कुजबुज

Submitted by HH on 23 January, 2008 - 01:07

KUJBUJ
~D
22 january 2008

संपादकीय
नमस्कार वाचकहो,

संक्रांतीच्या आमच्या सर्व वाचकांना शुभेच्छा. साखरेच्या (काटेरी) हलव्या सारखी ही कुजबुज गोड मानून घ्याल अशी आशा आहे.

हितगुजचे नवे बदललेले रूप बघून कुजबुज सुद्धा नविन रंग रूपात सादर करायचे आम्ही ठरवले होते पण गणेशोत्सवातील रोडावलेला प्रतिसाद आणि सध्याच्या नविन गुलमोहोराकडे ढुंकूनही नं बघणारे हितगुजकर पाहता रूप बदललेल्या कुजबुजला सुद्धा कोणी गिर्‍हाईक मिळणार नाही या भितीने जुन्याच रुपातील कुजबुज प्रकाशीत करीत आहोत.

हितगुज admin ने गुलमोहोर वरती गेल्या २४ तासातील लेखन अशी ठळक अक्षरातील स्पष्ट पाटी लावून सुद्धा हल्ली तिथे लेखन कमी आणि प्रकाशचित्रे जास्त अशी अवस्था झाली आहे. हितगुजवरील कुख्यात लेखक सुद्धा हल्ली रंगिबेरंगी वर जागा घेऊन आपले लेखन रंगिबेरंगी मधेच टाकतात (ते वाचायला कुणी वाचक येत नाहीत तो भाग वेगळा.).
मात्र रंगिबेरंगी प्रकाशचित्रांनी व्यापलेला गुलमोहोर पाहता admin यांनी अता गुलमोहोर चे नाव बदलून रंगिबेरंगी आणि रंगिबेरंगी चे नाव गुलमोहोर असे करायला हरकत नाही.

***********************************************************

हितगुज महाविद्यालय आणि प्राथमिक शाळा नोटीस बोर्ड

सर्व विद्यार्थ्यांना हे सुचित करण्यात येते की २००८ मधील नविन सत्रापासून शाळेमध्ये खालील बदल करण्यात येत आहेत.

* बॉटनीचे शिन्देसर यापुढे कोकणी भुगोल शिकवतील.

* costume designing शिकविणार्‍या अज्जुका मॅडम आता गणीताचे तास घेतील.
खालील प्रश्नाचे बरोबर उत्तर देणारे विद्यार्थीच त्यांच्या गणिताच्या वर्गात बसु शकतील :

" जर एक मनुष्य दर एक दिवसाआड उथळ आणि पांचट हे शब्द दिवसातून तीन वेळा म्हणतो तर अशी सलग पाच वर्षे तो हे बडबडल्यास पाच वर्षात कितीवेळा उथळ आणि पांचट हे दोन शब्द लोकांना ऐकून घ्यावे लागतील?

* जॉमेट्री आणि पदार्थ विज्ञान हे दोन विषय शिकविण्यासाठी मिस मृण्मयी या नविन शिक्षीका भरती झाल्या आहेत. पदार्थ विज्ञान आणि जॉमेट्री हे दोन्ही विषय एकत्रीत शिकविण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. काल त्यांनी विचारलेल्या " लांबुळक्या प्रिझ्मॅटीक शेपचा एखादा पदार्था सांगा. " या प्रश्नाला कुणालाही उत्तर देता आले नाही.
पुढील क्लास साठी येतांना रॉम्बस शेपचा शन्करपाळी पदार्था शिवाय आणखी दुसरा पदार्थं कुठला याचे उत्तर दिल्यावरच वर्गात घेतले जाईल.

* sports teacher मुकुन्दसरांनी PT चे क्लासेस यापुढे PP च्या वर्गात घेणे बंद केले असून यापुढे ही PT ऑलिंम्पिक्स विभागात होईल.

