कायच्या काय विडंबने

Submitted by केदार१२३ on 24 April, 2009 - 04:20

(सध्या गुलमोहोरवर चालणार्‍या कायच्या काय कविता किंवा कायच्या कायतरीच कविता वाचून 'कायच्या काय विडंबने' सुरू करावे अशी उर्मी मनात दाटून आली. त्यासाठीच हा प्रपंच)

१) कोंबू बाजारला जाते

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : गदीमांची क्षमा मागून 'रंगू बाजारला जाते' च स्वैर विडंबन

कोंबडी भुंकाया लागली भूंकू द्या
अंडी इकाया नेते इकू द्या

कोंबू डुलत डुलत चालते
गोऱ्या हातात लेखनी हालते
लेखन चोरावी एकदा वाटते, वाटते, वाटते, नको बा

जरा थांबून बोल ग कोंबू
(माझ्या डोस्क्यातल) तुझ्या डोक्यात कसं ग कोंबू ?
माजी कलेजी तुटते, तुटली तर , इकूया

कोंबू ओळख आहे मी कोण ?
माझ्या हातातला लेखण !
मी मनातल मनात ठेवते, ठेवते, ठेवते, ठेवु द्या

तुझा पाठलाग कोंबू करीन
अशी मुरडून कान मी धरीन
तुझं खानपट थोडं फोडते, फोडते, फोडु द्या

केली थट्टा अंगाशी आली
लाज कोंबूची माझ्या गेली
कोंबू थाटात कवन पाडते, चालते ? चालते तर , चालू द्या

२) बाई मी पळाली

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : प्रोफेसर आणि तमाम मायबोलीकर

(शहरातल्या स्त्रीची व्यथा मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न )

बाई मी गेली मॉलला
कार्ड घेऊन खरेदीला
मॉलच्या बाजुला ऑफर दिसली
भुंगा डसल्यासारखी पळत सुटली….

बाई मी गेली ड्रायव्हींग्गला
घेऊन पीयुसी हातात
कमीन्या गाडीची काचच फुटली
सोडली गाडी नी पळत सुटली….

बाई मी गेली डीस्कोला
पास नाय मिळाला पबचा
रस्त्यात श्रीरामसेनेची गर्दी दिसली
डीस्कोला न जाता पळत सुटली…..

बाई मी गेली मल्टीप्लेक्स्ला
तिकिट काढून थिएटरला
रामूच्या सिनेमानी नजर विटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..

बाई मी गेली पार्टीला
सोबत घेऊन नवर्‍याला
वाटेत त्याला खबर भेटली
इन्कम टॅक्स ची रेड पडली……
डोकं धरलं नी पळत सुटली……

३) नवाबाच लग्न

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : प्रोफेसर आणि तमाम मायबोलीकर

अडतीस वर्षाचा नवाब जुना
अहो पोरगी बघा ना
ह्याचं लगिन करीना
किती टशन हो ह्याच्या मना
कुठे जीव देइना
ह्याचं लगिन करीना

आमावश्येच्या चांदण्यात
हा झाडाखाली उभा ना
म्हणे 'अमृताहूनी गोड
नाव तुझे बेबो
अशा शहाण्या सैफाला
अहो पोरगी बघा ना

एवढ मोठं कुरण पाहुनी
चिंता होई त्याच्या मना
किती उंडरायच आहे अजूनी
म्हणून चरत राहेना
अशा उचापती नवाबाच
तोंड काळे करा ना

चमत्कार दोन्ही पायांनी
कसा करतो बघा ना
उभे राहेना जवळ कुणी
झाडे दुगाण्या बघा ना
अशा स्टाइलीश नवाबाला
अहो नवरी बघा ना

किती सहले हो ह्याला अमॄता
कोणीतरी समजावा हो आता
बिचाऱ्या गाढवाची वेदना
द्या हो प्रेमाची लाथ कुणी
त्याला आराम करु द्याना
ह्याचं लगिन करीना

अश्या ह्या गाढवाची
रींग टोन सेट करून द्या ना

समाप्त
आता कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर :
(हे वाचायला लागणार्‍या तमाम मायबोलीकरांची) Proud

गुलमोहर: 

:खी खी:

