Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्या प्रायॉरीटीज नीट ठरवा,
तुमच्या प्रायॉरीटीज नीट ठरवा, लग्न करणार असाल (आणि कसलाच छळ होत नसेल) तर ते टिकवायचा किमान काही प्रयत्न करा नाही तर तुमच्या बरोबर इतरांचीही फरपट होइल, नाती जोडा आणि जपा असेच सांगतेय मालिका. त्यात काय चुकीचे नाही वाटत मला तरी.>>> क्या बात है!!! छानच व्यक्त केलंय
मात्र हे ही खरं, की काही
मात्र हे ही खरं, की काही वर्षांपूर्वी (आदित्य ८-१० वर्षांचा असताना) मी ही मालिका नियमित पाहिली नसती आणि तितकी एंजॉयही केली नसती, जितकी आत्ता करते आहे.>>>>>> म्हण्जे हे कुठेतरी पटल ना ??
असेलही पण कुठलीही डेलीसोप पहाण्यालायक असते हेच मुळात मला पटत नाही, त्यामुळे ही चांगली का ती अस ठरवता येत नाही.

चला म्हणजे ही मालिका पहाणे आल, समज दूर करण्यासाठी.
माधव
असो लोक्स तुमच चालूदे, जास्त बोलत नाही नाहीतर एखादा लेख पडायचा
बादवे ही मालिका ११ ऑगस्टला संपणार आहे अस आमचा ह्या मालिकेत काम करणारा मित्र श्रीकर एका कार्यक्रमात भेटला तेव्हा त्याच्या कडून कळले.
ही माहिती ऐकीव असली तरी खरी आहे. अर्थ प्रत्येकाने आपापल्या सोयी नुसार काढावेत योग्य / अयोग्य. मत जाहिर करायचा आणि अर्थही काढायचा प्रत्येकालाच हक्क आहेच
ऐकीव माहितीवरून कशाबद्दलही मत
ऐकीव माहितीवरून कशाबद्दलही मत बनवणे (आणि ते जाहीरही करणे
) योग्य नाहीच 
स्मिता तुम्ही ही मलिका बघाच .
स्मिता तुम्ही ही मलिका बघाच . तुम्हाला नक्किच आवडेल.
बरोबर आहे स्मिता, हक्क आहेच.
बरोबर आहे स्मिता, हक्क आहेच. तू निदान न पाहता करते आहेस आणि तसे स्पष्ट सांगतेही आहेस.
माधव आणि ललिता +१.
(No subject)
छन्न पकैय्या छन्न पकैय्या
छन्न पकैय्या छन्न पकैय्या छन्न के उपर तितली
जो अपडेट्स देगा उसको एक किलो (व्हर्चुअल!) काजूकतली
काय लिहिलं होतं स्मिता ने?
काय लिहिलं होतं स्मिता ने? मला कुठेच दिसत नाहीये
मात्र हे ही खरं, की काही
मात्र हे ही खरं, की काही वर्षांपूर्वी (आदित्य ८-१० वर्षांचा असताना) मी ही मालिका नियमित पाहिली नसती आणि तितकी एंजॉयही केली नसती, जितकी आत्ता करते आहे.<<<
का बरं लले?
म्हणजे स्मिताचा जो मालिका न बघताच समज झालाय तो बरोबर आहे असं म्हणायचंय का तुला?
असो
काही जण पाहून शिव्या घालतात काही जण न पाहून शिव्या घालतात
काही जण पाहून ओव्या गातात काही जण न पाहून ओव्या गातात
ज्याचा त्याचा टिव्ही, ज्याचं त्याचं नरडं आणि ज्याचा त्याचा प्रश्न...