* नन्दिनीबाईंन्च्या पत्रकारितेच्या वर्गाची नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून अभ्यासक्रमा अंतर्गत फ़िल्म्फेअर आणि स्टारडस्ट ही क्रमिक पुस्तके विद्यर्थ्यांनी वर्गात येतांना आणणे बंधनकारक राहील.

* ग्रंथपाल शोनूबाई यांनी शाळेतील parle-g कॅफेटेरिया मधे गेले काही महिने लायब्ररी उघडली असल्याने कॅफे मधे येणार्‍यांची संख्या कमी होऊन कॅफे च्या उत्पन्नात घट झाल्याचे आढळून आले आहे. कॅफेचे गिर्‍हाईक वाढावे म्हणून यापुढे कॅफे मधे खाद्यपदार्थां बरोबर पुस्तकांविषयी बोलणे आवश्यक असणार नाही असा नविन ठराव सम्मत झाला आहे.

***********************************************************

हितगुजकर विद्यार्थ्यांची क्विझ, गाणे - चित्रपट ओळखा, ईत्यादी सामान्य ज्ञान वाढविणार्‍या गोष्टींमधील रुची लक्षात घेऊन नुकतेच एका मायबोलीकर क्विझ चे आयोजन करण्यात आले होते. साप्ताहिक कुजबुज प्रायोजित या क्वीझ मधील ही काही रंगतदार प्रश्नोत्तरे :

* भारतिय कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी वयाच्या कितव्या वर्षानंतर लग्न करू शकतात?

Dineshvs : मुलाचे लग्नाचे वय कमीतकमी २१ आणि मुलीचे वय १८ असावे असे भारतीय कायदा सांगतो. जे की अमेरिकेमधे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नसल्याने दोघांचेही वय कमितकमी अठरा असले तरी चालते. नायजेरीया मधे मात्र कायदा १८ वय हवे म्हणत असला तरी मोठ्या प्रमाणात अजुनही बालविवाह होतात.

Maanus : कायद्याचे वगैरे मला काही माहीत नाही पण अठराव्याच काय एकविसाव्या वर्षी लग्न करणे हा शुद्ध मुर्खपणा आहे. अशा लोकांना उघड्या पाठीवर शंभर फटक्यांची शिक्षा व्हावी असा कायदा झाला पाहिजे. माझ्या मते माणसाचे लग्नाचे वय किमान चाळीस हे असावे. आणि शक्यतोवर पन्नाशी नंतर लग्न केले तर अधीक चांगले कारण तेव्हाच माणसाला आधाराची जास्त गरज असते.

Bee : मला उत्तर माहीत नाही, पण भारतीय कायद्याची ही सगळी पुस्तके मला कुठे वाचायला मिळतील? याचे लेखक कोण आहेत? ज्यांनी वाचली असतील त्यांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

* हितगुजवर अस्तित्वात असलेल्या कुठल्याही दोन जाती सांगा.

Zakki : हितगुजवर फक्त दोनच जाती आहेत. पुणेकर आणि पुणेकर नसलेले ईतर लोक. पुणेकरांच्या मते त्यांच्या शिवाय ईतर सर्व लोक हे Other Backward Classes मधे मोडतात.

Limbutimbu : ओरिजीनल आयडी आणि डुप्लीकेट आयडी.

Tulip : लेखक आणि खादाड लोक. (मी दोन्ही मधे मोडते!)

Manuswini : मी जातपात मानत नाही. तरी पण तुम्ही विचारताच आहत तर सांगते की दोन जातीचे लोक आहेत ते म्हणजे मैत्री करणारे लोक आणि मैत्रीच्या नावाखाली लघळपणा करणारे लोक. (यांची नावे मी सांगणार नाही उगीच मेल पाठवू नका.)

***********************************************************

काही अनामिक हितगुजकरांनी त्यांच्या मनातील भावना कुजबुजला कळवल्या. हितगुजवर त्या प्रदर्शीत करु न शकल्याने आम्ही त्या कुजबुज मधे प्रकाशीत करीत आहोत :

माझ्या मनातील भावना फारच नाजूक आहेत. व्यक्त करायचा प्रयत्न केला पण शब्द घशातच अडकले म्हणून पोस्ट पण डिलीट केले. यालाच शब्दात व्यक्त न करता येणार्‍या भावना म्हणत असावे काय?
- एक प्रामाणिक हितगुजकर.

