निरोप...

Submitted by बागेश्री on 28 July, 2012 - 08:07

जाणारा रेंगाळला की,
अस्वस्थता वाढतेच...
त्रास दोघांनाही!
त्या जाणार्‍याला आणि मागे राहणार्‍याला..

डोळ्यांचे मूक संवाद,
हातांची चाळवा-चाळव,
भिरभिरून स्थिरावणारी नजर,
आणि नेमक्या वेळी डोळच्या पाण्याची निग्रही प्रतारणा...!!

जाणार्‍याला, नवा प्रवास,
नवी जागा,
नव्या आठवणी....

मागे राहणार्‍याला मात्र-
तीच जागा,
सोबत घालवलेल्या क्षणांचं पुसट अस्तित्व...
उमटून विरत आलेल्या पाऊलखूणा,
काही थकलेले कयास,
काही निश्वास,
उंबर्‍यात अडकून राहिलेले भास...!

पण म्हणून,

निरोप टळतात थोडेच?

गुलमोहर: 

.

व्याकरणाच्या चुका टाळता आल्या तर पहा!

बाकी कविता आपल्या नेहमीच्या शैलीतच आहे. काहीतरी नवीन सापडावे अशी वाचक म्हणून अपेक्षा.

अगदी खरंय, निरोप कधीच टळत नाही.
आणि हा निरोप जाणार्‍यापेक्षा मागे राहणार्‍याला पचवणं अधिक अवघड जातं.

हे भलते अवघड असते - शाम Happy

निरोप घेतल्या-दिल्यानंतरची व्यथा अगदी नेमक्या शब्दांत मांडलीएस.

आशय आवडला,
कविता मनाला पटली
पण नेहमीइतकी भिडली नाही.

(कदाचित मागे राहणार्‍याच्याच बाजूने विचार
मांडला गेल्यामुळे असू शकेल)

उकाका, भुंगा धन्स, पुन्हा एकदा वाचेन!
अमित, दक्षू, निंबे, योगूली तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे Happy

रसग्रहण :

कवयित्री अत्यंत धूर्त आहे. तिने जा या अक्षराने कवितेची सुरुवात केलेली आहे. याच अक्षराने सुरुवात का ? हा प्रश्न वाचकाने मनास विचारणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपोआपच शेवटचे अक्षर काय असावे ही उत्सुकता चाळवते. तर ते "च" हे अक्षर आहे. सुरुवातीचे जा आणि शेवटचे अक्षर मिळवले असता जाच हा शब्द निर्माण होतो.

डोळ्यांचे मूक संवाद हे पीडीत व्यक्तीचे शाप असावेत का ? कदाचित असावेत. म्हणूनच डोळ्यांत नेमक्या क्षणी लाव्हा फुलला असं सुचवायचं आहे.

अर्थात कवयित्रीने कुणाला तरी जाच केला असावा यास्तव ती व्यक्ती निघून चाललेली आहे आणि तिला निरोप देण्यात येत आहे हा लाक्षणिक अर्थ या कवितेतून निघत आहे. अर्थात मागे कटू आठवणी राहीलेल्या असल्या तरीही एखाद्या राजनेत्याच्या कुशलतेने कवयित्रीने त्यास पाऊलखुणा, भास, श्वास असे मधाळ शब्द वापरून शालजोडीतून निरोप दिलेला आहे दिसून येते.

एकंदरीतच घालवून दिलेल्या व्यक्तीच्या जाण्याचा वृ. सरकारी बाबूने मधाचं बोट लावून लिहावा तद्वतच ही कविता आपल्या उद्दिष्टात यशस्वी झालेली आहे.

एखादी गोष्ट आवडली की तिला जस्टीफाय करायला काहीही करावे तसे हे तुमचे रसग्रहण वाटले Kiran.
अर्थात कविता आवडण्यासारखीच आहे यात काहीही संशय नाही. पण तुम्ही स्वीकारलेला अर्थ पाहिल्यास 'डोळचे निग्रही पाणी' वगैरे पटण्यासारखे होत नाही. 'जाच' तर फारच दूरवर जाणं झालं.
माझ्या वैयक्तीक मताचा राग नसावा.

Pages