अण्णा हजारे उपोषण

Submitted by Mandar Katre on 28 July, 2012 - 01:10

सध्या सुरु असलेल्या अण्णा हजारे यांच्या उपोषणा बद्दल नाराजी ,टीका किंवा उपहास करणे तसेच मिडिया ने जाणीव-पूर्वक दुर्लक्ष्य करणे या गोष्टी पाहता काही विचार मनात येतात .
लहान मुले दफ्तर आणि अभ्यासाच्या ओझ्याने वाकलेली ,तरुण पिढी फेसबुक, पोरी आणि कॉलेज यात अडकलेली ,नोकर-दारांना नोकरीतून फुरसत नाही ,धंदेवाल्यांना धंद्यातून वेळ नाही ,शेतकरी दुष्काळ आणि शेतीचा न परवडणारा खर्च याच्या काळजीत ...
मग उरता उरले कोण ? तर सेवानिवृत्त / वयोवृद्ध नागरिक ! त्या बिचाऱ्यांनी या वयात काय भ्रष्टाचारी लोकांशी दे दनादन स्टाईल मारामारी करावी ? कि कुस्ती खेळावी? भ्रष्टाचार आहे ,सर्वव्यापी आहे ! जळी –स्थळी –काष्ठी-पाषाणी /यत्र –तत्र सर्वत्र आहे ,अशा भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीत साध्या मनाच्या प्रामाणिक माणसाचे अतिशय हाल होतात .मग त्या मानसिक उद्वेगाला कुठेतरी वाट करून देण्यासाठी उपोषणा सारखे अस्त्र काढले जाते .
अण्णांच आंदोलन भले भरकटले असेल , त्यात अनेक स्वार्थी,संधीसाधू मंडळी घुसली असतील ,खुद्द अण्णा प्रसार-माध्यमांच्या भूल-भुलैया ला भुलले असतील ...हे सगळे आरोप खरेही असतील ,पण म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे हा गुन्हा होऊ शकत नाही. ते एक महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे .टीका करणाऱ्यांनी उपोषणा शिवाय आपण दुसरे काय काय करू शकतो ,हे सांगण्याचे ही कष्ट घ्यावेत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अण्णांच्या मागच्या वर्षीच्या उपोषणाचे वेळी अनेकांच्या सह्या घेऊन येथील खासदाराला 'अण्णांच्या मागण्या मान्य करा असा आग्रह धरणारे पत्र मी पाठवले होते. त्यांना पाठींबा देणार्‍या मंचाला ग्रुपने भेट देऊन तेथील रजिस्तरवर सह्या केल्या होत्या. यथाशक्ती आर्थिक मदत केली होती. '
'भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्‍या कोणाचाही आम्ही पाठिंबा घेऊ, मग तो कोणीही असो. ' असे अण्णांनी म्हटले पाहिजे. सत्ताधारी काय फाटे फोडतच राहातील. त्यांच्या दृष्टीने निवडणुकीचा आखाडा सोयीचा. म्हणून तर ते अण्णांना म्हणतात की निवडणूक लढवा. अण्णांनी त्यात मात्र उतरू नये. जनजागृती करून मतदानावर प्रभाव पाडणे हेच अण्णांचे खरे क्षेत्र. माणूस वा पक्ष यांना लक्ष्य करण्याऐवजी कोणालाही मत देतांना काय तपासावे याची मार्गदर्शक तत्वे सांगावीत. उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी कोणावर कोणत्या ना कोर्टात सिद्ध झालेले गुन्हे आहेत याची माहिती मिळवून प्रसिद्ध करावि. त्याउप्पर शेवटी 'जशी प्रजा तसा राजा' हेच खरे!

अण्णांचा पक्ष किती सेक्युलर राहील हा प्रश्न आहे. ज्या लोकांनी गेल्या वर्षी भारतमातेचा फोटो काढला आणि गांधी बापूचा फोटो लावला, मोदींना चांगले म्हंटले म्हणून आधी अण्णांना आणि आता रामदेवांना शिव्या घालीत आहेत त्यांचा पक्ष सेक्युलर राहणार न.. फोटो काढला कारण अनुनय..