लिंबुटिंबूला आलेले डिप्रेशन संपून तो पुन्हा हितगुजवर येऊ लागला आहे. खरे म्हणजे त्याचे ते कायमचे स्वत : शीच बडबडणे बघून मला वाटायचे की याला काहीतरी मेन्टल प्रॉब्लेम असावा. माझा अंदाज बरोबरच होता म्हणायचा. आता पुन्हा ती पाल्हाळीक स्वगते आणि विषय सोडून केलेली बडबड ऐकून घ्यावी लागणार या कल्पनेने मलाच ते डिप्रेशन का काय ते येऊ लागले आहे!
- एक चिंताक्रांत हितगुजकर.

***********************************************************

हितगुजवर आजकाल चित्रपट विषयक गोष्टींना सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. पुर्वी " चित्रपट कसा वाटला " हा एकमेव चित्रपट विषयक BB होता ज्या ठिकाणी आता चित्रपट ओळखा, गाणी ओळखा, अचाट आणि अतर्क्य चित्रपट, चित्रपट विषयक gossip असे अनेक BB सुरू होऊन ते कायम भरभरून वाहत असतात. चित्रपटांशी असे एकरूप झालेले मायबोलीकर बघून चित्रपटांची नावे आणि मायबोलीकरांची नावे यांच्या जोड्या जुळविण्याचा हा नवा टाईमपास.

योगिता_डियर : वाजवा रे वाजवा
उपास : नवरी मिळे नवर्‍याला
मृदुलताई :यंदा कर्तव्य आहे
बी : दहावी फ
अज्जुका : कडकलक्ष्मी
लिम्बुटिम्बु :सोंगाड्या
हवा_हवाई : अशीही बनवाबनवी
मनस्विनी :पक पक पकाक
मनु चा मित्र : बायको माहेरी जाते
मास्तुरे : पाठलाग
दाद : सांगत्ये ऐका
केदारजोशी : तीन पैशाचा तमाशा
आयटीगर्ल : वटवट सावित्री
पीसजी : वहिनीच्या बांगड्या
डुप्लीकेट आयडी : हा खेळ सावल्यांचा

आणि

हितगुज : एक गाव बारा भानगडी

***********************************************************

गुलमोहर: 

हवे! बॅक इन फॉर्म!! Happy जबरी!!!! ह ह पु वा!

इतकं मटेरीयल हितगूजवर असताना तू कुजबूज लिहिली नसतीस तरच नवल! Happy ग्रेट.. सर्व ठिकाणी लक्ष ठेवून असतेस हे बघून बरं वाटलं! Wink
आणि खबरदार जर पुन्हा 'वाहून जाणार्‍या बीबी'वर कुजबूज लिहिलीस तर! Happy

सणसणीत लीहीलय अगदी.

जीव हसून हसून मेतकूटीला आलाय. (मेतकूट म्हटल्यावर शोभतो की नाही पार्लेकराचा प्रतिसाद)

'ठणठणपाळ' आठवले.

इतके दिवस 'कुजबुज' फक्त वाचून होते, आज प्रत्यक्ष ऐकायला मिळाली........

मस्तच लिहीले आहे.... वाचताना जाम मजा आली...
ऑफिसमधे आहे त्यामुळे आजुबाजुला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते आहे...
जुने कुजबुजचे लेखन असल्यास ते पण द्यावे ही कळकळीची विनंती...

हवे मजा आली वाचून.. तरी अजून लिहायला हवं होतं असं वाटतंय..

तिकडे दिलाच होता प्रतिसाद इथे ही लिहितोय खुपच जबरीच लिहिलय.
नाही म्हणत म्हणत कुजबुज आलीच.
आधी काय मस्का मारुन घेणे सुरु होत की काय??? Happy

बिजली गिराने ये है आयीं, कहतें हैं इसको हवा हवाई!!!

