कुजबुज

Submitted by HH on 23 January, 2008 - 01:07

KUJBUJ
~D
22 january 2008

संपादकीय
नमस्कार वाचकहो,

संक्रांतीच्या आमच्या सर्व वाचकांना शुभेच्छा. साखरेच्या (काटेरी) हलव्या सारखी ही कुजबुज गोड मानून घ्याल अशी आशा आहे.

हितगुजचे नवे बदललेले रूप बघून कुजबुज सुद्धा नविन रंग रूपात सादर करायचे आम्ही ठरवले होते पण गणेशोत्सवातील रोडावलेला प्रतिसाद आणि सध्याच्या नविन गुलमोहोराकडे ढुंकूनही नं बघणारे हितगुजकर पाहता रूप बदललेल्या कुजबुजला सुद्धा कोणी गिर्‍हाईक मिळणार नाही या भितीने जुन्याच रुपातील कुजबुज प्रकाशीत करीत आहोत.

हितगुज admin ने गुलमोहोर वरती गेल्या २४ तासातील लेखन अशी ठळक अक्षरातील स्पष्ट पाटी लावून सुद्धा हल्ली तिथे लेखन कमी आणि प्रकाशचित्रे जास्त अशी अवस्था झाली आहे. हितगुजवरील कुख्यात लेखक सुद्धा हल्ली रंगिबेरंगी वर जागा घेऊन आपले लेखन रंगिबेरंगी मधेच टाकतात (ते वाचायला कुणी वाचक येत नाहीत तो भाग वेगळा.).
मात्र रंगिबेरंगी प्रकाशचित्रांनी व्यापलेला गुलमोहोर पाहता admin यांनी अता गुलमोहोर चे नाव बदलून रंगिबेरंगी आणि रंगिबेरंगी चे नाव गुलमोहोर असे करायला हरकत नाही.

***********************************************************

हितगुज महाविद्यालय आणि प्राथमिक शाळा नोटीस बोर्ड

सर्व विद्यार्थ्यांना हे सुचित करण्यात येते की २००८ मधील नविन सत्रापासून शाळेमध्ये खालील बदल करण्यात येत आहेत.

* बॉटनीचे शिन्देसर यापुढे कोकणी भुगोल शिकवतील.

* costume designing शिकविणार्‍या अज्जुका मॅडम आता गणीताचे तास घेतील.
खालील प्रश्नाचे बरोबर उत्तर देणारे विद्यार्थीच त्यांच्या गणिताच्या वर्गात बसु शकतील :

" जर एक मनुष्य दर एक दिवसाआड उथळ आणि पांचट हे शब्द दिवसातून तीन वेळा म्हणतो तर अशी सलग पाच वर्षे तो हे बडबडल्यास पाच वर्षात कितीवेळा उथळ आणि पांचट हे दोन शब्द लोकांना ऐकून घ्यावे लागतील?

* जॉमेट्री आणि पदार्थ विज्ञान हे दोन विषय शिकविण्यासाठी मिस मृण्मयी या नविन शिक्षीका भरती झाल्या आहेत. पदार्थ विज्ञान आणि जॉमेट्री हे दोन्ही विषय एकत्रीत शिकविण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. काल त्यांनी विचारलेल्या " लांबुळक्या प्रिझ्मॅटीक शेपचा एखादा पदार्था सांगा. " या प्रश्नाला कुणालाही उत्तर देता आले नाही.
पुढील क्लास साठी येतांना रॉम्बस शेपचा शन्करपाळी पदार्था शिवाय आणखी दुसरा पदार्थं कुठला याचे उत्तर दिल्यावरच वर्गात घेतले जाईल.

* sports teacher मुकुन्दसरांनी PT चे क्लासेस यापुढे PP च्या वर्गात घेणे बंद केले असून यापुढे ही PT ऑलिंम्पिक्स विभागात होईल.

* नन्दिनीबाईंन्च्या पत्रकारितेच्या वर्गाची नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून अभ्यासक्रमा अंतर्गत फ़िल्म्फेअर आणि स्टारडस्ट ही क्रमिक पुस्तके विद्यर्थ्यांनी वर्गात येतांना आणणे बंधनकारक राहील.

* ग्रंथपाल शोनूबाई यांनी शाळेतील parle-g कॅफेटेरिया मधे गेले काही महिने लायब्ररी उघडली असल्याने कॅफे मधे येणार्‍यांची संख्या कमी होऊन कॅफे च्या उत्पन्नात घट झाल्याचे आढळून आले आहे. कॅफेचे गिर्‍हाईक वाढावे म्हणून यापुढे कॅफे मधे खाद्यपदार्थां बरोबर पुस्तकांविषयी बोलणे आवश्यक असणार नाही असा नविन ठराव सम्मत झाला आहे.

