साद देती हिमशिखरे : भाग-६ : सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग, वाघा सीमा.

Submitted by शोभा१ on 23 July, 2012 - 03:23

http://www.maayboli.com/node/30435
http://www.maayboli.com/node/30957
http://www.maayboli.com/node/31336
http://www.maayboli.com/node/34708
http://www.maayboli.com/node/35870
http://www.maayboli.com/node/35871

दिनांक २८.१०.११. नेहमीप्रमाणे लवकर ऊठून प्रथम काही फोटो काढले.
१.

२.

नंतर आवराआवर केली. चहा-नाश्ता संपवून नेहमीप्रमाणे वाट पहात बसलो. (कोणाची? सुज्ञास जास्त सांगणे न लगे.:फिदी:)
आले आले (एकदाचे)’विर’ आले. आणि प्रवास सुरू झाला. आज सर्वांचे चेहरे फ़ारच खुललेले दिसत होते. कारणही तसच होत. आम्हाला प्रथम सुवर्णमंदिरात, नंतर ‘जालियनवाला बाग’ इथे जायच आहे.
तसेच सर्वात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आज आम्ही, आपल्या ‘वाघा सिमे’वर जाणार आहोत. दर शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता संचलन असते.

प्रवासाची सुरुवात फोटोने केली.
३.

आजूबाजूला हिरविगार झाडे (जंगलच होत ते)आणि रंगीबेरंगी फुले पाहून ’मन माझे मोहून गेले’. पिवळ्या फ़ुलानी तर झाडे भरून गेली होती. पण पुष्कळ प्रयत्न करूनही एकही फ़ोटो नीट आला नाही. Sad कारण रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे आमची गाडी वेगात चालली होती.
आणि एका ठिकाणी हृदयद्रावक दृश्य पहायला लागलं. एक गाय रस्त्याच्या कडेला मरून पडली होती आणि कोल्हा आपल भोजन करत होता.:अरेरे: ती गाय वरती डोंगरावर चरताना, पाय घसरून खाली पडली असणार. आणि गेली बिचारी. Sad सगळ्यांनाच वाईट वाटलं.
आता मी कॅमेराला विश्रांती देण्याचे ठरवले. साधारण दिड तासाने ’ठरलेल्या’ Wink हॉटेल समोर गाड्या थांबल्या. आम्ही जरा विरोध केला. "आताच नाश्ता नको. नंतर करू". पण ताबडतोब आम्हाला उत्तर मिळालं " आता या नंतर जवळपास हॉटेल नाही ३-४ तासानंतरच हॉटेल आहे." झालं. सगळे न बोलता खाली उतरलो आणि हॉटेलच्या पायर्‍या चढलो. नाश्त्यासाठी काय आहे त्याची चौकशी झाली. मेनूकार्ड मागवलं. आणि प्रत्येकाने "काही नको", म्हणून सांगायला सुरुवात केली. मेनूकार्डावरच्या पदार्थांपेक्षा, त्याच्यासमोरचे आकडे पाहून सगळ्यांचा विरस झाला. शेवटी वृद्ध लोकांना आणि डायबेटीस पेशंट्ना आग्रह करून नाश्ता करायला लावला. इथले दर पहा तरी किती स्वस्त होते.
१. पुरी-भाजी : फ़क्त रु.८०/- (यात फ़क्त चार पुर्या आणि अर्धी-पाऊण वाटी बटाट्याची भाजी होती.)
२. सॅंडवीच : फ़क्त रु.५०/- (यात लहान पावापासून बनवलेली छोटी छोटी ४ सॅंडवीच होती(जेमतेम ३ इंच लांब आणि १ इंच जाड)

आम्ही त्या हॉटेलच नाव ४२० ठेवलं.
आमचं बिल पहा.
पुरी-भाजी २ : १६०.००
सॅंडवीच ३ : १५०.००
पाण्याच्या बाटल्या ३ : ९०.०० (ह्याचा दर, बिल हातात आल्यावरच
कळला आणि तहानच पळाली :फिदी:.)
वॅट ५% : २०.००
४२०.००

कदाचित काही लोकांच्या मते, हे दर कमी असतीलही.:डोमा: पण आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाला ते जास्तच होते.
इथेही आम्ही फ़ोटो काढलेच.
हेच ते हॉटेल ‘४२०’
४.

हे लाकडी छत/छत्री. याच्यावर जे नळे दिसतायत, ते पण लाकडाचे ओंडकेच आहेत.
५.
हे काय?
६.

हे एक सुंदर झाड. याच नाव काय? (बॉटल ब्रश का? माबोवरच पाहिलेल व वाचलेल आठवतय.)