ऑफिसमधे वाचल की जोरात हसायची मारामार होते ना!!! :):) काही विचार वाचणार्‍यांचा??? :):):)

नेहमीप्रमाणेच उच्च .........

आता या नविन वर्षात एक संकल्प कर की प्रत्येक आठवड्यात निदान एक तरी कुजबुजचा अंक काढशिल.
त्या साठी मटिरिअल द्यायला बरेचसे मायबोलीकर आहेत, तेंव्हा त्याची काळजी नसावी................ Happy

--
अरूण

यशची रीक्वेस्ट माझ्याकडून सुद्धा.......... 'कुजबुज'च्या अर्काईव्हजच्या लिंक द्या ना कोणीतरी इथे....

ह. ह. पु. वा.
आज बरेच दिवसांनी अवतीर्ण झालात.. अशीच वरचेवर फेरी मारत रहा Happy Happy

खूप दिवसांनी जोरदार कुजबुज ऐकू आली. मस्त लिहीलंय. शाळेचा नोटिस बोर्ड ठीक आहे. जोड्या जुळवा मात्र धमाल आहे.

खो खो खो (हे हसणे आहे बरं का:D)
ह. ह. अगदी ह. ह. पु. वा. मस्त कोपरखळ्या!!!! .:)

खुप मजा आली वाचताना, जुने कुजबुज वचायला मिळाले तर जास्त मजा येइल .

Bee : मला उत्तर माहीत नाही, पण भारतीय कायद्याची ही सगळी पुस्तके मला कुठे वाचायला मिळतील? याचे लेखक कोण आहेत? ज्यांनी वाचली असतील त्यांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील. :D:D:D

>>>>>>- एक चिंताक्रांत हितगुजकर. :))
अग हवे, एकच कसा असेल????? एस्जीरोडवर तर बरेच आयडीज अस्तात! Lol

जोड्या मस्तच जुळवल्याहेत! मजा आली!

(तळटीपः बायदीवे, धम्माल आली म्हणजे हवाहवाई आली किन्वा धम्माल हा हवेचा दुसरा आयडी हे असे मला सुचवायचे नाही हे)

ह. ह. --- नित्य नेहमीप्रमाणे निखळ विनोदी लिहिले आहेस हेही कुजबुज.

नमस्कार हवाहवाई,
कळवण्यास अत्यंत खेद होतो की ज्या उदात्त हेतूने आम्ही कुजबुजची वर्गणी भरली होती तो हेतू काही साध्य होत नाहीये.
(त्यामुळे पैसे वसूलले जात नाहीत असं वाटून फसवल्याची भावना मनात येऊ लागली आहे.)
गेल्यावेळची कुजबुज आपण इसवीसनापूर्वी काढल्याचे स्मरते. इतका वेळ मधे लावल्यास आमच्या हयातीत किती अंक नक्की मिळतील आणि कुजबुजच्या म्हातार्‍या चाहत्यांचे काय अशी काळजीही दाटून येत आहे.
तसेच त्यातील पानेही कमी होती. एवढी वर्गणी दिल्यावर निदान अजून १०-१५ टोप्या उडणे, अजून ४ ते ५ संवाद ज्यातून मायबोलीवरचे बदललेले वारे कळतील हे अपेक्षित आहे. ते तर नाहीच पण या वेळचा अंक तर त्याहूनही लहान आहे. मायबोलीच्या जगातील सर्व बातम्यांचा उहापोह घेतला गेलेला दिसत नाहीये. हे असेच होत राह्यले तर पुढे जाऊन तुम्ही केवळ 'कुजबुज' अशी चार अक्षरेच अंक म्हणून पाठवाल अशी आम्हाला भिती वाटू लागली आहे.
तरी या गोष्टीचा त्वरीत विचार व्हावा आणि भरपाई म्हणून या अंकाची मध्यावधी पुरवणी काढावी.
हि विनंती.
आपली विश्वासू
अज्जुका कापडचोपड

अंक फारच त्रोटक वाटला.... अज्जुकाला पाठिंबा.. पुढचा अंक लवकर आणि भरपूर भरलेला असावा....