***********************************************************

हितगुजकर विद्यार्थ्यांची क्विझ, गाणे - चित्रपट ओळखा, ईत्यादी सामान्य ज्ञान वाढविणार्‍या गोष्टींमधील रुची लक्षात घेऊन नुकतेच एका मायबोलीकर क्विझ चे आयोजन करण्यात आले होते. साप्ताहिक कुजबुज प्रायोजित या क्वीझ मधील ही काही रंगतदार प्रश्नोत्तरे :

* भारतिय कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी वयाच्या कितव्या वर्षानंतर लग्न करू शकतात?

Dineshvs : मुलाचे लग्नाचे वय कमीतकमी २१ आणि मुलीचे वय १८ असावे असे भारतीय कायदा सांगतो. जे की अमेरिकेमधे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नसल्याने दोघांचेही वय कमितकमी अठरा असले तरी चालते. नायजेरीया मधे मात्र कायदा १८ वय हवे म्हणत असला तरी मोठ्या प्रमाणात अजुनही बालविवाह होतात.

Maanus : कायद्याचे वगैरे मला काही माहीत नाही पण अठराव्याच काय एकविसाव्या वर्षी लग्न करणे हा शुद्ध मुर्खपणा आहे. अशा लोकांना उघड्या पाठीवर शंभर फटक्यांची शिक्षा व्हावी असा कायदा झाला पाहिजे. माझ्या मते माणसाचे लग्नाचे वय किमान चाळीस हे असावे. आणि शक्यतोवर पन्नाशी नंतर लग्न केले तर अधीक चांगले कारण तेव्हाच माणसाला आधाराची जास्त गरज असते.

Bee : मला उत्तर माहीत नाही, पण भारतीय कायद्याची ही सगळी पुस्तके मला कुठे वाचायला मिळतील? याचे लेखक कोण आहेत? ज्यांनी वाचली असतील त्यांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

* हितगुजवर अस्तित्वात असलेल्या कुठल्याही दोन जाती सांगा.

Zakki : हितगुजवर फक्त दोनच जाती आहेत. पुणेकर आणि पुणेकर नसलेले ईतर लोक. पुणेकरांच्या मते त्यांच्या शिवाय ईतर सर्व लोक हे Other Backward Classes मधे मोडतात.

Limbutimbu : ओरिजीनल आयडी आणि डुप्लीकेट आयडी.

Tulip : लेखक आणि खादाड लोक. (मी दोन्ही मधे मोडते!)

Manuswini : मी जातपात मानत नाही. तरी पण तुम्ही विचारताच आहत तर सांगते की दोन जातीचे लोक आहेत ते म्हणजे मैत्री करणारे लोक आणि मैत्रीच्या नावाखाली लघळपणा करणारे लोक. (यांची नावे मी सांगणार नाही उगीच मेल पाठवू नका.)

***********************************************************

काही अनामिक हितगुजकरांनी त्यांच्या मनातील भावना कुजबुजला कळवल्या. हितगुजवर त्या प्रदर्शीत करु न शकल्याने आम्ही त्या कुजबुज मधे प्रकाशीत करीत आहोत :

माझ्या मनातील भावना फारच नाजूक आहेत. व्यक्त करायचा प्रयत्न केला पण शब्द घशातच अडकले म्हणून पोस्ट पण डिलीट केले. यालाच शब्दात व्यक्त न करता येणार्‍या भावना म्हणत असावे काय?
- एक प्रामाणिक हितगुजकर.

लिंबुटिंबूला आलेले डिप्रेशन संपून तो पुन्हा हितगुजवर येऊ लागला आहे. खरे म्हणजे त्याचे ते कायमचे स्वत : शीच बडबडणे बघून मला वाटायचे की याला काहीतरी मेन्टल प्रॉब्लेम असावा. माझा अंदाज बरोबरच होता म्हणायचा. आता पुन्हा ती पाल्हाळीक स्वगते आणि विषय सोडून केलेली बडबड ऐकून घ्यावी लागणार या कल्पनेने मलाच ते डिप्रेशन का काय ते येऊ लागले आहे!
- एक चिंताक्रांत हितगुजकर.

