत्रात ५ मकारांना मान्यता आहे.

१. मांस
२. मुद्रा
३. मदिरा
४. मैथुन
५. मत्स्य

तसे पहिले तर या वासना किंवा इच्छा प्रत्येकालाच असतात. प्रत्येकाला चमचमीत मांसाहार करावासा वाटू शकतो, दारू प्यावीशी वाटते, मैथुन तर सगळ्यांना आवडतेच, तीच गोष्ट मुद्रा (पैसा) ची.

तंत्रात माणसाच्या या आदिम ओढीचा वापर योग साधण्यासाठी करण्याचा प्रघात आहे. जर जमले तर खूप छान प्रकार आहे. पण बहुतेकदा यातच गुंतून जाणे अधिक बघितले जाते. म्हणून हा मार्ग बहुतेक लोकांना रुचत नाही.. संभोग (मैथुन) हि क्रिया खूप एकाग्रतेने करावी लागते हे प्रत्येक अनुभवी माणसाला ठाऊक असेल. जर एकाग्रता ढळली तर त्रास होतो. जर हि एकाग्रता वापरून विषय बदलता आला (जोडीदाराऐवजी ईश्वर, किंवा इतर कुठला विषय) तर या क्रियेत देखील खूप उत्कृष्ट ध्यान साधता येते.

पतंजली सांगतात कि एकाच विषयावर चित्त एकाग्र करणे म्हणजे ध्यान आणि त्या विषयाशी एकरूप होणे म्हणजे समाधी. जर संभोग करताकरता हे करण्याची कला जमली तर हे शक्य आहे. पण संभोगात दोन जीव असतात आणि दोघेही एकाच मानसिक प्लेन वर राहतीलच याची ग्यारंटी देता येत नाही. जर ती क्रिया आवडू लागली तर मग हे ध्यान राहत नाही.

तीच गोष्ट दारू आणि इतर मादक द्रव्य (अफू, गांजा इत्यादी) यांचे आहे. हे घेऊन ध्यान करायचा प्रयत्न करणारे असतातच. जर कुणी इथे गांजा घेतला असेल तर सांगा, अनुभव काय होता. अर्थात सगळे गांजेकस योगी असतात असे नाही. पण अगदी विरला एखादा योगी असतो जो कधीकधी हे द्रव्य घेऊन ध्यान करतो. पंडित भीमसेन जोशी, असे म्हणतात, कि व्हिस्कीचा एक पेग मारून मैफिलीमध्ये गायला बसत. इथे तो पेग म्हणजे मनातले inhibitions घालवायला वापरण्यात येणारे टूल आहे. तीच गोष्ट गांजा, आणि संभोगाची.

येनकेनप्रकारेण मनाची संपूर्ण एकाग्रता साधायची असेल तर काही लोक काही सपोर्ट वापरतात. हे सपोर्ट योग्य प्रकारे कसे वापरायचे आणि इप्सित समाधी कशी साधायची, या कलेला तंत्र म्हणतात.

ऑड म्हणजे मारामारी, हिंसा, असे काही करणे ज्याने मती "सुन्न" होऊन जाईल (जसे मेलेले मनुष्य खाणे, हत्या करणे इत्यादी) या गोष्टीदेखील बऱ्याच लोकांना शांती देणाऱ्या असतात. कित्येक सैनिकांना "जीव घेणे" आवडू लागते. याचा अर्थ हा नाही कि सगळेच सैनिक असे असतात आणि याचा हा देखील अर्थ नाही कि ते सगळे सैनिक ज्यांना जीव घेण्याची प्रक्रिया आवडते आहे, ते दैनंदिन आयुष्यात लोकांना मारत सुटतात. पण कधीकधी काही लोकांचे मानसिक संतुलन ढळते आणि ते सिरीयल किलर वगैरे होतात. एका सिरीयल किलर ला तीच मानसिक शांती मिळते याचा अर्थ हां आहे कि पण त्याचे संतुलन बिघडले आहे आणि तो आता इतरांसाठी धोका झाला आहे. अघोरी तांत्रिकांचे तेच असते.