याच ठिकाणी ऊभ राहून आम्ही हॉटेलच बिल पाहिलं आणि हॉटेलचालकाचा उद्धारही केला. Proud
७.

गाडीत स्थानापन्न झालो आणि फ़राळाच्या पिशव्या सोडल्या. नाश्ता झाला. सृष्टी सौंदर्य न्याहाळत पुढे निघालो. घाटातून गाडी वर वर जात होती. घाट फ़ारच अरूंद होता, आणि दरीच्या काठावरून रस्ता जात होता. त्यामुळे ड्रायव्हरची एकाग्रता भंग पावू नये, म्हणून गाडीत नि:शब्द शांतता होती. आजूबाजूला दिसणारे, पक्षी, प्राणी, माकडे, विविध वृक्ष-वेली, आणि रंगीबेरंगी फ़ुले पहातानाच, किती फूट आपण वर आलोय हे पहायला विसरत नव्हतो. कधी १२०० फूट तर कधी २१०० फूट असे आकडे दिसत होते. Happy
गाडी डलहौसी/जी’त आली आणि शिस्तीत शाळेत जाणारी मुले दिसली. इथे मिल्ट्रीची शाळा आहे. त्यामुळे गणवेष परिधान केलेली, एका रांगेत चालणारी (रस्त्यावरून जातानाही)लहान मुले/मुली फारच गोंडस दिसत होती. मुलांचा ’मिल्ट्री कट’ केलेला होता. एवढ्या थंडीतही, शाळेत शिस्तीत जाणार्‍या मुलांच फ़ारच कौतुक वाटले.
दुपारी साधारण १२.३० ते १ च्या दरम्यान आम्ही अमृतसरला पोहोचलो.
ऊन तर फ़ारच होतं. खूप काही बघायच असूनही, वेळ नसल्यामुले, भराभर चालत मंदिराकडे निघालो. सुट्टीमुळे तिथे प्रचंड गर्दी होती. आम्हीही त्या गर्दीत सामील झालो. ढकलाढकली, रेटारेटी करत पुढे जात होतो.
ही पहा ती गर्दी.
८.

९.

हे पहा सुवर्णमंदिर.
१०.

इथे उजव्या बाजूला जे सोनेरी खांब आहेत ना? तिथे खूप मागे आम्ही उभे होतो. तिथे डोकं झाकूनच दर्शनाला जाव लागत. म्हणून आम्ही कोणी, रूमाल बांधून तर कोणी डोक्यावर ओढणी घेऊन उभे होतो.खूप वेळ उन्हात ऊभं राहिल्यामुळे, आमच्या एका कन्येला चक्कर आली. इथेही ’आकूमै’ मदतीला धावल्या. तिला खाली बसवायला पण जागा नव्हती. त्या तिच डोक आपल्या खांद्यावर टेकवून, तिला हाका मारात, अक्षरश: ढकलत पुढे नेण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण गर्दीच इतकी प्रचंड होती, की त्याना पुढे जाताच येत नव्हत. मग मी प्रत्येकाला विनंती करत करत जागा केली, त्या लोकांनीही एकमेकाना सांगून पटकन वाट करून दिली.आणि त्यानी तिला पुढे जरा मोकळ्या जागी नेले. तिथल्या कार्यकर्त्यानीही तिला पाणी दिले, व बसायला जागा करून दिली. आम्ही तिच्या डोक्यावर पाणी मारण्यासाठी डोक्यावरची ओढणी सरकवली मात्र, त्या लोकांनी त्वरीत ती डोक्यावर घ्यायला लावली. एवढी तिथली शिस्त कडक आहे. (नाहीतर आपल्याकडे. काही माणसं, मंदिरात जातानाही नियम पाळत नाहीत सांगणार्‍यालाच रागवतात.) नंतर मला दर्शनाला पाठवून, त्यापण, त्या कन्येला घेऊन पुढच्या दाराने तिला दर्शन घडवून आल्या. वेळ कमी असल्यामुळे काहीही न बघता, फ़क्त पाणी पिऊन तिथून निघालो.
घाईतच काढलेले हे तिथल्या ’केन्द्रीय सिख्क संग्रहालय श्री हरिमन्दिर साहिब’ च्या इमारतीचे फ़ोटो.
११.

१२.

इथून पुढे आम्ही ’जालियनवाला बाग’इथे गेलो.
१३.