***********************************************************

हितगुजवर आजकाल चित्रपट विषयक गोष्टींना सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. पुर्वी " चित्रपट कसा वाटला " हा एकमेव चित्रपट विषयक BB होता ज्या ठिकाणी आता चित्रपट ओळखा, गाणी ओळखा, अचाट आणि अतर्क्य चित्रपट, चित्रपट विषयक gossip असे अनेक BB सुरू होऊन ते कायम भरभरून वाहत असतात. चित्रपटांशी असे एकरूप झालेले मायबोलीकर बघून चित्रपटांची नावे आणि मायबोलीकरांची नावे यांच्या जोड्या जुळविण्याचा हा नवा टाईमपास.

योगिता_डियर : वाजवा रे वाजवा
उपास : नवरी मिळे नवर्‍याला
मृदुलताई :यंदा कर्तव्य आहे
बी : दहावी फ
अज्जुका : कडकलक्ष्मी
लिम्बुटिम्बु :सोंगाड्या
हवा_हवाई : अशीही बनवाबनवी
मनस्विनी :पक पक पकाक
मनु चा मित्र : बायको माहेरी जाते
मास्तुरे : पाठलाग
दाद : सांगत्ये ऐका
केदारजोशी : तीन पैशाचा तमाशा
आयटीगर्ल : वटवट सावित्री
पीसजी : वहिनीच्या बांगड्या
डुप्लीकेट आयडी : हा खेळ सावल्यांचा

आणि

हितगुज : एक गाव बारा भानगडी

***********************************************************

गुलमोहर: 

हवे! कुजबुज सहित आगमन जोरदार..ऽअज्जुका आणी योग शी सहमत ... पुढचा अंक जबरि असणार यात शंका नाही

ह.ह.
पुनरागमनाबद्दल जोरदार स्वागत.
कुजबुजचा साप्ताहिक किंवा पाक्षिक अंक काढता येईल असे बघावे. वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळणार यात शंकाच नाही. तेव्हा पुढचा अंक लवकरच येवु दे.

अंक मोठा केला तर तो काहींना आवडत नाही. म्हणजे एखाद्याला आपले नाव असणे ह्यात गैर वाटते. ती भिती संपादकांना असतेच असते. वाचक तो विचार करत नाहीत. म्हणून अनुभवी हहने हा अंक लहान ठेवला असेल.. हो की नाही हह Happy

काय हे? कीती छोटा अंक, आणि किती कमी चिमटे... फारच आटोपता अंक.

छे छे.... परवडत नाही, अज्जुका आणि केदारला अनुमोदन.

क्विझ आणि जोड्या जुळावा छान आहे... प्रतिक्रिया वाचुन अजुन मज्जा आली...

तक्रार : आम्ही सुरवातिलाच लाईफटाईम सबस्क्रीपशन घेतला आहे 'साप्ताहिक कुजबुजच', साप्ताहीक नाहीतर मासिक प्रकाशन तरी व्हायला हवे..
आणि अंकात पान कमी छापुन वचाकांच्या तोंडाला पाने पुसू नये...

समजल का हवे? तुला हवे ते समज हवे, पण वाचकानां हवे ते नियमित वाचायला मिळायलाच हवे.

लोकहो तुम्ही पण सगळे नियमितपणे या हितगुजवर मग कुजबुज पण नियमित पणे होईल Happy

धन्यवाद पुन्हा एकदा सर्व प्रतिक्रियांसाठी.

लोक इथेच आहेत सगळे, काही बरा वाईट प्रतिसाद देण्यासारखं दिसलं की बरोबर येतात Happy

हे तर मी बघितलेच न्हवते.
हसून वाट! बरेच बारीक लक्ष आहे हां.

पण 'मनु चा मित्र' ही कुठली आयडी आहे नी कोणाची आहे?

हवा हवाई खुप दिवसानी !!!!
कुजबुज मधे नाव आलं म्हणजे खुप नाव झाल्यासारखं वाटलं हो.

मज्जा आली वाचताना.

सही आहे..... जुन पन वाचल..... Happy
(वि)संवाद स्रवात मस्स्त होत....

" वडाच्या सालीची चटणी कशी करतात कुणाला माहीत आहे का? खानदेशात ही फार प्रसिद्ध आहे. "

Happy
एकटा.....

माहीतच नव्हतं कुजबूज अजून अस्तित्वात अहे म्हणून .... Happy

हितगुज : एक गाव बारा भानगडी >>>>> इतर गोष्टींबद्दल माहीत नाही पण हे मात्र अगदी खरं :D)
परागकण

Pages