ज्याचा त्याचा टिव्ही, ज्याचं
ज्याचा त्याचा टिव्ही, ज्याचं त्याचं नरडं आणि ज्याचा त्याचा प्रश्न... >:D
स्वप्ने, काल कुहूच्या
स्वप्ने,
काल कुहूच्या लग्नाच्या स्वप्नात हरवत हरवता आपल्याही मुलीचे लग्न होईल, पोर सासरी जाईल ह्या विचाराने कातर दाखवली सुपिया काकू, मग स्वतःला सावरत तिने तिच्या मुलीली थालीपीठाची ऑफर दिली.
तिकडे, परवा घनोबा रागवला म्हणून कालपर्यंत कुहूकाकू रडत होत्या, त्यांनी तो वृ. प्रभातच्या सुद्रुढ कानांना ऐकवला, प्रभात कुहूने त्याला "प्रभातड्या" वगैरे हाक न मारता बोलते आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे असे अनुमान काढत, माझ्या गुलमोगरा, बटमोगर्या म्हणत बाकीच खूप काही नेहमीप्रमाणे तोंडातल्या तोंडात बोलून त्या मोगर्याची समजूत काढत होता.
इकडे, (नेहमीप्रमाणे, नियमीत पद्धती प्रमाणे) घनोबा अनरिजनेबल होत राधामाऊलीवर चिड चिड - तक्रार करत होता, आणि राधाही माऊलीप्रमाणे चुका कबूल करत होती:
संवाद (आठवतात तसे)
सीन- आज माऊलीचा खाली झोपण्याच क्र असल्याने त्या वळकटीवर बसून आणि घनोबा वर पलंगाच्या कठड्यावर कसाबसा टेकून.
घनोबा: राधा, आय्म सॉरी, मला माहिती नव्हतं तू कॉन्सर्ट ला गेली नव्हतीस आणि मी तुझ्यावर चिडचिड केली.... राधा.
माऊली: हे नेहमीच झालय घनःशाम, आधी चिडून मग सॉरी म्हणत बसायचं, तू असा नव्हतास आधी ... घनःशाम
घनोबा: हो, नव्हतो मी आधी असा
माऊली: आपण खरे नवरा-बायको नसलो तरी भांडतो मात्र खरे नवरा-बायको असल्यासारखेच
घनोबा: तेच तर व्हायला नकोय ना......... राधा! आपण नसलो खरे तर असे भांडायला ही नकोय
माऊली: तू सारखी अशी चिडचिड का करतोस ह्याचा विचार केला आहेस का, घनःशाम?
घनोबा: हो, आयमीन, जर तू माझ्याकडे तुझ प्रेम व्यक्त केलंस आणि मी नाही म्हणालोय तर ह्यात माझं काय चूकलं .......राधा? एखाद्याला नाही वाटत आहे तसंच आता, तर ह्यात चुकीचं काय आहे? ह्यासाठी तू मला गिल्ट का देतेस? मुद्दाम कुहूचं ऐकून घेणं, माझ्या घरच्यांशी चांगलं वागणं, आईला विचारून बाहेर जाणं वगैरे.. का राधा, मला गिल्ट फील होईल असं का वागतेस?
माऊली: : घनःषाम माझ्यामुळे तुला असा त्रास होत असेल तर आय अॅम सॉरी, मी काळजी घेईन, पण एकदा तुझा मला नकार द्यायचा निर्णय झालाच आहे तर तुला अपराधी वाटाण्याचं काही कारणच नाहीये.
घनोबा::........ (इथे तो तात्याविंचूच्या शेजारचा फोटो पहावा)
माऊली: : तू तुझ्या मनातलं पूर्वाला सांगू शकला नव्हतास घनःषाम, मला मान्य आहे, बोलून दाखवण्याचा तुझा पॅटर्न नाहीय, पण तुला माझ्याबद्दलही काही वाटतंय आणि तू बोलत नाहीयेस का? तू मला होकार द्यावास, अशा अपेक्षेने नाही बोलत मी हे घनःषाम (इथे खळ्ळ्कन पाणी) पण तू ह्यावेळी असेच केलेस तर नंतर तुला फार पश्चाताप होईल आणि कदाचित तेव्हा फार उशीर झालेला असेल...
