तेव्हा तुझा फ्रेंडशीपबँड माझ्या हातात असू दे (विडंबन)

Submitted by Nilu on 3 August, 2012 - 11:24

जेव्हा हाताशी आलेलं पाखरू
राखी बांधून जाईल,
माझ्या दीनवाणी मनाला
मित्र डागण्या देत राहील,
तेव्हा तुझा फ्रेंडशीपबँड माझ्या हातात असू दे..
नव्या पाखराचा शोध घेण्यासाठी

जेव्हा परीक्षेच्या पाठीवर स्वार होऊन
हे साल उडून जाईल,
इमानदार पोरी घरच्यांच्या आग्रहाने
सासुरात नांदू लातील,
तेव्हा तुझा फ्रेंडशीपबँड माझ्या हातात असू दे..
नव्या सालाची नवी स्वप्नं बघण्यासाठी

जेव्हा असंख्य सँडल्स गाठलेल्या देहाला
टोले मारून थकतील,
अंगावरच्या सर्व जखमा
सुजून काळ्यानिळ्या होतील,
तेव्हा तुझा फ्रेंडशीपबँड माझ्या हातात असू दे..
डॉक्टरला धाडसाने खोटं सांगण्यासाठी

जेव्हा डोळ्यांच्या पापणीचा एकेक केस
थकून जाईल जागून जागून
आणि नंतरच्या झोपेला लाथा घालूनही
जाग येणार नाही,
तेव्हा तुझा फ्रेंडशीपबँड माझ्या हातात असू दे..
उठवणार्‍यांचे गळे आवळण्यासाठी

=============================================
मूळ कविता http://www.maayboli.com/node/36845

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा असंख्य सँडल्स गाठलेल्या देहाला.............
>>> अरेरे, ये क्या हाल बनाके रखा है, कुछ लेते क्यों नही
donald-duck-022007-3.gif

आयला.......... पर्फेक्ट विडंबनय राव
सहीच्च..

कवितेपेक्षा १० पट जास्त आवडेश!!

.....