जो मोदींना शिव्या घालतो तो सेक्युलर.. जो जास्त मोठ्याने शिव्या घालतो तो जास्त सेक्युलर.. अशी सोयीस्कर वर्गवारी झालेली आहे. भारतमातेचा फोटो काढला तेव्हाच अण्णा माझ्या मनातून उतरले.

इन तिलो मे तेल नही... आता पक्ष काढला कि कोंग्रेस विरोधी मते विभागणार, म्हणजे कोंग्रेस २०१४ मध्ये परत येणार. या टीम अण्णा मध्ये केजरीवाल विरुद्ध अण्णा संघर्ष सुरु आहे. सांप्रत उपोषण केजरीवालांनी सुरु केले होते. अण्णांनी उडी मारून लाईमलाईट ओढून घेतला. पण गर्दी आली आणि गेली ती रामदेव बाबासोबतच. आठवडाभरापूर्वी मी म्हंटले होते कि या उपोषणाचा अंत राजकीय पक्षाच्या घोषणेतून होईल. निवृत्त सेनाध्यक्ष व्ही.के.सिंह हे आता बघण्याचे "स्थळ" आहे.. अण्णांचे "शेल्फ लाईफ" संपले..

पुढील पंतप्रधान उमेदवार कदाचित सुशीलकुमार शिंदे असतील. लोकसभा अध्यक्ष झालेच आहेत.. हसमुखराय म्हणजे दुसरा मनमोहन सिंह आहेत.. गृहमंत्री झाल्यावर त्यांनी सोनिया गांधींचे धन्यवाद मानले आणि एक "दलित" म्हणून कर्तव्य पार पाडू असेही म्हंटले.. शिंद्यांना कुणी तरी सांगायला हवे कि त्यांना गृहमंत्री हे कर्तव्य पार पडायचे आहे ते एक नागरिक म्हणून, एक दलित म्हणून नाही.. पण असो, ते बोलले असे..

आता बघा समीकरण कसे होते..

१. मराठी.
२. दलित

म्हणजे भारतातला ओबामाच कि..

मराठी लोक काय म्हणतील असे झाले तर? मत कोणाला? शिवसेना सपोर्ट करेल काय मराठी पंतप्रधान उमेदवाराला?

कोंग्रेसचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे..

केजरीवाल आणि अण्णांना उभे करून कोंग्रेसविरोधी मते छाटली जातील.. आणि मराठी दलित उमेदवार जाहीर करून शिवसेनेस महाराष्ट्रात धर्मसंकटात टाकतील. किंवा तोच आतला समझोता असेल तर? मनसे भाजपा कडे आणि सेना राष्ट्रवादी सोबत यूपीए मध्ये.. अधिक ओबीसी मोदी समोर दलित शिंदे.. एक पाउल जादा सेक्युलर...

कुठला फोटो काढला?

फोटो काढणे - दोन अर्थ होतात... फोटो काढला... टेक अ फोटो .... फोटो काढला .... फोटो वाज रिमुवड नेमकं काय?

आठवडाभरापूर्वी मी म्हंटले होते कि या उपोषणाचा अंत राजकीय पक्षाच्या घोषणेतून होईल.

कुठे? कधी? म्हटले होते?

'अंबु'मणींच्या 'निष्ठा' कशा दुथडी भरून वाहताहेत. वाटले होते समीक्षात्मक पृथःकरण करतील. दोन्ही बाजूंचा तौलनिक अभ्यास करतील पण अण्णांच्या मूर्खपणाचा काँग्रेसला फायदा होतोय पाहिल्यानंतर निरिक्षकाचा मुखवटा वितळून गेला. अरे मग स्वतःला 'प्रचारक' तरी म्हणवून घ्या म्हणजे आम्ही तुमची पोस्टे ओलांडून पुढे जात जाऊ...

अंबु - मणी .... Proud

आता पक्ष काढला कि कोंग्रेस विरोधी मते विभागणार, म्हणजे कोंग्रेस २०१४ मध्ये परत येणार.