ह. ह. पु.

'परदेसाई' विनय देसाई

(हे वर्तमानपत्र आहे, त्यामुळे वाचले. हे आधीच सांगितलेले बरे.)

अज्जुका यांना अनुमोदन. तरीही थोडक्यात आढावा घेतल्याबद्दल हवाई यांचे आभार.

बातमीफलकावर फारसे काही खळबळजनक नाही. पदार्थ विज्ञान आणि जॉमेट्री यांची सांगड घालणार्‍या वर्गाबद्दल औत्सुक्य वाटले. नवीन उपक्रम दिसतोय! कॅफेटेरिया बद्दलची बातमी दिलासादायक आहे. Happy

क्विझ मध्ये अजून काही प्रश्नोत्तरे हवी होती. लोकांची उत्तरेही त्रोटक वाटली. आणि ट्युलिप सोडल्यास कोणीही उदाहरण दिलेले नाही.

'भावना' सेक्शनही अपुरा वाटला. शब्दात व्यक्त न करता आलेल्या भावना फोटू , चित्र वगैरे टाकून सांगता आल्या असत्या.

'जोड्या जुळवा' ठीक आहे. त्यात 'आली अंगावर', 'एकटा जीव सदाशिव', 'तुमचं आमचं जमलं' इत्यादी चित्रपटांची उणीव भासते.

(सर्वांनी दिवे घ्या.)

-लालू

ह. ह. एकदम मस्त लिहिलय! हसून पोट फुटायची वेळ आली.
जुन्या कुजबुजीची लिंक कृपया द्यावी. शोधायचा कट्टाळा आलाय. पण वाचायचं आहे.
'आली अंगावर', 'एकटा जीव सदाशिव', 'तुमचं आमचं जमलं'... लालु, कोण ते मायबोलीकर? तुच सांगुन टाक पाहु! Happy तशी आयडिया आली म्हणा! Happy

-मिस मृण्मयी

>>बॉटनीचे शिन्देसर, रॉम्बस शेपचा , लिंबुटिंबूला आलेले डिप्रेशन, वाजवा रे वाजवा, बायको माहेरी जाते, सांगत्ये ऐका, तीन पैशाचा तमाशा
Happy

HH खूप मिसलं तुला आणि''कुजबुज'ला!
अंक लयीच भारी Happy
नी, लालु :):)

नाहीतर आपली सगळ्यांचीच दृष्ट लागेल अन बाई परत गायब होईल. जोड्या जुळवा मस्तच. अजून येवू देत!

बर्याच दिवसांनी कुजबुज वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद. मागच्या अंकांची पण लिंक देता आली तर ते परत वाचायला मजा येइल.

कुजबुज वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्या बद्दल आभारी आहे.

मदत समिती ही जिवन्त आहे अजुन? Happy शोधून लिन्क्स पोस्ट केल्या बद्दल धन्यवाद. पण कुजबुज चा अंक ताजाच वाचण्यात काय ती मजा. जुने न्युजअपेपर्स वाचण्यात अर्थ नसतो तसेच.

जोड्या जुळवा...एकदम भारी..:) Happy
कुजबुज चा हा अंक "प्रतिसाद" मिळतोय का नाही हे तपासून पाहिल्यासारखा पोस्टलाय का.. Happy हरकत नाही .. आजकाल इथे इतक मटेरीयल आहे की पुढे कुजबुज पोथी नक्की होईल..:)

तिन पैशांच्या तमाशाला डायरेक्ट करताना ईकडे लक्षच गेले नाही. अंक फारच छोटा आहे.

"पैशे वसुल होनार नसतील तर पुढचा अंक आमच्या कडे टाकु नये. वाचण केले जानार नाही"

Pages