इथे किती जणांनी मारामारी केली आहे? किती जणांनी बकरे अथवा कोंबडी कापली आहे? किती जणांनी मेलेल्या कोंबडीचे अथवा बकऱ्याचे मांस कापले आहे आणि धुतले आहे, रक्तात हात माखवले आहेत? किती जणांनी हातात तडफडणारा मासा पकडला आहे? बहुतेक लोकांना जे हि कामे रोज करतात पहिल्या अनुभवानंतर संवेदना बोथट होते नि त्या बद्दल काहीही वाटत नाही. पण काही लोकांना पहिल्या अनुभवाची संवेदना तितकीच, किंबहुना अधिक प्रकर्षाने राहते. हि प्रोसेस ते आधी एन्जॉय करतात आणि नंतर एन्जॉय करणे बंद होऊन यानंतर शांती अनुभवू लागतात. हे लोक प्रमाणाने समाजात कमी असतात म्हणून समाज सुरळीत चालतो.

या लोकांना वाळीत न टाकता यांना त्यांची ओढ "त्यातल्यात्यात" कमी हानिकारक प्रकारे पूर्ण करून समाजाला धोका उत्पन्न होऊ नये हा विचार आपल्या प्राचीन ऋषींनी केला आणि अघोरी प्रकार सुरु झाला. यातले बरेच लोक "ठग" बनत, गुप्तहेर बनत, सुपारी घेऊन किलर बनत आणि हत्या करीत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेला देखील असली कामे करणारे लोक हवे असत (आणि आजही आहेत). अधिक यांचे मठ दुर्गम जंगलात स्थापन करून यांचा समाजाच्या दैनंदिन व्यवहारात काही त्रास होणार नाही याची काळजी देखील घेतली जाई.

अधिक एकदा समाधी अनुभवता येऊ लागली कि बरेच लोक हि सपोर्ट सिस्टीम वापरायचे सोडून देतात. एकदा कृष्ण दिसला तर कोण वेडा कामिनीकांचनच्या मागे लागेल? तेव्हा हि लोक हे मार्ग वापरणे सोडून द्यायचे. इतर संतुलन ढळलेले लोक राजाकडून अथवा समाजाकडून मारले जात. आणि ज्यांनी वेळेत सगळे धरले आणि वेळेत सास्गले सोडले आणि धरताना अगर सोडताना संतुलन ढळू दिले नाहीत, ते योगी म्हणवतात.

नवनाथांची यांची चरित्रे एकदा वाचावीत. जाग मच्छिंदर गोरख आया, या हाकेतली ओढ काय आहे ती लक्षात येईल.. तंत्रमार्गाबाबत एक गोष्ट लक्षात घ्यायची असते कि हे एक "तंत्र" आहे. एक टेक्निक आहे. योग हे देखील एक तंत्र आहे. तंत्र मार्ग सांख्य आणि योग यांपासून खूप प्रभावित आहे.

ज्या विषयावर ध्यान करतोय त्याशी एकरूप होणे म्हणजे समाधी आणि त्या ओघात "मीपण" विसरून तो विषय होऊन जाणे म्हणजे योग. योग शब्दाचा अर्थ "मिलन" आहे, एकरूपता आहे.

जर ड्रायविंग करीत आहात, तर त्या क्रियेशी इतके एकरूप व्हायचे कि कालांतराने चालक आणि वाहन यांच्यातील द्वैत नाहीसे होऊन दोघेही एकरूप होणे, हा झाला "सारथ्ययोग".

तीच गोष्ट प्रेमाची, कर्माची, भक्तीची. हे एकरूप होता आले, स्वत्व विसरता आले कि विषयात कौशल्य प्राप्त होते, म्हणून गीतेत कृष्ण म्हणतो 'योगः कर्मसु कौशलं"..

हा योग साधणे हेच तंत्राचे देखील साध्य आहे. कुणाला सिद्धी हवी कि मुक्ती हवी, जो जे वांछील तो ते लाहो. त्यामुळे जर कुणी हि टेक्निक चुकीच्या साध्यासाठी वापरली तर दोष टेक्निक चा नाही, तर वापरणाऱ्याचा. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, टेंबेस्वामी, इतर नवनाथ, चांगदेव, इतर खूप असे योगी जे प्रसिद्ध नाहीत, त्यांनी हीच टेक्नीक मोक्षासाठी वापरली जाणतेपणी.