इथे १३ एप्रिल १९१९ साली सभेसाठी जमलेल्या नि:शस्त्र, निष्पाप लोकांवर, ईंग्लिश अधिकारी, जनरल डायरच्या आदेशावरून अमानुष गोळीबार केला गेला. त्यावेळी, १ हजार, सहाशे पन्नास फ़ैरी झाडल्या गेल्याची नोंद इथे केलेली आहे.
१४.

इथे अजूनही त्या गोळीबाराच्या अठ्ठाविस खूणा जपलेल्या आहेत.
१५.

१६.

या भिंतींवर त्या गोळीबाराच्या खूणा आहेत. लोकानी ह्या खूणांना काही करू नये म्हणून इथे भिंतीसमोर काच लावून संरक्षण केलेले आहे.

हीच ती विहिर, जिथे इंग्रज सैन्याच्या गोळ्य़ांपासून वाचण्यासाठी अनेकांनी उड्या मारल्या. Sad
१७.

इथे जाळी लावून ती विहिर बंद करण्यात आली आहे.
१८.

हे स्मारक आहे.
१९.

हे सर्व पहाताना संताप आला. आणि वाईटही वाटलं.
ही तिथे असलेली काही फ़ुले. आम्ही याला कोंबड्याचा तुरा म्हणतो. (खरं नाव काय आहे?)
२०.

२१.

हे कोण आहेत ओळखा पाहू.
२२.

नंतर धावतपळत येऊन गाडीत बसलो. आता वेध लागले होते ’वाघा सिमे’वर जाण्याचे.
पण रस्त्यावर ही........ गर्दी. त्यात आमच्या सारथ्याच काय डोकं फ़िरलं होत, काय माहित. पुढे जायला जागा असेल, तरी शांतपणे थांबलेला असायचा. मागच्या गाड्या पुढे जायच्या. आम्ही मात्र ’जैसे थे’. मनातल्या मनात त्याला शिव्या देत होते. उघडपणे दिल्या असत्या तर, वाघा सिमेवर न जाताच परत यावं लागल असत. Wink शेवटी हळू हळू आम्ही मार्गस्थ झालो.
गाडी जिथे उभी केली, तिथे खाली टाकलेलं पाऊल, भसकन खाली गेलं. नीट पाहिलं तर, पांढरी माती सगळीकडे पसरलेली होती. (खर तर धूळच म्हणण जास्त योग्य होईल) ती इतकी मऊ होती की, त्यात खेळत रहाव असं वाटत होत. पण पुढे जायची उत्सुकता त्याही पेक्षा जास्त होती. मग त्या मातीत पाय रोवत, आणि कपड्यांवर माती उडवत, भरभर पुढे गेलो. तिथे तर प्रचंड गर्दी होती. आता आपल्याला असेच परत मागे फ़िरावे लागणार असे वाटले. काही ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फ़ळ ठरला. मनातल्या मनात परत एकदा………………..असो. पण आकुमै. नेहमीप्रमाणे इथेही आघाडीवर होत्या. त्यानी आम्हाला दोन गट करायला सांगितले. पुरुषांचा एक, व स्त्रियांचा एक. नंतर गाडीजवळ भेटायच अस ठरवूनच, दोन्ही गट वेगवेगळे झाले. (आमच्या गटात त्या, त्यांची मुलगी, त्यांची आई, आणि आम्ही चौघी होतो.) त्या पुढे (अर्थात गर्दीत घुसतच) आणि आम्ही त्यांच्या मागे.जागा मिळाली नाही की परत दुसरीकडे. अस फ़िरत होतो. आणि एका ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं,...............त्यांची मुलगी आमच्या बरोबर नव्हती. एवढ्या प्रचंड गर्दीत आम्हीच एकेमेकाना दिसत नव्हतो. ती तर कुठे होती, हे ही माहित नव्हत. शोधण्याचा प्रयत्नही फ़सला होता. आधी त्या घाबरल्या होत्या. त्यानी तिला मोबाईलवर फ़ोन केला. पण फ़ोनही लागेना.एकीकडे त्यांचे आम्हाला घेऊन घुसखोरी करणे चालूच होते. अखेर थोड्या जागेत आम्ही सगळ्या उभ्या राहिलो. मनात मात्र विचार ’तिचा’ होता. आता तिला कसं शोधायच? आम्ही परत परत त्याना त्याविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी, "तुम्ही आधी हे बघा, ती असेल इथेच कुठेतरी नंतर भेटेल" असे सांगितले. पण त्यांच्या मनातली काळजी त्यांच्या चेहरयावर उमटली होती. साहजिकच होत ते. बघा या गर्दीत तिला कशी शोधायची आणि ती तरी आम्हाला कशी शोधणार?
२३.

