ही कुणाची सावली माझ्याबरोबर चालते?

Submitted by सतीश देवपूरकर on 3 August, 2012 - 07:07

गझल
ही कुणाची सावली माझ्याबरोबर चालते?
मी न एकाकी, अशी खात्री मनाला वाटते!

श्रान्तल्या पायात येतो जोम हा कोणामुळे?
कोण तेथे पैलतीरी वाट माझी पाहते?

मी तुझ्यापासून आहे दूर, दुनियेच्या मते.....
हरघडी श्वासात माझ्या तूच तू झंकारते!

वाजवी हळुवार, वारा बासरी पानातुनी;
यायच्या आधीच तू, चाहूल येवू लागते!

स्वागतासाठी कुणाच्या थाटली आरास ही?
कोण रांगोळी दवाची जागजागी काढते?

लागती बोलायला जेव्हा फुले कानामधे;
घेत कानोसा हवाही सळसळाया लागते!

आपल्या व्यापात व्यक्ती व्यस्त इतकी राहते;
कोण आताशा दिलेली वेळ सांगा पाळते?

काल कोसळला असा पाऊस धोधो चौकडे;
वाटते की, सर्व सृष्टी आसवांनी नाहते!

वाकलो, आल्या तशा जाऊ दिल्या लाटा पुढे;
स्वार लाटांवर न होता, नाव माझी चालते!

दार ठोठावून संधी चालती झाली तरी....
हाय! निजलेल्या जिवाला स्वप्न सारे वाटते!

न्यायचे त्यालाच मृत्यू, “वेळ झाली का?” पुसे!
रोख प्रश्नाचा बिचारी जिंदगी ना जाणते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूषणराव!
मी मनकवडा नाही हो!
हंहं म्हणजे?
बिंधास्त लिहा हो. मला सुधारणा तरी करता येतील माझ्या लिखाणात, खयालात व चिंतनात!
..........प्रा.सतीश देवपूरकर

भूषणराव!
मी मनकवडा नाही हो!
हंहं म्हणजे?
बिंधास्त लिहा हो. मला सुधारणा तरी करता येतील माझ्या लिखाणात, खयालात व चिंतनात!
..........प्रा.सतीश देवपूरकर<<<<

प्रोफेसर,

न्यायचे त्यालाच मृत्यू, “वेळ झाली का?” विचारे!<<< इथे एक गुरू वाढला, तो टायपो असावा

बाकी:

लागती बोलायला जेव्हा फुले कानामधे;
घेत कानोसा हवाही सळसळाया लागते!

आपल्या व्यापात व्यक्ती व्यस्त इतकी राहते;
कोण आताशा दिलेली वेळ सांगा पाळते?

काल कोसळला असा पाऊस धोधो चौकडे;
वाटते की, सर्व सृष्टी आसवांनी नाहते!

हे आपल्यामते गझलेचे शेर आहेत काय? असल्यास कसे ते कृपया विशद करावेत. धन्यवाद.

धन्यवाद भूषणराव, आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल!
बहुत खूबीसे आपने गलतीका एहसास दिलाया
विचारे ऎवजी पुसे असे केले आहे. पुनश्च धन्यवाद!
आपण निर्देश केलेल्या तीन द्विपद्या गझलेचे शेर का होवू शकत नाहीत?
कोणत्या निकषांच्या आधारावर या द्विपद्या शेरांस पात्र ठरत नाहीत?
या द्विपद्यांचे आपणास समजलेले अर्थ कळवाल का?
.........प्रा.सतीश देवपूरकर

आपण निर्देश केलेल्या तीन द्विपद्या गझलेचे शेर का होवू शकत नाहीत?
कोणत्या निकषांच्या आधारावर या द्विपद्या शेरांस पात्र ठरत नाहीत?
या शेरांचे आपणास समजलेले अर्थ कळवाल का?
<<<

गझलेचा भाव व उमदी जादूमय अभिव्यक्ती आढळली नाही

भूषणराव!
अभिव्यक्तीसापेक्षता मी समजू शकतो. पण गझलेचा भाव/आव/गझलियत वगैरे शब्दांचा, मला अर्थ कळाला नाही. कृपया उलगडा कराल काय?

