अनंग

Submitted by अज्ञात on 7 August, 2012 - 00:37

सुगंधी क्षणांचा भोक्ता अनंग
उरी रात्र गाते अरूप अभंग
तरी भुक्त प्राजक्त पायांतळी
चिंब व्याकूळ; देही लपे अंतरंग

सुखासीन माझी कथा पोळलेली
व्यथा रोमरंध्री उगा पाळलेली
जरी मोकळे दृष्य आनंद माझे
तळी दाट रंग; पृष्ठी तरंग

...................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुक्त म्हणजे..?

अनंग जवळ असता रात्र अभंग का गातॅ हे कळले नाही.(-; >> प्रितीचा पर्मोच्च टप्पा म्हणजे भक्ती, तो त्या क्षणांचा राजा तरी ही प्रित कशी अभंग गाणारी... काय मजा आहे ह्या अभंग शब्दात.

सीएल.. रहावल नाही म्हणुन लिहिलं आगाऊपणा बद्दल क्षमस्व, तुम्ही "शब्दअनंग" आहात.

सत्यजीत,

सुगंधी क्षणांचा भोक्ता अनंग
उरी रात्र गाते अरूप अभंग
तरी भुक्त प्राजक्त पायांतळी
चिंब व्याकूळ; देही लपे अंतरंग

अनंग - विरक्त वैरागी, भुक्त - भुकेला

क्षणिक सुगंधाचा भोक्ता असलेला वैरागी/ विरक्त प्राजक्त रात्रभर उरात अरूपाचे अभंग गात बसतो पण त्याची क्षुधा सकाळी पायांतळी तुडवली जाते. अशातही त्याचं व्याकुळ अंतरंग त्याच्या देहात लपलेलंच रहातं.

सुखासीन माझी कथा पोळलेली
व्यथा रोमरंध्री उगा पाळलेली
जरी मोकळे दृष्य आनंद माझे
तळी दाट रंग; पृष्ठी तरंग

माझी सुखासीन वाटणारी कथाही अशीच कांहीशी (प्राजक्तासारखी) पोळलेली आहे. शेवट नकारात्मक माहीत असूनही कुठलीशी सुप्त आकांक्षा / अभिलाषा उरात विनाकरण बाळगलेली आहे. मी वरून कितीही आनंदी दिसलो तरीही तळाशी दाटलेला रंग आणि पृष्ठावरती त्याची हलकी वलये कळत नकळत कायम उमटत आहेत.

Happy

माझ्या मते अनंग य शब्दाचा अर्थ : राजा, ह्रुदयावरती राज्य करणारा(king of love), नेटवर शोधता त्याचा अर्थ "God of Lust" असा सापडला, जो तुम्ही योजलेल्या अर्थाच्या अगदी उलटा आहे Happy

क्षणिक सुगंधाचा भोक्ता असलेला वैरागी/ विरक्त प्राजक्त >> इथे माझीही दांडी गुल, Sad
प्राजक्त ...क्षणिक सुगंधाचा भोक्ता? आणि भोक्ता तरी वैरागी?

तुम्ही वरती दिलेला अर्थ भन्नाट आहे