नभव्याकुळ

Submitted by सत्यजित on 13 August, 2012 - 00:49

लाडानं पोसणार्‍या
मायेच्या सुरकुत्या
आता भेगा झाल्या
आणि पाऊस फक्त
उरला कवितां पुरता

पदराचा ओचा आणि
धोतराचा सोगा
असतोच मुळी साऊंडप्रूफ
नभव्याकुळ डोळे
झालेत आता वॉटरप्रूफ

अँटी व्रिंकल्स अन
मॉईश्चराईजर्स
वापरणार्‍यांचा दावा
भेगांच काय येवढं?
क्रॅक क्रीम लावा !

तुमच्या व्रिंकल्स येवढ्या
भेगा काही खोल नाहीत
बाटली शिवाय पाण्याला
नी कुंडी शिवाय मातीला
तसंही इथे मोल नाही

कोण म्हणतो पाणी नाही?
पंधरा रुपये लिटरने
अख्खा समुद्र कसा
काय घाण करतात
ही शहरातली गटारं?

पाऊस आता फक्त
कवितेचं पीक घेतो
कधी रोमँटीक तर
कधी ओलेत्या
कल्पनांची भीक देतो.

-सत्यजित.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी आहे. एवढी अपिल झाली.

आणि पाऊस फक्त
उरला कवितां पुरता >>> अशी वेळ येवु नये अशीच इच्छा. दरवर्षी एकेक आठवडा, महिना उशीर होताना पाहुन हीच भीती वाटते आहे.

पाऊस आता फक्त
कवितेचं पीक घेतो
कधी रोमँटीक तर
कधी ओलेत्या
कल्पनांची भीक देतो. >>>>> खासच !