वारकरी

Submitted by vedangandhaa on 30 June, 2012 - 03:06

जशी किसानाला लागे
ओढ मृगाच्या सरीची
चाले चातक वारकरी
वाट आषाढी वारीची.

दिंडी अबीर बुक्यात
टाळ मृदंग वाजती
तुझे नेत्र दोन्ही देवा
जणू अमृत पाजीती.

ज्ञानेश्वराचा वारू
कसा भेदीतो रिंगण
देवा तसे दान द्यावे
व्हावे विश्वाचे अंगण.

विश्व पायापाशी यावे
असा जुळे धागा दोरा
सारे विसावले अंतरंग
भिमा चंद्रभागा तीरा.

काळ्या सावळ्याच्या गळा
शोभे तुळशीचा हार
माझा संसार फाटका
देवा तुझ्यावर भार.

नाव हाकरीतो सारी
सार्‍या जगताचा त्राता
उभी सावळी सुकुमार
संगे रखुमाई माता.

गंध केशराचा टीळा
वाटे तुझ्या भाळी लावू
जीव वेडा पीसा होई
देवा पुन्हा-पुन्हा भेटी येऊ.

सौ. विनिता लक्ष्मण पाटिल.(कुलकर्णी)
डोंबिवली(पु).

गुलमोहर: 

ज्ञाणेश्वराचा वारू
कसा रिंगण भेदीतो>>>>>कसा भेदीतो रिंगण
देवा तसे दान द्यावे
व्हावे विश्वाचे अंगण.

माझा संसार फटका>>>>>फाटका.

उभी सावळी सकुमार>>>>>सुकुमार पाहिजे का?
आवडली.

छान Happy

छाने