नियम

Submitted by कौतुक शिरोडकर on 3 June, 2012 - 03:38

पहिल्या प्रहरी
तुझ्या माझ्यात
निव्वळ शब्द,
जुळवलेली वाक्ये,
पुढे परिच्छेदातल्या गप्पा,
मग रंगलेल्या पानांची चळत....
सूर्य कलू लागला आणि
मग चर्चा,
ठरवलेली वाक्ये,
उरलेले शब्द....
हुंकार... नकार..
नात्यांचे प्रयोग आणि
शास्त्रातले भौतिक नियम..
....
..
पण सगळेच नियम लागू पडतात असं नाही.
तेव्हा येणार्‍या पहाटेची स्वप्ने पाहू नकोस,
उरलेल्या श्वासात ही कातरवेळ निभावली तरी पुरे !

गुलमोहर: 

काय झालंय काय तुला ? अर्थात जे झालंय ते उत्तमच आहे. एक से एक भन्नाट विचार टाकतोयस एका मागून एक. व्वा.. बहुत बढिया. Happy

बेफी एक विचारू का?
तुमचा प्रतिसाद द्यायचा म्हणून दिल्या सारखा वाटला. त्यात कवितेबद्दल काहीच लिहिलेलं नाही. ना सकारात्मक ना नकारात्मक. असो..

मला कविता आवडलेली नाही.

दक्षिणा,

प्रतिसाद द्यायचा म्हणून दिला पाहिजे असे कुठे काही आहे? Happy शिरोडकरांच्या काही कवितांवर मी प्रतिसाद दिलेला नाही.

कौतुका......किती म्हणजे किती जीवघेणे लिहिशील म्हणतो मी! सुंदर! मला बेफींच्या मुक्तछंदाची व मंदार जोशींच्या स्मायलींची आठवण झाली......(न केलेल्या)

दक्षिणा,

वैभव जोशींचे एकंदर काव्य आणि मुक्तछंदही अतिशय सरस आहे, असते. त्याची आठवण होणे ही काँप्लिमेन्ट नाही ठरू शकत का? Uhoh