थेट लिहिण्याने शेर होत नाही का? की, हरेक वेळी (चेष्टेने म्हणत आहे) कुठली न कुठली बंगाली जादू(करामत/चमत्कृती)करायलाच हवी शेर व्हायला. शब्दांच्या कोलांट्याउड्या मारायलाच हव्यात का? काव्याच्या पातळीवर खयाल/भावना अभिव्यक्त होणे, द्विपदीतील नाट्य व कडेलोट हे पुरेसे नाहीत का शेर व्हायला? द्विपदी स्वयंपूर्ण कविता होणे हे काय शेर व्हायला पुरे नाही का?
शिवाय द्विपदीतील अर्थांचा बहुपदरीपणा(व्यामिश्रता) जर असेल तर, भावनांचे वेगळेपण (uniqueness) किंवा सत्याचे निरिक्षण यांचे काय? प्रतिमांच्या अभिनवतेचे(असल्यास) काय?
द्विपदीतील शब्दकळेचे काय?
द्विपदीतील बोलकेपणाचे व साधेपणाचे(simplicity) काय?
द्विपदीच्या डौलाचे काय?
प्रवाहीपणाचे/सफाईदारपणाचे/चपखल शब्दयोजनांचे काय? वगैरे..............

अवांतर:
लागती बोलायला जेव्हा फुले कानामधे;
घेत कानोसा हवाही सळसळाया लागते!

या द्विपदीचा अन्वयार्थ, ज्याचा आपणास बोध झाला तो कळवाल का?
अर्थांचा बहुपदरीपणा आपल्यापर्यंत पोचला का? नसेल तर ते माझे अपयश आहे असे मी समजतो. असो.

आपण नमूद केलेल्या तिन्ही द्विपद्यांचे अर्थ/भाव साधारणपणे (आग्रही नाही) सारखे ठेवून आपण म्हणता तशा, गझलेचा भाव व उमदी जादुमयी अभिव्यक्ती असलेल्या शेरांत रुपांतर करून कळवाल का? मला त्यातून काही शिकता येईल.

टीप: मी मायबोलीवर अनेकांच्या तोंडून “गझलियत” असा शब्दघोष ऎकला आहे. जरा त्याचा विस्तारने अर्थ उलगडून दाखवाल का? उदाहरणासकट दिलेत तर सोन्याहून पिवळे!
वाट पहात आहे आपल्या प्रतिसादाची.............
प्रा.सतीश देवपूरकर.
कृपया विस्ताराने लिहावे. आमच्यासाठी वेळ काढाल का भूषणराव?
........................................................................................................

अवश्य वेळ काढेन प्रोफेसर साहेब

मी आत्ता विमानात बसायला निघत आहे (सिरियसली सांगतोय). वळतंय विमान!

ते टेक ऑफ घेईल तेव्हा लॅपटॉप बंद करावा लागेल. एकदा सुरू केला की शेजारी जर कोणी पकाऊ नसले तर प्रतिसाद लिहीन

वाट पहात आहे आपल्या प्रतिसादाची.............>>>>>>>>>>

मी दिला तर चालेल का ???
असेल तर कळवा सर

जमेल तसा सान्गीन
आपण त्यात उणीवा काढणार नाही असे अभिवचनही द्यावे लागेल बरका !!(अन पाळावेही लागेल )

वविकु, लगेचच मूळ आय डीत आल्याबद्दल आपले स्वागत

आपण द्या त्यांना प्रतिसाद

मी पंख तपासतोय माझे

<<<वविकु, लगेचच मूळ आय डीत आल्याबद्दल आपले स्वागत>>>>

हो न नाहीतर विदीपा यायचे नि विकेट जायची Sad

आता वविकु कोण हा नवीन .

मी वैवकु बोलतोय ...........वन एण्ड वन्ली वन !!

हो न नाहीतर विदीपा यायचे नि विकेट जायची >>>>>>>
..............सुप्रियातै तो वाईड बॉल होता