कित्येक संत देखील अजाणतेपणी हीच टेक्निक वापरत. माती मळणारा गोरा कुंभार इतका तल्लीन होऊन गेला कि पायाखाली मुलगा तुडवला गेला याकडे लक्ष नाही. तो राहिलाच नव्हता मुळे, माती, तो, आणि सर्व जग विठोबा झाले होते. हा क्षण म्हणजेच योग. आणि या क्षणापर्यंत गोराकुंभार ज्या टेक्निक ने पोहोचले, ती टेक्निक म्हणजेच योग आणि तंत्र. हे त्यांना माहिती होते कि नाही माहिती नाही. पण प्रोसेस हीच ती..

त्यामुळे उगाच शिव्या घालू नये. आधी अनुभव घ्यावा. आणि उचित साध्य मिळवायला जर स्वभाव अनुरूप असेल आणि रुची असेल तर तंत्र अंगीकारावे. ते सगळे लोक ज्यांनी उत्कटतेचा एक क्षण देखील जीवनात अनुभवला आहे ज्यात ते त्यांचे स्वत्व विसरले आहेत, त्या सगळ्या लोकांनी तो क्षण जाणते अगर अजाणतेपणी योगाचे तंत्र (योगाची टेक्निक) वापरून अनुभवला असतो. इतर बहुतेकांच्या सबंध आयुष्यात तो एक उत्कट क्षण कधीच येत नाही.

अंबरीश जी मनापासून आर्दिक धन्यवाद आणि आभार !!!

प्रश्न त्यांना शिव्या देण्याचा नसून जर अशा सिद्धी प्राप्त झाल्यानंतर एखादी व्यक्ती /योगी आपल्या शक्तींचा वापर नकारात्मक कारणासाठी करत असेल तर ते निंद्य आहे/,असे म्हणायचे होते मला .

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला मृतात्म्याशी संपर्क साधण्याची सिद्धी प्राप्त झाली,तर त्याने त्या सिद्धीचा वापर करून सैतानी शक्ती नां बोलवावे का? हे योग्य ठरेल का?

तसेच एखाद्या व्यक्तीला astral projection साध्य झाले म्हणून त्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील क्षुद्र स्वार्थासाठी त्या सिद्धीचा वापर करावा का ?

समजा तुमच्याशी एखाद्या व्यक्तीचे हाडवैर आहे ,परंतु ती व्यक्ती इतर जगाशी चांगली वागते,निष्पाप आहे .मग तुमच्या वैचारिक मतभेदाचा /वैराचा सूड /बदल घेण्यासाठी तुम्ही दुष्ट शक्ती त्या समोरच्या माणसावर पाठवणार का?

हे म्हणजे सुपारी किलर सारखे झाले ,असे मला वाटते ....असो
सविस्तर चर्चा पुढच्या भागात .......

छोटाभीम जी,

प्रश्न त्यांना शिव्या देण्याचा नसून जर अशा सिद्धी प्राप्त झाल्यानंतर एखादी व्यक्ती /योगी आपल्या शक्तींचा वापर नकारात्मक कारणासाठी करत असेल तर ते निंद्य आहे/,असे म्हणायचे होते मला .

कुणाला सिद्धी हवी कि मुक्ती हवी, जो जे वांछील तो ते लाहो. त्यामुळे जर कुणी हि टेक्निक चुकीच्या साध्यासाठी वापरली तर दोष टेक्निक चा नाही, तर वापरणाऱ्याचा.

मी शिव्या बद्दल बोललो ते त्या लोकांबद्दल ज्यांचे वाचन शून्य असताना उगाच तंत्राला (आणि इतर गोष्टींना) शिव्या घालीत बसतात. तुमच्या वरील मुद्द्यास मी समर्थनच केले आहे. तंत्राचा उपयोग काय वगैरे बोलणाऱ्यालोकांनी हे ध्यानात घ्यावे कि नाथ संप्रदाय (यात निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि इतर बरेच महात्मे) आणि इतर आखाडे यांनी बरेच प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध साधूसंत दिले आहेत, ज्यांचे समाजावर खूप मोठे उपकार आहेत.