घनोबा:: (मख्ख) ( तुझ्याविना मेल वर्जन व 'तुझ्याविना' शब्दाचे पालूपद, पण प्रेमाची कबूलीचं घोंगडं भिजतंच)
माऊली: : (झोपते)
घनोबा:: (रेस्ट्लेस)
आता,
सकाळ
सीनः किचन, बाबा फॉर अ चेंज डायनिंग टेबलवर पेपर वाचत आहेत, इलाकाकू कशाला तरी वाफ आणत आहेत, राधामाऊली काहीबाही करत आहेत,
घनोबा: आयडी-बाबा, मी म्हणालो होतो ना जॉबसाठी अप्लाय केलंय, तो जॉब मला मिळालाय .....इथे....मुंबईतच आहे तो
(एकमेकांना पेढे खाऊ घालणे ईत्यादी)
राधामाऊलीने लिस्ट इंट्रेस्टेड असल्याचे दाखवणे व घनोबाचा चेहरा पडणे
तिकडे
इलाबैने घरात दवंडी मारून झाल्यानंतर
दिग्या व वल्लभ काकाने कार्टूनगिरी करत गच्चीवरची पार्टी वगैरे उकळणे
त्यात्य कहर :- घना, आता काय तू कर्ता सवर्ता पुरूष झालास बाबा (स्वप्ने, इथे तुझ्या कमेंटच लैच अपेक्षित :फिदी:)
स्वप्ना, काजूकतली इथेच डकव आता

बागेश्री >>> नंबर १
बागेश्री >>> नंबर १
घना, आता काय तू कर्ता सवर्ता
घना, आता काय तू कर्ता सवर्ता पुरूष झालास बाबा
अरे अरे.. मला काल मालिका पाहायचा कंटाळा आला म्हणुन नेटवर हनिमुन ट्रवेल्स पाहात बसले आणि ही सगळी गंमत मिसली

मात्र हे ही खरं, की काही वर्षांपूर्वी (आदित्य ८-१० वर्षांचा असताना) मी ही मालिका नियमित पाहिली नसती आणि तितकी एंजॉयही केली नसती, जितकी आत्ता करते आहे.<<<
का बरं लले?
म्हणजे स्मिताचा जो मालिका न बघताच समज झालाय तो बरोबर आहे असं म्हणायचंय का तुला?
मलाही हाच प्रश्न पडलाय.. निदान या मालिकेत तरी मुलांनी पाहु नये असे काही दाखवलेले नाहीय. तो सो कॉल्ड झोपण्याचा सीनही काही ठरवुन केला नव्हता आणि त्यातही खास न पाहण्यासारखे तर काहीच नव्हते. त्यापेक्षा तो हिंदीतला राम कपुरवाला सीन प्रोमोजमध्ये जास्त आक्षेपार्ह वाटत होता.
बागेश्री, सहीच लिवलं आहेस
बागेश्री, सहीच लिवलं आहेस ग......"(इथे तो तात्याविंचूच्या शेजारचा फोटो पहावा)" ह्या वाक्याला वाईट्ट हसले. तुला २ किलो काजूकतली 'माझ्याकडून' (हे माझ्याकडून 'तुझ्याविना' च्या चालीवर)
घनाला मुंबईत जॉब मिळाला? मग त्या दिवशी त्या एनव्हलपला किस करत होता ते ह्या जॉबचं होतं? का तो घरातल्यांशी खोटं बोलतोय?
>>जर तू माझ्याकडे तुझ प्रेम व्यक्त केलंस आणि मी नाही म्हणालोय तर ह्यात माझं काय चूकलं .......राधा? एखाद्याला नाही वाटत आहे तसंच आता, तर ह्यात चुकीचं काय आहे?
