कहाणी

Submitted by दाद on 9 August, 2012 - 00:37

प्रत्येक कहाणी स्वप्नासारखी,
कुठेतरी सुरू व्हायची अन कुठेतरी संपायचीच!

डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात!

पण स्वप्नं काचेचीच शेवटी, राजा
डोळ्यांना काय, कवितेला काय
.......फुटली की खुपतातच!

-- शलाका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ! अगदी नेमक्या आणि मोजक्या शब्दात पोहोचलं सगळं.

(सध्या कविता वाचायचं बंद करूनही तुमचं नाव दिसल्यावर न राहवून उघडली....आणि खूप दिवसांनी छान कविता वाचल्याचं समाधान मिळालं :))

धन्यवाद... (रुणुझुणू Happy )
अमेलिया, खरय... कहाणी खरतर संपते ह्याला संदर्भ असतो... कुठेतरी, कुणासाठीतरी, कधीतरी. त्या संदर्भाविना कहाणी चालूच की. माझ्यासाठी संपलीतरी जगासाठी कदाचित अजूनही चालूच.

किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात!<<< ही ओळ फार सुंदर वाटली

अमेलियांचा प्रश्नही दिलचस्प वाटला

छानच.

छान विचार मांडलाय..... पण नेमकी 'गोंदवण' आताच वाचल्याने अकारण तुलना होऊन ही रचना दोन नं वर गेली (माझ्या मनात)....

स्वप्नांचं तुटणं, ती अर्ध्यात मोडणं ,त्यांच विखूरणं ऐकलयं, !
स्वप्न फुटणे हा प्रयोग पहिल्यांदा वाचलाय Happy चू भू दे घे
आशय आवडलाच, दाद

ह्या कवितेतली "स्वप्नं काचेचीच"... म्हणून'च' फुटणं.
काचतरी काय भंगच पावते... अगदीच मोठा आघात असेल तर मग विखुरतेही... स्वप्नासारखीच.
पुन्हा एकदा आभार, सगळ्यांचे

छान आशय. कविता आवडली.
शेवटच्या ३ ओळी खास.
----------------------------------------------------------------------
प्रथम मीदेखील फुटणं शब्दाबद्दल साशंक होतो.
पण, फुटणं हे क्रीयापद काचेकरता वापरलं गेल्याचं
ध्यानात आलं आणि शब्दार्थाकडून परत आशयाकडे
खेचला गेलो.

गुलजारांच्या

काँच के ख्वाब है, आँखों में चुभ जायेंगे
पलकों में लेना इन्हें, आँखों में रुत जायेंगे

या ओळी आठवल्या एकदम !

डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात! << सह्ही ! सह्ही ! सह्ही !

डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात! >>>

आहाहा! क्या बात!

डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात!
>>>

आहाहा!
क्या बात!
Hats off!