सहीचे.. रिंग टोन सेट करुन द्या ना Lol

जियो, एकदम सही Biggrin तुम्हाला अशाच चालना मिळत राहाणार अस दिसतय गुलमोहराचे रंग बघता Wink

-------------------------------------------------------------------------------
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

<<ह्याचं लगिन करीना>> Lol सैफला पाठव तो रींगटोन देईल Proud
केदारा, कायच्या कायच! Happy

अरे च्यायला एकदम धमाल कविता हो.
<<सैफला पाठव तो रींगटोन देईल >> हो संभाळून, कदाचित कानाखाली वाजवेल तो रिंगटोन :), शेवटी नवाब ना तो.

केदार, तुझं काय खरं नाही आता! Lol

४) कुटुम्ब लहान सुख महान

कु क्कुटपालन (१) करू आम्ही
टु मदार बंगला बांधू आम्ही
धात साखर घालू आम्ही (२)
टाटा वडा चापू आम्ही

सूण कांदा वर्ज्य करू (३)
हा सून सह्याद्री स्पर्श करु
सून आत्मा काव्य करु
सु टणार कधी यमकाचे कोडे
रचटणार जरा काव्याचे जोडे (४)

नी वसे ते स्वप्नी दिसे
हा स जरा तू हास असे
को काढू तू काव्यपिसे (५)

संदर्भ : नव-कवींच्या भयाण कवीता. अप्रकाशीत

टीपा:
१) कुक्कुट पालन का करायच ? अरे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणून काही आहे का नाही. आम्ही कोंबड्या पाळू नायतर कविता गाळू .
२) मधात साखर का घालायची ? गोडवा वाढतो म्हणून. मध परवडत नसेल तर पाण्यात साखर घाला.
३) लसूण कांदा वर्ज्य का करायचा ? आमची कविता वास्तव वादी आहे. चातूर्मास चालू आहे विसरलात का ? (प्रश्नाच उत्तर प्रश्नच?) पून्हा प्रश्न ?
४) काव्याचे जोडे खरचटणार का ? फाटणार का नाहीत ? आमची कविता तरल आहे त्यामूळे.
५) काव्याची पिसे म्हणजे ? काव्याची पिसे नसतील तर कोंबडी (पक्षी कुक्कुट) ची पिसे उपटा. हाय काय नी काय. भावना समजून घ्या.
६) 'ह' आणी 'हा' वरून दूसरे शब्द सुचले नाहीत का ? तसे सुचलेले पण सभ्यतेला धरून नव्हते म्हणून वापरले नाहीत.

कुणाची क्षमा : भारत सरकार आणि एक नवकवी
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केद्या .....अरे काय चालवले आहेस हे ..पाप लागेल लेका ! Lol Lol Lol

कुणाची क्षमा :केद्याची

पल्लवी, कविता , भावना , प्रकाश, राघव, कॄ धन्यवाद Happy

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

५) देवाने माश्यांना अस का बनवल ?

देवाने माश्यांना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर चिडायच
सगळ्याच मेल्या नकोनकोश्या वाटायच्या
मग कोणा एकीच्याच ताटात का पडायच?

कोणाचे पाय, तर कोणाचे पंख
प्रत्येकीची काहीतरी वेगळीच गुणगुण
दरीद्री मेली एका जागेवर बसत नाही
पाहताच वाजु लागते आजाराची धुन

कोणी गुणगुणून नकोस करत
कोणी लाजुन पांघरूणात शिरत
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपली निद्रा कुठे आपल्याजवळ उरते

कोणी गूणगुणून गार करत
कोणी भुण्भूणून वार करत
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक नखर्‍यात फसत

कचर्‍यातल्याही माशा कमाल करतात
नकोनको म्हणताना तोंडावर येऊन बसतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच नाका तोंडाला घेरतात

(आता कुणाची बर क्षमा मागू ? )

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

Lol केदार तुझा विडंबनाचा वेग एवढा दिसतोय की आता असे वाटते की एखादी कविता गुलमोहरावर येण्या आधीच तुझे तिचे विडंबन येते की काय

केदार तुला माश्यांनी शाप दिलाय... पुढल्या जन्मी तू माशी बनून मनुक्श प्राण्यावर नवविडंबन करशिल ....