हायला, हा स्वतःला काय समजतो ठोंब्या, बरं झालं मी हे पाहिलं नाही. नाहीतर चिडचिड झाली असती. आणि वड्याचं तेल वांग्यावर काढायला पोरं पण नाहियेत मला
>>राधामाऊलीने लिस्ट इंट्रेस्टेड असल्याचे दाखवणे व घनोबाचा चेहरा पडणे
तालिया, तालिया, तालिया
>>घना, आता काय तू कर्ता सवर्ता पुरूष झालास बाबा
घना आधी कर्तासवर्ता नव्हता? मला तर वाटलं होतं की त्याची स्वतःची कंपनी आहे. इलाकाकू तर म्हणत होत्या की तो आपले पैसे त्यांच्या बॅन्केत जमा करतो आणि आजीची औषधं स्वतःच्या पैश्याने आणतो. (हे मला का आठवतंय? का? का? * घना स्टाईल *). हे सगळं काय कॉम्प्युटरचे स्पेअर पार्टस स्मगल करून आलेल्या पैश्याने आलं होतं काय?
का घना आधी पुरुष नव्हता? इथे मी जास्त कॉमेन्ट करत नाही बाबा.
का घना आधी कर्ता सवर्ताही नव्हता आणि पुरूषही नव्हता? मग राधाने लग्न कशाला केलं त्याच्याशी?
बादवे ही मालिका ११ ऑगस्टला
बादवे ही मालिका ११ ऑगस्टला संपणार आहे अस आमचा ह्या मालिकेत काम करणारा मित्र श्रीकर एका कार्यक्रमात भेटला तेव्हा त्याच्या कडून कळले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>
शेवटच्या भागात माझा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेत म्हणजे :डोमा:....... आणि मी प्रभातचा "वध" करणार आहे
बाकी, मालिका हल्ली बघितलीच जात नाही..... पण ज्या स्पीडने हा धागा धावतोय...... कमाल आहे.
बाकी बागेश्रीने लिहिलेल्या
बाकी बागेश्रीने लिहिलेल्या संवांदांची स्टाईल स्टार प्रवाह आणि साम टीव्हीशी मिळती जुळती आहे....
बागे, उत्तम संधी आहे तुला
>>आणि मी प्रभातचा "वध" करणार
>>आणि मी प्रभातचा "वध" करणार आहे
११ ऑगस्टपर्यंत थांबून काय तालमीत जोरबैठका काढणार आहेस? कल करे सो आज कर, आज करे सो अब....
बागेश्रीने लिहिलेल्या
बागेश्रीने लिहिलेल्या संवांदांची स्टाईल स्टार प्रवाह आणि साम टीव्हीशी मिळती जुळती आहे>>> नाही, ती एलदुगोशी मिळतीजुळती आहे. विशेषकरून ".......राधा?" आणि "... घनःशाम" हे तर एकदम पर्फेक्ट.
११ ऑगस्टपर्यंत थांबून काय
११ ऑगस्टपर्यंत थांबून काय तालमीत जोरबैठका काढणार आहेस? कल करे सो आज कर, आज करे सो अब....
>>>>>>>>>>>>>>>>>>>
स्वप्ने........ मग आता तुझे व्हर्च्युअल लाडूच तयार ठेव......... वध आणि स्वयंवर एकाच मांडवात......
मी अर्जुनाचं बेअरिंग पकडतोय , तू जरा कृष्ण होणार काय....
"बघतोस काय भुंग्या...... हा एपिसोड आणि हा प्रभात " या डायलॉगने जरा पुश मिळेल चांगला

प्रभातला
नाही, ती एलदुगोशी मिळतीजुळती
नाही, ती एलदुगोशी मिळतीजुळती आहे. विशेषकरून ".......राधा?" आणि "... घनःशाम" हे तर एकदम पर्फेक्ट
>>>>>>>>>>>>>>>
आता त्या मालिकेचेच डायलॉग्ज लिहिलेत तर ते तसेच असणार ना.....
त्यात काय नवल.... मी इतर साधर्म्य पाहून बोललो होतो..... 
