Submitted by प्राजु on 30 July, 2012 - 09:35
झुकती माडे, झुलत्या तारा
बेभान वारा, हुम्मण हुम्मण
विजेची रेघ, नभाची पाटी
मेघांची दाटी, झुंबड झुंबड
गळती कौले, पन्हाळ सडे
होडीही बुडे, अल्लड अल्लड
पाऊस प्राण, तहान शमे
घुमट घुमे, घुम्मड घुम्मड
डोंगर कडे, नाचरी दरी
झेलीत सरी, झिम्मड झिम्मड
ओढाळ झरा, खळाळ भारी
डोंगर पारी, हुल्लड हुल्ल्ड
पाऊल माझे, पाण्यात नाचे
अंगणी वाजे, घुंगूर घुंगूर
पाऊस माझा, साजण होई
थेंबांचे देही, गोंदण गोंदण
देऊनी मला, ओलेती मिठी
ओलेत्या ओठी, चुंबन चुंबन
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वाव्,सुंदर शब्दांची
व्वाव्,सुंदर शब्दांची अतिसुंदर कविता.
अभन्ग या कव्यशैलीचा सुन्दर
अभन्ग या कव्यशैलीचा सुन्दर अविष्कार (एक नवा अवतार )
बहिणाबाईनी ओवीची जशी अष्टाक्षरी केली तशी !!छान
काविता म्हणून बघता छानच आहे यात सन्शय नाही
चौथ्या चरणात एकाच शब्दाची द्विरुक्ती यशस्वीपणे पन्च निर्माण करते दरवेळी
हुम्मण शब्द खूप आवडला ......
एकच प्रतिसाद दोनदा सेव्ह
एकच प्रतिसाद दोनदा सेव्ह झाल्याने हा प्र.का.टा.आ.
नादमय!
नादमय!
पुन्हा एकदा शब्दगंधसडा !!!!
पुन्हा एकदा शब्दगंधसडा !!!!
शोधून वाचली. लवून कुर्निसात
शोधून वाचली. लवून कुर्निसात या प्रतिभेला !!!
प्राजू....बस नाम ही काफी है
अतिशय सुरेख........
अतिशय सुरेख........
मनापासून आभार मंडळी!
मनापासून आभार मंडळी!
विजेची रेघ, नभाची
विजेची रेघ, नभाची पाटी
मेघांची दाटी, झुंबड झुंबड
पाऊस माझा, साजण होई
थेंबांचे देही, गोंदण गोंदण
मस्तय हे ...आहाहा!
वाह! ही कविता म्हणजे एखाद्या
वाह! ही कविता म्हणजे एखाद्या मस्तमौला माणसाने पावसात भिजतांना उत्स्फूर्त निघालेल्या नादांची रेलचेल आहे शेवटची दोन कडवी खासच
लय आणि शब्दांची दिरुक्ती या
लय आणि शब्दांची दिरुक्ती या वेगळेपणामुळे आवडली.
सहीच! आवडलीय!
सहीच! आवडलीय!
मस्तये..........आवडली.......
मस्तये..........आवडली.......
अतिशय सुंदर शब्दरचना आवडली
अतिशय सुंदर शब्दरचना आवडली
प्राजक्ताच्या सड्या
प्राजक्ताच्या सड्या सारखी....!
नाही आवड्ली
नाही आवड्ली
शब्दराजा -हिनाटिडीन घेऊन पहा
शब्दराजा
-हिनाटिडीन घेऊन पहा बरं..
तुम्हि घ्या हिनाटिडीन आणि रहा
तुम्हि घ्या हिनाटिडीन आणि रहा टनाट्ण
प्राजूजी आपल्या
प्राजूजी
आपल्या काव्यप्रतिभेला व क्षमतेला पूर्ण न्याय न देऊ शकणारी अशी वाटली ही कविता.
कदाचित घाईत लिहिली असावी.
सुरेख आणि सुरेल........!
सुरेख आणि सुरेल........!