लिम्बीच शेत आणि बन्धार्‍याच पाणी

Submitted by limbutimbu on 25 June, 2008 - 07:15

इथल्या माझ्याच बर्‍याच पोस्टी मीच उडवल्या होत्या २००९ मधे!
एक विचार असा की इत्क्या मोठ्या विश्वातील मोहोरीच्या दाण्यायेवढ्या पृथ्वीवर वावरत असलेल्या अब्जावधी जीवान्मधिल एक अमिबासमान मी, त्याने काय इकडुन तिकडे हलवले, केले तर त्यात विशेष ते काय? तरी पण..... रहावत नाही ना सान्गितल्याशिवाय, तर..;
मे २०१२ मधे आधीच ठरविल्याप्रमाणे मी लिम्बीच्या जमिनीवर जन्गलाशेजारी तम्बुवजा झोपडी उभारुन लिम्बीसहित आठ दिवस राहिलो अन जे काय केले त्याचे निवडक फोटो पुढे देत आहे.

१ हा इथे असा तम्बु उभारला होता
Photo0424.jpg

२ हे असे पावसाचे पाणी साठविण्याकरता सिमेण्टच्या रिकाम्या पोत्यात माती भरुन शेततळे करायचे काम सुरू केले.
Photo0434.jpg

३ शेवटच्या दिवशी म्हणजे १३ च्या रविवारी, लिम्बी अन थोरली काम करताना
Photo0446.jpg

४ दरम्यान, पेरणीची जागा "तरवं" ते भाजण्याचे हे काम
Photo0436.jpg

५ पोत्यात भरण्याकरता माती/मुरुम खणुन काढताना लिम्ब्या
vlcsnap-128434.jpg

६ आणि हे अंतिम दृष्य स्वरुप शेततळ्याचे
vlcsnap-44789.jpg

आकार साधारणतः १६' x १६' x ७.५'
दर घनफुटास २७.३०० लिटर पाणी म्हणजे, यात ५२,४१६ लिटर पाणी मावेल.
यामधे अजुन प्लॅस्टिक कागद अंथरायचा आहे. Happy
येत्या दोनएक वर्षात अशीच एकापुढे एक अशी चार पाच तळी तयार करता आली तर दीडदोन लाख लिटर पाणी सहज साठू शकेल, त्यामुळे शेतीची तसेच जवळील जन्गलातील वन्यप्राण्यान्ची पाण्याची सोय होईल.
एकुण ४५० रिकामी पोती वापरली, प्रत्येक पोत्यात ३ घमेली माती/मुरुम म्हणजे १३५० घमेली माती भरली, म्हणजेच तितकेवेळा ते घमेले पायावर नळगीच्या हाडावर आपटत्/घासत होते, शेवटी त्याला पोते बान्धावे लागले.
प्रत्येक पोते माती भरताना, भरल्यावर बाजुला ठेवणे, स्टेपल करणे, पुन्हा उचलुन जागेवर आणणे व भितीवर नीट रचणे असे किमान पाच वेळा हाताळले जायचे.
पोत्यान्च्या दोन ओळिन्च्या मधे भरलेले डबराचा घनफुटाचा हिशोब अजुन केला नाहीये.
सोमवार ७ मे ते रविवार १३ मे इतके दिवस सलग काम केले.
शेवटच्या दिवशी मुलिन्ची मदत झाली तर मधल्या दिड दिवसात कामावरील एका बाईची मदत झाली.
प्यायच्या पाण्याचि सोय अंदाजे पाऊण किलोमीटर अंतरावरील विहीरीवरुन डोक्यावरुन हण्डेकळशीतुन पाणी वाहून आणुन करावी लागत होती.
सकाळ सन्ध्याकाळ एकेक कळशीभर पाणी प्यायले जात होते.
सकाळी साडेसहा/सात ते बारा आणि दुपारी ३ ते ५/६ वाजेस्तोवर काम करता यायचे.
दरम्यान एका दिवशी शुटिन्ग करत असता, पायाखालील फासेपारध्यान्नी सशाकरता लावलेल्या फाशातील टोकदार काडी पायात घुसल्याने झालेल्या जखमेमुळे धनुर्वाताचे इंजेक्शन घेण्याकरता दुसर्‍या गावी जावे लागल्याने अर्धा दिवस वाया गेला.
पण एकुणात काम छान, भरपुर मनपसंद झाले.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत करत, अर्थात लिम्बीच्या सहाय्याशिवाय असे काम होणे अशक्यच.