आता त्या मालिकेचेच डायलॉग्ज
आता त्या मालिकेचेच डायलॉग्ज लिहिलेत तर ते तसेच असणार ना..... >>

पण ऐकणं आणि तसंच्या तसं लिहिता येणं ह्यासाठी कौशल्य लागतंय
"बघतोस काय भुंग्या...... हा
"बघतोस काय भुंग्या...... हा एपिसोड आणि हा प्रभात " या डायलॉगने जरा पुश मिळेल चांगला >>>
आवडेश.
अवघडेय बागे _/\_
अवघडेय
बागे _/\_
सगळे धन्स रे ......... वध
सगळे

धन्स रे
......... वध आणि स्वयंवर एकाच मांडवात......>> हे म्हणजे, एलदुगो बाजूलाच "भुलदुगो" सुरू झालंय (भुंग्याच्या लग्नाची दुसरी गोष्ट)
भुंग्या, कमळाला आयडी काढावा लागेल असे एकणूच चिन्ह दिसत आहेत तुझे
भुंग्या, 'हा सूर्य हा जयद्रथ'
भुंग्या, 'हा सूर्य हा जयद्रथ' हा ड्वायलॉग जयद्रथ वधाच्या वेळचा रे. रुक्मिणी स्वयंवराच्या वेळी कृष्णाने शिशुपालाचा वध करून स्वतःच रुक्मिणीला पळवून नेलं. मला कुहूला पळवण्यात काहीही इंटरेस्ट नाहिये. तस्मात तुलाच कृष्ण व्हावं लागेल.
पण ऐकणं आणि तसंच्या तसं
पण ऐकणं आणि तसंच्या तसं लिहिता येणं ह्यासाठी कौशल्य लागतंय>> तूच गं तूच, माझी खमै

तरी बरंय मी मधल्या ब्रेक्स मध्ये टिव्हीसमोरून उठून स्वयंपाक करत असते, नैतर मधल्या सगळ्या अॅडही तुम्हांला इथे वाचाव्या लागल्या असत्या
बागे काहीही चाल्लय इथे
बागे


काहीही चाल्लय इथे
तुझ्याविना......
तुझ्याविना...... तुझ्याविना.... तुझ्याविना.... तुझ्याविना.....
तुझ्याविना..... तुझ्याविना..... तुझ्याविना..... तुझ्याविना.......
भास का हा तुझा होतसे मला सांग ना
जागते ओढ का सारखी अशी सांग ना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना
तुझ्याविना..... तुझ्याविना..... तुझ्याविना..... तुझ्याविना.......
उमजून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांग ना जीव हा गुंतला - २
झाले आता जरी होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांग ना
तुझ्याविना..... तुझ्याविना..... तुझ्याविना..... तुझ्याविना.......
वाट होती माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली - २
फिरूनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांग ना
तुझ्याविना..... तुझ्याविना..... तुझ्याविना..... तुझ्याविना.......
****************************************************************************************************
वरच्या गाण्यात वैशालीचा आवाज म्युट केलेला आहे...... ऐकताना काळजी घ्यावी
बाकी एपिसोड पाहताना गाणं अजिबात आवडलं नव्हतं..... पण हल्ली एपिसोड पाहातच नाही आणि हे गाणं रोजच ऐकतो...... त्यामुळे सेपरेट गाणं म्हणून छानच वाटतं...... फुल क्रेडिट टू निलेश मोहरीर आणि अमोल पाठारे.
भुंग्या, 'हा सूर्य हा जयद्रथ'
भुंग्या, 'हा सूर्य हा जयद्रथ' हा ड्वायलॉग जयद्रथ वधाच्या वेळचा रे.
>>>>>>>>>>>
स्वप्ना माहितेय ते मला.......
बागेश्री, सहीच लिवलं आहेस
बागेश्री, सहीच लिवलं आहेस ग....>>+१
Pages