हा फ़क्त समोरचा एक फ़ोटो आहे. याच्या कितीतरी पट गर्दी तिथे होती.
हा आपला डौलात फ़डकणारा तिरंगा.
२४.
२५

इथे राष्ट्रभक्तीपर गाणी लावली होती.
ती म्हणजे,
१. सुनो गौर से दुनियावालो, बुरी नजर ना हम पे डालो,
चाहे जितना जोर लगालो, हम है हिंदुस्थानी, हिंदिस्थानी.

२. मुझे रंग दे बसंती चोला,
अजूनही बरीच होती. आता आठवत नाही. Proud

आणि अनेक मुली, व स्त्रिया त्याच्या तालावर नाचत होत्या.
२६.

२७.

अगदी परदेशी स्त्रिया पण यात मागे नव्हत्या.
२८.

इथे सूर्यास्त लवकर होतो. हा आहे ४.३९ वाजता काढलेला फ़ोटो.
२९…

सूर्यास्तानंतर संचलन सुरू होते.
३०….

"भारत माताकी जय," "वंदे मारतेम". अशा जयघोषानी सारा आसमंत दुमदुमून
गेला होता. अंगावर रोमांच उभे राहिले., ऊर अभिमानाने भरून आला.
तिथे असताना, ते सगळं अनुभवताना, जे काही वाटतं होत त्याला शब्दबद्ध करणं केवळ
अशक्य आहे.
संचलन सुरू.
३१..

३२…

३३……

हा एक व्हिडीओ पहा. यात आपल्या आणि त्यांच्यामधील दोन्ही दारं उघडलेली दिसतायत. गर्दीमुळे, लोकांच्या धक्क्याने शेवटी कॅमेरा हलला आहे.
३४..

३५… इथे दोन्ही दारे पूर्ण उघडलेली दिसत आहेत
.….

आणि आता हे संचलनानंतर बंद केलेल दार.
३७….

नंतर ही अविस्मरणिय आठवण बरोवर घेऊन आम्ही गाडीत स्थानापन्न झालो.

आता इथे, काय काय खरेदी करायची याची चर्चा सुरु झाली. बाजारपेठेत पोहोचलो तेव्हा ८ वाजले होते. आणि जवळजवळ सर्व दुकान बंद झाली होती. जी दुकाने उघडी होती, त्यातील माणसांना घरी पळण्याची घाई झाली होती. त्यामुळे फ़क्त अक्रोडच्या खरेदीवर समाधान मानावे लागले. इथे चांगल्या वस्तू मिळतात म्हणून, (आणि वेळेअभावी) आधी खरदी केली नव्हती. नंतर जेवणासाठी हॉटेलची शोधाशोध केली.(कारण आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो. ते फ़ारच लांब होतं आणि सगळ्यांना सपाटून भूक लागली होती.) दोन -तीन हॊटेलं पालथी घातल्यावर एक हॊटेलात नंबरात थांबलो. भूकेने जीव कासावीस होणे, म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवलं. जास्त वाट पहाण शक्य नसल्याने डोसा, भेळ, कटलेट, असं जे काही मिळालं त्याचा समाचार घेतला. नंतर जसं जमेल तसं हॉटेलचा रस्ता धरला. गरम गरम पांघरूण घेऊन, झोपेच्या स्वाधीन झालो.

दिनांक २९.१०.११. नेहमीप्रमाणे लवकर ऊठून आवरलं. आज आम्ही आनंदात होते आणि उदासही होतो. कारण आज सकाळी आमची रवानगी रेल्वे स्टेशनवर होणार होती. खूप दिवसानंतर घरी जाण्याचा आनंद आणि ह्या निसर्गदर्शनाला मुकणार हे दु:ख अशा दोलायमान अवस्थेत असतानाच, आमचे सारथी आले, आणि आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडले. नियोजित रेल्वेने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. गाडीत नि:शब्द शांतता होती. प्रत्येक जण खिडकीबाहेर पहात, निसर्ग जास्तीत जास्त नजरेत आणि मनात साठवण्याचा प्रयत्न करत होता.
हे काही फ़ोटो.