_____xXx______

July & August, 2012
तळे तर बनविले, पण पुढे काय? हे तळे "ट्रायल प्याच" म्हणूनच बनविले आहे, खरे तर तिथेच एक विहीर खोदायची आहे व सध्याच्या तळ्याच्या बाजुला दोनएक लाख लिटर पाणी साठविण्याची सोय करायची आहे.
तर यंदाच्या मोसमात, तळ्याकरता वापरलेल्या पोत्यान्वर उन्हाचा परिणाम काय झाला, आत अन्थरायचा कागद कसा अन्थरावा इत्यादी प्रात्यक्षिक करुन झाले.
उन्हाने पोती इतकी कुरचुक झाली की बोट लावले तरी फाटू लागली. शिवाय नाठाळ पोरे/लोक इत्यादीन्नी मारलेले ब्लेडचे काप देखिल प्रश्नचिन्ह उमटवुन गेले.
ऐनवेळेस योग्य प्लॅस्टिकची सोय करु न शकल्याने एक जुना ३०'X४०' आकाराचा भोके पडलेला कागद काही भोके बुजवायचा प्रयत्न करुन कसातरी अन्थरला, व उन्हाने रापलेल्या पोत्यान्ची तळ्याची आतली बाजुतरी सुरक्षित करुन घेतली. भोकामुळे पाणी साठून रहाणार नाही हे निश्चितच होते, पण येणार्‍या पाण्याचा प्रवाह संयमित करण्याचे, व वेळेस जास्तीचे जे काय पाणी साठले असेल ते ऐनवेळेस वापरण्याचे नियोजन होते. ते यशस्वी झाले. आत्ता घेतलेल्या धड्यातुन पुढील वर्षातील कार्यवाहीदेखिल निश्चित झाली आहे. हा अनुभव उपयोगी पडेलच.
४ ते ६ आगस्ट, २०१२ दरम्यान पाणी आत घेऊन, लावणी पूर्ण झाली, त्यावेळचे काही फोटो. लो क्वालिटी मोबाईलवरुन घेतल्याने तितकेसे चान्गले नाहीत पण कल्पना येण्यास पुरेसे आहेत.
Photo0174.jpgPhoto0180.jpgPhoto0182.jpgPhoto0184.jpgPhoto0187.jpgPhoto0189.jpgPhoto0207.jpgPhoto0210.jpgPhoto0185.jpg

गुलमोहर: 

छान

मला काहीच दिसत नाहीये...
फक्त 'सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर' एवढच दिसतय! Sad Sad
बाकी सगळे मस्त प्रतिक्रिया देत सुटलेयेत...

वा! मस्तच काम झाले आहे. एका आठवड्यात दोन माणसांनी मिळून एव्हढे काम केले म्हणजे कमाल आहे.
तंबू झोपडी छान दिसते आहे.

लिंबुभाऊ, कमाल आहे तुमची. आवडले.

प्रतिसादात चित्र आणि लिखाण टाकण्याएवजी मुळ लेखातच टाका ना? शोधायला त्रास होतो पण त्यापेक्षा कधितरी वेळ नसला तर वाचायचे राहूनच जाते.

लिम्बुदा,

U R GREAT !!!

मला माझ्या आजोळी

शेती वर भुईमुग काढायला गेलेल्याची आठवण आली. ८-९ वर्षाचा असेन त्यावेळी.

ही गोष्ठ आहे ३० वर्षा पुर्वीची . मुंबई हून आलेल्या मुलाला शेतीत काम करतानाच थ्रील त्यावेळी अनुभवल

होत. जेमतेम २ दिवस काम केल होत.