ही यांची पोटदुखी......... Biggrin ( तुमच्या तोंडात साखर पडो ... )

रोजा मधलं गाणं आठवलं.

अंबुमणी अंबुमणी
अण्णा के साथ क्या क्या हुआ
कौन हारा कौन जीता
खिडकी मे से देखो जरा..

Proud

कमाल आहे, मनातले बोलले कि टीका होते "प्रचारक" वगैरे म्हंटले जाते.. धागाकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाचे हे माझे उत्तर होते. कोंग्रेस सरकार परत येणार हि डोकेदुखी नसून पोटातला भीतीचा गोळा आहे. तो का आहे, याची साक्ष या यूपीए सरकारने केलेले असंख्य घोटाळे देत आहेत.

अधिक २०१४ नंतर बदलणारे आंतरराष्ट्रीय समीकरण लक्षात घ्यायला हवे. ओबामा ने घोषित केलेली नोवेंबर २०१४ पासूनची अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघार, त्यानंतर युरोपात आणि कदाचित अमेरिकेत सुद्धा येऊ घातलेली आर्थिक मंदी, त्यामुळे गर्तेत जाऊ शकणारा चीन आणि गर्तेत जाणारा चीन अंतर्गत जनक्षोभ टाळायला जी पाऊले उचलेल त्यांचा तिबेट आणि भारतावर होणारा परिणाम हे सगळे आणि इतर बरेचसे गुंतलेले आहे. हि घडी विस्कटली कि कमोडिटी प्रायझेस होणारे दुष्परिणाम, वाढणारी महागाई, त्यातून अधिक प्रमाणात होणारा भ्रष्टाचार काहीच दिसत नाही का?

अश्यावेळेस जो भ्रष्ट आणि कमजोर आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे, त्यास काढून आणि जो स्वच्छ आणि कणखर आहे त्यास खुर्चीवर बसवावे आणि कठीण काळात निभावून न्यायचा प्रयत्न करावा, हे कॉमन सेन्स सांगतो. आणि हे जर अमुक कुणी भ्रष्टाचार विरोधी होऊ देत नसेल आणि स्वतः देखील खुर्ची काबीज करायची कुवत, तयारी अथवा हैसियत दाखवत नसेल तर त्याचा कुणीही विरोध करू नये?

आतंकवाद आणि भ्रष्टाचार हे जुळलेले आहेत. आणि जो चोर आहे हे उघड दिसते आहे त्याचा विरोध करणे आणि तो परत सत्तेत येऊ नये असे वाटणे याला "प्रचारक" म्हणणे हे लॉजिक मूर्खपणाचे आहे.

जो भ्रष्ट आणि कमजोर आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे, त्यास काढून आणि जो स्वच्छ आणि कणखर आहे त्यास खुर्चीवर बसवावे आणि कठीण काळात निभावून न्यायचा प्रयत्न करावा

या वाक्यात अशा वेळेला हा शब्द कशाला हवा? हे जनतेचे नेहमीचेच कर्तव्य आहे आणि जनता तेच करत असते.

जनलोकपाल नको असलेले लोक निवडणुकीच्या खेळात अत्यंत तरबेज आहेत. अण्णांना निवडणुकीच्या रणमैदानात उतरविण्यात राजकारणी लोकांनी यश मिळवलच म्हणायच! आपल्याला सोईच्या बॅटल फील्ड मध्ये शत्रूला खेचून आणणे हे कोठल्याही सेनापतीची महत्वाची रणनीती असते. अण्णांच्या विरोधकांनी त्यात यश मिळवले असेच म्हणावे लागेल.

हसमुखराय काय, मुका पंप्र काय...
काह दिवसांपूर्वी अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गंगा शेलक्या अंगाने दुथडी भरून वाहत होती. आज ती थोडी जरी वाहीली तरी अश्रूभरल्या धमक्यांच्या रांगोळ्या पहायला मिळतात.

कालाय तस्मै नमः