दरीद्री मेली एका जागेवर बसत नाही >> अगदी अगदी :d

Lol
काही नवीन आणि काही 'इतरत्र' लिहिलेल्या कविता एकत्र करत आहेस का? सही.. कुक्कुटपालन! Lol

केदार! Lol
भयानक सुटला आहेस!
जरा चिलखत जिरेटोप वैगेरे घे आता! Proud

>केदारा अशक्या सुटला आहेस...
समीर नंतर तुमचाच नंबर दिसतोय.... "बाळंतपणाचा"... बाळाचं नाव मराठी का जर्मन ठेवताय?

धन्स अमोल, इन्द्रा , पूनम, कॄ , मिल्यादादा, जाये Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

६) दोनाच्या दादा

एक तरी धाव होऊ दे
कोलकोत्याच्या दादा..
मिशा तुझ्या वाढवून घे
आणि मग दाखव अदा..

बांधून घे गार्ड तु
नाहीतर सुटुन जाइल रे
बाया बापे हसतील न बघताच
'नगमा' मात्र बघून रे….

पछाडून दे लाथाडुन दे
चेंडू सगळे सोडून दे
शर्ट काढ सांभाळून
नायतर हाडांचा मुरब्बा दिसेल रे…..

फलंदाजीचा काय भरोसा
परखून घे तु जरा
आवरासावरा करुन घे
संघातून काढल तर रणजी खेळयला जायच ना रे….

पण चॅपेलच्या बाळा
इकडे काहीच सुचल नाही म्हणून
विषे कंठ काळा त्रीनेत्री ज्वाळा

होऊदे आभाळात
आता मोठ्याने गर्जना
बॅडलाईट मागून तु
कर सर्वांना तुझा मिंधा…..

एक तरी धाव होऊ दे
'दोना' च्या दादा..
मिशा जरा वाढवून घे
आणि मग दाखव अदा ..

(काळाच्या मागून येणारी कविता) Proud

(कुणाची क्षमा? दादा आणि त्याच्या तमाम भक्तांची Happy )
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

ओ शेठ तो दोनाचा दादा नाहीये "दादला" आहे... विडंबन आहे म्हणून काय बी लिवायचं नाय Happy
तवा आता दोनाची क्षमा मागा.

केदार आजार फारच बळावला आहे रे.. Proud काळजी घे.. एखाद महीना कविता, काहिच्या काहीवर वगैरे फिरू नको तिकडच वार फार बादणारं आहे Lol आराम कर...

सुसाट केदार...!!!

अहो तळीराम हे कायच्या काय विडंबन आहे ना मग तेवढ स्वातंत्र्य घेउ द्या की आमास्नी Happy

सत्या Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

७) चष्म्याला फ्रेम

काचेला फ्रेम
घातली तरी
(नंबर) कमी होत नाही....

तुझ्या ढापणात
डोळे हजर असुनही
(जल्ला) दिसत का नाही..

अधरात तुझ्या
ओष्ठ शुभ्र धुम्र नलिका (म्हंजी शीग्रेट)
धूरकांड त्यांचा होत नाही

रात्र नित्य पीत गुटीकांचे (म्हंजी रंपा) असेच
वादळ उठते
आऊट कसाच होत नाही

तु माझ्या वाटचे
हादडतोस पण... बकासुरापरी
साल्या तुला अजीर्ण (का) होत नाही...

(कुणाची क्षमा : प्रोफेसर आणि आजन्म प्रियकर)
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केदार ईडंबनात तुला डॉक्टरेट करायची आहे का?
लय भारी :d

मध परवडत नसेल तर पाण्यात साखर घाला.>>>>>>>>>>. मस्तच!!!!!!

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

तुझ्या ढापणात
डोळे हजर असुनही
(जल्ला) दिसत का नाही..
>>> सही... मूळ कवितापेक्षाही हेच जास्त करमणूकदार आहे. Happy
--------------
नंदिनी
--------------

मूळ कवितापेक्षाही हेच जास्त करमणूकदार आहे. >> जल्ला हे ठरवायला मुळ कविता वाचणे बंधनकारक आहे का? Sad

धन्स इन्द्रा , प्रिया आणि नंदिनी Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

Pages