याचा दुरुपयोग करणारे सुपारी किलर सारखेच आहेत. पण विविध काळात राजकीय कामांसाठी असल्या तांत्रिकांचा (सुपारी किलर्स) चा उपयोग करण्यात आला आहे. बरेचदा यांच्याकडे नवीननवीन प्रकारचे विष वगैरे असे, या लोकांना नीट सामावून घेऊन यांचे ज्ञान केमिस्ट्री मध्ये आणायचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा होता. आताही मानसशास्त्र वगैरे साठी यांच्या ज्ञानाला "थियराईज" केले तर खूप नवीन कवाडं उघडतील.

बरेचदा यांच्याकडे नवीननवीन प्रकारचे विष वगैरे असे, या लोकांना नीट सामावून घेऊन यांचे ज्ञान केमिस्ट्री मध्ये आणायचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा होता.

ऑलरेडी हे झालेले आहे, सुरुच आहे.
विषनिर्मिती शास्त्र --- टॉक्सिकॉलॉजी

कुणाला सिद्धी हवी कि मुक्ती हवी, जो जे वांछील तो ते लाहो. त्यामुळे जर कुणी हि टेक्निक चुकीच्या साध्यासाठी वापरली तर दोष टेक्निक चा नाही, तर वापरणाऱ्याचा.

१. सिद्धीचा भौतिक वापर करायचाच नसेल तर ती मिळवायची कशाला?
२. दृश्य- भौतिक उपयोग केला नाही, तर अमूक एक सिद्धी मिलाली हे सिद्ध कसे होनार? उदा... मला लोखंडाचेसोने करायची सिद्धी मिलाली तर तसे सिद्ध करायला नको? मला पाण्यावरुन चालता येते अशी सिद्धी मिळाली, तर एकदा तरी चालून बघून त्याच फोटो वगैरे काढायला नको का?

३. समजा सिद्धी आहे एखाद्याला पाण्यावरुन चालायची.. तर इतराना काय फायदा? इतराना नावेनेच जावे लागणार ना?

स्वांत सुखाय अश्या बऱ्याच गोष्टी असतात, शेळी... आणि स्वांत सुखाय असलेली प्रत्येक गोष्ट निरुपयोगी नसते.

आणि समजा अमक्याला एक सिद्धी मिळाली असेल तर ती त्याला त्याच्या मेहनतीमुळे मिळाली आहे. त्याने ती इतरांसाठी का वापरायची? अर्थात, काही लोकांच्या भल्यासाठी वापरतात, त्यांना आपण दुवा देतो. पण तो ऐच्छिक विषय आहे. सिद्धी का मिळवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि जर ती मिळाली तर ती कुणासाठी आणि कधी वापरावी हा देखील ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतर त्यावर "फ्रीलोडिंग" करू शकत नाही.

ऑलरेडी हे झालेले आहे, सुरुच आहे.
विषनिर्मिती शास्त्र --- टॉक्सिकॉलॉजी

माहिती आहे. हे व्हायला हवे होते (जेव्हा विषशास्त्र भारतात मूळ धरत होते तेव्हा).. अजून हि माहिती नसलेल्या कित्येक गोष्टी आहेत. यांच्याकडून त्या शिकायला काहीही हरकत नाही. कशाचा कुठे काय उपयोग होईल हे सांगता येत नाही. आणि उपयोग होणार नाही, म्हणून लोक शिकायचे व करायचे देखील थांबत नाही. हिग्स बोसोनचा देखील माणसाला काही एक उपयोग नाही.

ICSE / CBSE / NCERT / SSC या बोर्डांमधली सर्व पुस्तके हटवून प्रा. गळतगे, वर्तक यांच्या लिखाणावर आधारीत अभ्यासक्रम शिकवावा ही शासनाला नम्र विनंती. मंत्राने सगळं होत असताना पाहीजेय कशाला ही डोकेदुखी ? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर ढिंग चिका ढिंग चिका...

