चिंब भिजलेले "किल्ले पुरंदर-वज्रगड"

Submitted by जिप्सी on 29 July, 2012 - 09:54

कश्मिरहुन परत येऊन दोन आठवडे झाले आणि एक अख्खा विकांत घरीच बसुन घालवला. पण पावसाळ्यातला "महाराष्ट्र" साद घालतच होता. तेंव्हा २८ जुलै च्या विकांताला कुठे तरी जायचे नक्की करतच होतो. शेवटी पुरंदर-वज्रगडचा बेत ठरला. मायबोलीकर आशुचॅम्प, दिपक डी आणि दिपकचा मित्र गणेश असे चौघे ठरलो. बाकीचे तिघे पुण्याचेच असल्याने मुंबईतुन मी एकटाच ठाण्याहुन वाकडला आलो आणि तेथुन दिपकच्या बाईकने आम्ही वार्जेला आशुला भेटलो. पुढे आशुबरोबर कात्रज, कापूरहोळ-सासवडमार्गे नारायणपूरला जाऊन पुरंदर वज्रगड ट्रेक संपन्न केला :-). झिम्माड पाऊस यामुळे ट्रेक सोपा असला तरी वाट बरीच निसरडी झाली होती. धुके आणि पावसामुळे फोटोही तितकेसे क्लियर आले नाही. त्यातल्या त्यात जे थोडे फार चांगले वाटले (अर्थात मला Wink ) तेच इथे शेअर करतोय. Happy

किल्ले पुरंदर-वज्रगड (माहिती विकीहुन साभार):

सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बोपदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

इतिहास
पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदऱ्या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.
इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला

पुरंदरचा तह
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.' मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.' खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
वीर मुरारबाजी आणि किल्ले पुरंदर

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
बिनी दरवाजा

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?

प्रचि १४

प्रचि १५
पुरंदरेश्वराचे मंदिर

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
श्री केदारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍या

प्रचि २५
दाट धुक्यातले श्री केदारेश्वर मंदिर

प्रचि २६

प्रचि २७
किल्ले वज्रगड

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४
जलतरंगाचे फोटो शूट करताना मायबोलीकर आशूचॅम्प Happy

प्रचि ३५
पुन्हा भेटुच... Happy

=======================================================================
=======================================================================

गुलमोहर: 

मेल्या वृत्तांत कुठाय....नुसतेच फोटो टाकलेस ते...
आणि सगळेच फोटो टाकलेस...आता मी काय झब्बू देणार डोंबल....आपले बरेचसे फोटो सारखेच आलेत. (थांब त्यात काही वेगळे अँगल आहेत ते टाकतो....)
त्या बुरुजावर बसलेल्या काकूंचा फोटो एक नंबर आलाय... पण त्या अगदीच कोपर्यात गेल्यात...थोडा अजून क्रॉप करून त्यांना हायलाईट करून पहा बरे...
त्या लाल देवळाचा फोटो जितका वाटला होता तितका नाही इफेक्ट आला..(मी पण करून पाहीला....मजा नाही आली तितकी हो ना)
बाकी डीडीचा फोटो खल्लास आलाय...त्याच्या उड्या नाही टाकल्यास
रच्याकने...माझा अवतार अगदीच कॉमेडी होता की...फोटोत पाहिल्यावर कळले Happy आणि तिथून काढलेले फोटोसुद्धा गंडलेत Sad

कुलु, रीया, मालक, आशु प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Happy

मेल्या वृत्तांत कुठाय....नुसतेच फोटो टाकलेस ते>>>>अरे, आपले काय ठरलेलं विसरलास का?. वृतांत तु लिहिणार आणि फोटो मी टाकणार. Happy मी माझं काम केलं. आता वृतांत येऊ देत. Wink

आपले बरेचसे फोटो सारखेच आलेत>>>> Happy

त्या बुरुजावर बसलेल्या काकूंचा फोटो एक नंबर आलाय... पण त्या अगदीच कोपर्यात गेल्यात...थोडा अजून क्रॉप करून त्यांना हायलाईट करून पहा बरे>>>>>तो फोटो हवा तसा नाही आलाय रे. क्लिएरीटी गंडलीय. Sad

वॉव्..मस्तच रे जिप्स्या.. लक्कीयेस तू आणी तुझ्यामुळे आम्हाला घरबसल्या काय्काय पाहायला मिळतं म्हणून आम्हीपण लक्की!! Happy

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

तु पुण्यात येवुन पण न भेटता जातोस..>>>>झक्कास, पुन्हा केंव्हा तरी नक्की रे. हि खुपच धावती भेट होती. Happy

शेवटचा फोटो (प्र चि ३५) कसा काढला आहेस - एक उत्सुकता.....>>>>>शशांक, पिकासामध्ये इफेक्ट दिलाय. Happy

.

जिप्सी, मस्त फोटो!! अरे वज्रगडाच्या वाटेवर फ्रेरिया ही दुर्मिळ आणि फक्त पुरंदरवरच सापडणारी वनस्पती दिसते या दिवसांत. तुला सांगितले असते तिचेही फोटो काढायला. असुंदे... परत पुढच्यावेळी...

अप्रतिम प्रकाशचित्रे.....:स्मित:
भिजलेल्या पुरंदरावरच्या भिजलेल्या आठवणी आठवल्या या निमित्ताने.

धन्यवाद.

मस्तच.... वर धुके जरा कमी असते तर अजुन चांगले फोटो भेटले असते....
पण जबरदस्त धमाल आली....!!!!

प्रचि ३५ - १ नंबर....!

सुंदर.

जिप्स्या, सर्व फोटो जबरदस्त आलेत. पण आपले ठरले असतानाही तु मला बोलवायचे विसरलास :रागः
एक छोटीसी करेक्शन - "बापदेव घाट" नाही तर "बोपदेव घाट" Happy

Pages