डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

Submitted by सुधाकर.. on 26 July, 2012 - 05:47

नाहीच कोण येथे आले बनून ढाले*
छातीत खोल माझ्या गेले रुतून भाले.

पश्च्यात* कोण माझी चेष्टा करून गेले
डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

सोडून गाव आता जावे निघून कोठे?
गावात निंदकांचे पाढे रचून झाले.

आहेस कोण तू ही? आला कशास येथे?
माझाच भास मजला कोडे अशक्य घाले.

ओठात शब्द खोटा नाही कधीच आला
सत्याचे रोज ओठा द्यावे कुठून प्याले.

कोणास कोण खांदा कोणी कुणास वांदा
विश्वात गैर आता गाडा असाच चाले.

-----------------------------------------------------------------------------

ढाले = अंगावर येणारे वार ढालीने अढवणारा, दुसर्‍याचा जीव वाचवणारा.

पश्च्यात = उद्देशीत व्यक्ती नसताना, मागुर्‍या. चेहर्‍याआड
-----------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त!

पाश्यात कोण माझी चेष्टा करून गेले
डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.>> पाश्यात?

सोडून गाव आता जावे निघून कोठे?
गावात निंदकांचे पाढे रचून झाले.>> वा!

आहेस कोण तू ही? आला कशास येथे?
माझाच भास मजला कोडे अशक्य घाले.>> सुंदरच..

ओठात शब्द खोटा नाही कधीच आला
सत्याचे रोज ओठा द्यावे कुठून प्याले.>> Happy

छान