मेडीकलच्या विद्यार्थ्यांना मंत्र आलाशी कारण. कॅन्सर पेशंटवरून लिंबू उतरवलं कि झाला तो खडखडीत बरा ! मंत्र म्हटला कि सुटला अग्निबाण ! कशाला पाहीजे तो संरक्षणावरचा अफाट खर्च ?? सैन्य तरी कशाला हवं ? एकच साधू बास. हातात पाणी घेऊन मंत्र म्हटला कि पाकिस्तानी सैन्य गायब !!

हाकानाका

किरणराव.
मा. प्रा. गळतगे, मा. वर्तक यांचे नुसते नाव इथे प्रतिसादात लिहिले, तर ती पोस्ट उडते. काहीतरी कालाजादू आहे या धाग्यावर. सांभाळा.

>>
कशाला पाहीजे तो संरक्षणावरचा अफाट खर्च ?? सैन्य तरी कशाला हवं ? एकच साधू बास.
<<
या विषयावर एकदा चर्चा घडून गेली आहे असे वाटते. बहुतेक देवगिरीच्या आक्रमणाच्या वेळी कोणत्यातरी सिद्ध योग्यांनी आक्रमकांचा नि:पात करणे सोडाच, साधी राजाला कल्पनाही दिली नाही असे काहीतरी कुणा इतिहास संशोधकांचे म्हणणे होते, असे त्या चर्चेत वाचल्याचे अंधुकसे आठवते. माबोबर होती की उपक्रमावर? की अन्य कुठल्या संस्थळावर तेही आता नीट आठवत नाही..

(वयोमानानुसार पुसट स्मृती झालेला) इब्लिस.

> १. सिद्धीचा भौतिक वापर करायचाच नसेल तर ती मिळवायची कशाला?
गम्मत म्हणून. असच. वाटल म्हणून.

> २. दृश्य- भौतिक उपयोग केला नाही, तर अमूक एक सिद्धी मिलाली हे सिद्ध कसे होनार? उदा... मला लोखंडाचेसोने करायची सिद्धी मिलाली तर तसे सिद्ध करायला नको? मला पाण्यावरुन चालता येते अशी सिद्धी मिळाली, तर एकदा तरी चालून बघून त्याच फोटो वगैरे काढायला नको का?

सिद्ध कोणासाठी करायच? तुम्हाला फोटो काढायचे असतील तर ज्यान्ना सिद्धी मिळाली आहे त्यान्ना शोधा आणि फोटो काढत बसा.

> ३. समजा सिद्धी आहे एखाद्याला पाण्यावरुन चालायची.. तर इतराना काय फायदा? इतराना नावेनेच जावे लागणार ना?

इतरान्च्या फायद्या साठी सिद्धी मिळवायची हे ग्रुहितक कोठून आल? आणि इतराना नावेनी जायच नसेल तर त्यान्नी पण सिद्धी मिळवावी किन्वा पोहत जाव.

> बहुतेक देवगिरीच्या आक्रमणाच्या वेळी कोणत्यातरी सिद्ध योग्यांनी आक्रमकांचा नि:पात करणे सोडाच, साधी राजाला कल्पनाही दिली नाही

हा तर्क मी पण कुठे वाचला होता आठ्वत नाही. पण.. हे statement पटत नाही. जर १०-१२ वर्षाचा पोरगा खेळात स्वतःच्या चुकी मुळे किन्वा दुर्बलते मुळे मार खाउन आला तर त्यानी इतरान्च्या तोन्डाकदे बघण्या ऐवेजी किन्वा इतरान्ना दोष देण्याऐवेजी स्वतःलाच समर्थ करायला हव. यादवान्ची किन्वा तत्कालीन राजान्ची योग्यता न्हवती म्हणून त्यानी राज्य गमावल. शिवाजी महाराजाना कोणाशी तह करावा आणि तो कधी मोडावा याची जाण होती म्हणून त्यान्ची हालत प्रुथ्वीराजा सारखी झाली नाही. यात योगी आणि त्यान्च्या सिद्धीन्चा काय सम्बन्ध आहे?