मूळची पोस्ट्मधे मी पुढील मजकुर टाकायचा प्रयत्न केला, पण जमले नाही, कारण कुणीतरी मूळची पोस्ट सुधारुन टाकलेली आहे. सबब इथे पोस्ट करतोय.

_____xXx______

July & August, 2012
तळे तर बनविले, पण पुढे काय? हे तळे "ट्रायल प्याच" म्हणूनच बनविले आहे, खरे तर तिथेच एक विहीर खोदायची आहे व सध्याच्या तळ्याच्या बाजुला दोनएक लाख लिटर पाणी साठविण्याची सोय करायची आहे.
तर यंदाच्या मोसमात, तळ्याकरता वापरलेल्या पोत्यान्वर उन्हाचा परिणाम काय झाला, आत अन्थरायचा कागद कसा अन्थरावा इत्यादी प्रात्यक्षिक करुन झाले.
उन्हाने पोती इतकी कुरचुक झाली की बोट लावले तरी फाटू लागली. शिवाय नाठाळ पोरे/लोक इत्यादीन्नी मारलेले ब्लेडचे काप देखिल प्रश्नचिन्ह उमटवुन गेले.
ऐनवेळेस योग्य प्लॅस्टिकची सोय करु न शकल्याने एक जुना ३०'X४०' आकाराचा भोके पडलेला कागद काही भोके बुजवायचा प्रयत्न करुन कसातरी अन्थरला, व उन्हाने रापलेल्या पोत्यान्ची तळ्याची आतली बाजुतरी सुरक्षित करुन घेतली. भोकामुळे पाणी साठून रहाणार नाही हे निश्चितच होते, पण येणार्‍या पाण्याचा प्रवाह संयमित करण्याचे, व वेळेस जास्तीचे जे काय पाणी साठले असेल ते ऐनवेळेस वापरण्याचे नियोजन होते. ते यशस्वी झाले. आत्ता घेतलेल्या धड्यातुन पुढील वर्षातील कार्यवाहीदेखिल निश्चित झाली आहे. हा अनुभव उपयोगी पडेलच.
४ ते ६ आगस्ट, २०१२ दरम्यान पाणी आत घेऊन, लावणी पूर्ण झाली, त्यावेळचे काही फोटो. लो क्वालिटी मोबाईलवरुन घेतल्याने तितकेसे चान्गले नाहीत पण कल्पना येण्यास पुरेसे आहेत.
Photo0174.jpgPhoto0180.jpgPhoto0182.jpgPhoto0184.jpgPhoto0187.jpgPhoto0189.jpgPhoto0207.jpgPhoto0210.jpgPhoto0185.jpg

फोटो अगदी मुद्दाम पोस्टराईज करून टाकल्यासारखे दिसताहेत. मोबाईलमुळे क्वालीटि खराब असे म्हणू नका. वेगळा मझा आहे त्यातही.

व्वा! छान फोटो. Happy
हंगामी लावणी छान झाली लिंबुभौ, आता कापणीला बोलवा आम्हाला पण...>>>>>>>>>+ १ . आणि पुढच्या वर्षी लावणीला पण बोलवा. Happy

वा मस्त लिंबू, असं काही करता येतं हे दाखवल्या बद्दल धंन्यवाद.
४५० पोती, बापरे हे खुपच मोठे काम आहे.
तुमच्या पुढच्या योजनांसाठी शुभेच्छा.

लिंबू वाया गेलेल्या फ्लेक्सबोर्डच्या मटेरीयलचा काही उपयोग होईल का. ते उन्हं पावसात चांगला तग धरताना दिसतं.

लिम्ब्या कापणीला ( बिबट्याना बोलवणार नसशील तरच Proud ) माझी येण्याची तयारी आहे. Happy
हे इंडम का?
सध्या तुझ्याकडचा नेलेला इन्द्रायणी सुरु आहे घरी. छान आहे चव. Happy

अगदी मागच्याच आठवड्यात तुमच्या शेततळ्याची आठवण आली होती. अगदी येथे येऊन आवर्जुन फोटो टाकलेत धन्यवाद.
हे सगळे करताना, एक मस्त धुंदी येत असेल नाही. Happy

Pages