दिनांक ३०.१०.११. ची सकाळ रेल्वेतच उगवली. आवरून नाष्टा करून पुढचा प्रवास सुरू झाला. आता उत्सुकता होती घरी पोहोचण्याची. दुपारी ३-३.१५ ला गाडी मुंबईला पोहोचली. आणि पुण्याला कसे जायचे याचा विचार सुरू झाला. (कारण नीता वोल्वोच्या गाड्या मिळतात, असा आमचा समज होता. तो गैर असल्याचा लवकरच लक्षात आलं.
चौकशी करता, करता एक माणूस भेटला व त्याने "मी दोन गाड्या (चार चाकी)तुम्हाला भाड्याने देतो, मी गाड्या घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही जेऊन घ्या " असा मोलाचा सल्ला दिला.
नेहमीच्या ’उत्साही’ सामानाजवळ थांबल्या आणि आम्ही कँटीनचा रस्ता धरला.
सामानाजवळ असलेल्याना पार्सल पोहचवून ,कँटीनमध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थानी भूक भागवली. बाहेर आलो. जवळ जवळ पाऊण तास झाला होता, पण अजूनही तो गाड्या घेऊन आला नव्हता. आता आमच्या नजरा आजूबाजूला फ़िरू लागल्या, कुठलीही गाडी आली की, "आली, आली". असे उद्गार ऐकू येऊ लागले. असे म्हणून म्हणूनही सगळे दमले. घड्याळाचे काटे पुढे पुढे जात होते, पण आम्ही मात्र एकाच जागी उभे होतो.
४.००, ४.१५, ४.३०,....... आता सगळ्यांच्या तोंडावर १२ वाजले होते. नाही गाड्या, नाही तो आणणारा. आता मात्र राग अनावर झाला होता. पण नाईलाज होता.

तिथे असलेले टॅक्सीवाले तर आमच्या भोवती कोंडाळ करून उभे होते. आम्ही १० माणसं आणि आमचे १९ डाग (सामान हो) याच्या भोवती त्यांचा वेढा होता. प्रत्येक टॅक्सीवाला येऊन डाग मोजून दर सांगत होता. एकाने तर सामान उचलून न्यायलाच सुरुवात केली. शेवटी त्याला "आम्हाला कुठेही जायचे नाही. सामान खाली ठेवा ". असे सांगून सामान ताब्यात घेतले. त्यांचा ससेमिरा सोडवण्य़ासाठी, मग आम्ही रिक्षाने दादरला आलो. तेव्हा ५-५.३० झाले होते. आम्ही ६ माणसं सामानाजवळ थांबलो. आणि ४ जण बसेसच्या शोधात, इकडून तिकडे, तिकडून इकडे फ़िरत होते. शेवटी प्ततिक्षा संपली. आणि ७ वाजता एका कर्नाटकला जाण्याया ए.सी गाडीत जागा मिळाली. पण अर्धा तास झाला तरी गाडी जागेवरून हलेना. एक एक प्रवासी येऊन गाडीत बसत होता. नंतर गाडी निघाली आणि सगळ्यानी सुटकेचा निश्वास सोडला पण Sad थोडं पुढे जाऊन परत गाडी थांबली. १५-२० मिनीटानी, परत गाडी थोडी पुढे जाऊन थांबली. आता मात्र सगळ्यांचा रागावरचा ताबा सुटत चालला होता. पण मग बरोबर ८ वाजता गाडी निघाली. १० वाजता चाकणला जेवायला थांबली. आणि आम्ही ११ वाजता चांदणी चौकात उतरलो. ठरवलेल्या तीन रिक्षांपैकी दोनच रिक्षा आल्या. मग त्या दोन रिक्षातून वृद्ध, लहान मुली, अशाना पुढे पाठवून, आकुमी जोडी’ आणि मी तिथेच थांबलो. परत आलेल्या रिक्षातून आम्ही घरी पोहोचलो. तेव्हा रात्रीचे ११.३० झाले होते.
इति श्री सिमला पुराणे, प्र.ची.खंडे, प्रवासवर्णन नाम अंत्योध्याय: समाप्त. Lol

गुलमोहर: 

शोभा, बरेच दिवस लावले कि हे लिहायला. छानच लिहिलय.
(मला नाही वाटत, मी कधी जालियनवाला बागेत जायचे धाडस करू शकेन, असे !)

वावा..सुरस वृतांत आणी एकापेक्षाएक सुंदर फोटोज..
वाघा बॉर्डर नुसता फोटोच पाहून रोमांच आले..
एका साध्या गेट ने दोन देश वेगळे होताना पाहून वाईट वाटतं ना??

एका साध्या गेट ने दोन देश वेगळे होताना पाहून वाईट वाटतं ना??>>>>.>>>>>अग तो दरवाजा ऊघडला ना तेव्हा असं वाटत होत, धावत जाऊन तिकडे प्रवेश करून परत याव. पण.....................

मस्त Happy

मग आम्ही रिक्षाने दादरला आलो>> दादरला रिक्षा केव्हापासुन यायला लागल्या? असो चांगली मालिका होती.