एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल राधाला घनाला बिलगून रडताना पाहून ही ह्यासाठी, म्हणजे बिलगण्यासाठी निमित्तालाच टेकली होती की क्कॉय असं वाटलं. जो माणूस भूतकाळात अडकून पडलाय आणि ज्याचं आपल्यावर प्रेम आहे की नाही हेच कळत नाहिये अश्या माणसाचा आधार राधासारख्या खंबीर मुलीने शोधणं पटत नाही. वर 'बाबा झोपले आहेत' असं आत्या आणि अबिर सांगतात तरी ही आप्ली 'घनाला त्यांना भेटायचं आहे' चा धोशा लावते. किती तो मस्का मारायचा. अश्याने घना आणखी डोक्यावर चढून बसेल. राधाचं हे असं स्वत्त्व पूर्णपणे विसरणं खूप खटकतंय. नॉट डन बॉस.

काल ते घनाचे काका, ऑफिसात हाफ डे टाकून आलो म्हणाले तेव्हा ते ऑफिसातही जातात हे कळलं. काय तो फुलाफुलांचा शर्ट घातला होता. हापिसात काही ड्रेस कोड आहे की नाही? का निदान कपडे घालून या एव्हढंच सांगितलंय?

स्वप्ना अगदी अगदी. मला जर कोणी माझे तुझ्यावर प्रेम नाही, एका मेलेल्या मुलीवरच माझे प्रेम आहे व त्या निष्ठेपाई मी तुझा वापर करतो आहे असे सांगितले असते तर मी त्या माणसाला चांगला धडा शिकवला असता. प्रेमात पडतो माणूस, त्या भावना सच्च्या असतात पण असे खास तोंडाला पाने पुसल्यागेल्यावर तरी त्यातून बाहेर पडून भांडना मंगता है. एस्प. राधा सारख्या मुलीकडून तरी. ती तर निमूट पणे फोन चार्जरला लावलाय इत्यादी बैकोबै ची कामे करण्यातच धन्यता मानते आहे. रीअली नॉट डन.

अमा + १
अता राधाचे बाबा आजारी असून सुद्धा घना पुण्याला निघून गेल्यावर तरी राधाला अक्कल यावी अशी अपेक्षा आहे.

पौर्णिमा, स्वप्ना यांना अनुमोदन.

'लव्ह आज कल'मध्ये तरी हे नायकाचं अमेरिकेला जाणं, नायिकेला नायकाच्या आधी प्रेमाचा साक्षात्कार होणं, तरी तिने तो स्वतःहून उमज पडून येईपर्यंत वाट पाहणं, इत्यादी बाबी बर्‍याच चांगल्या हाताळल्या होत्या.

त्या आजी एकदम 'धडा शिकवायची वेळ आली आहे.. दोन दणके दिले पाहिजेत..' वगैरे बोलत इतक्या हिंसक(:फिदी:) का झाल्या डन्नो! त्या घनाच्या अमेरिकेत जाण्याबद्दल सगळ्यांचंच वागणं असं की, 'या जाण्यासी परत न येणे'..

राधाच्या व्यक्तिरेखेबद्दल स्वप्नाला अगदी अगदी. तो बिलगून रडण्याचा सीन अगदीच नाही आवडला. आणि ते घनाचं तिला लहान मूल असल्यासारखं ट्रीट करत समजावणं.. 'आईचा वाढदिवस विसरल्याचा सीन बरा जमला.. करा रिपीट'टाईप वाटलं ते सगळं!

काल ते घनाचे काका, ऑफिसात हाफ डे टाकून आलो म्हणाले तेव्हा ते ऑफिसातही जातात हे कळलं. काय तो फुलाफुलांचा शर्ट घातला होता. हापिसात काही ड्रेस कोड आहे की नाही? का निदान कपडे घालून या एव्हढंच सांगितलंय? >>>> अगदी हेच्च आलं होतं मनात Happy

स्वप्ना +१००
हापिसात काही ड्रेस कोड आहे की नाही? का निदान कपडे घालून या एव्हढंच सांगितलंय?>>>> :हसून हसून गडबडा लोळण:
मालिका फार कंटाळवाणी होत चाललीये. आवरा आता.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार शहरभरातल्या तमाम अमूल पोस्टर्सवरची अमूल गर्ल रडताना आढळून येत आहे कारण ह्या जाहिरातीत नेहमी असतं ते अमूल बटरचं पाकिट गायब झालं आहे. झी मराठीवरील 'एलदुगो' ह्या मालिकेतील राधाने तिचा नवरा घन:श्याम काळे ह्याला लावण्यासाठी अमूल बटरचा सगळा स्टॉक खरेदी केल्याचं अमूलच्या प्रवक्त्याकडून रात्री उशीरा सांगण्यात आलं. ह्या प्रकरणी मुंबई पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, बटर न मिळाल्याने अनेक जणांची गोची झाल्याची कुजबूज शहरभर ऐकू येत आहे.

काल ते घनाचे काका, ऑफिसात हाफ डे टाकून आलो म्हणाले तेव्हा ते ऑफिसातही जातात हे कळलं. काय तो फुलाफुलांचा शर्ट घातला होता. हापिसात काही ड्रेस कोड आहे की नाही? का निदान कपडे घालून या एव्हढंच सांगितलंय?<<<<<
तोच ड्रेस कोड असावा, कारण आधीही एकदा ते ऑफिसमधून आले तेव्हा त्यांच्या अंगावर फुलाफुलांचाच शर्ट होता.

ए हो. राधा प्रेमात पडली ते कबूल. पण जो माणूस ते प्रेम नाकारत आहे, त्याच्या आगेमागे करणं आवडलं नाही. कदाचित पपांना धक्का बसू नये म्हणून असेल, पण तरीसुद्धा जवळ जाणं, मोबाईल चार्जिंगला लावणं, टू मच! 'आईचा वाढदिवस विसरल्याचा सीन बरा जमला.. करा रिपीट'टाईप वाटलं ते सगळं!>> +१. इथे तो सीन बर्‍याच जणांना आवडला होता, पण मला तो तेव्हाही अतिशय बालिश वाटला होता.

राधा तिच्या पपांबद्दल किती हळवी आहे हे ते लोक जाणतात. तिच्या ह्या वीक पॉईंटचा चुकीचा वापर करणं किती निर्दय आहे! घरातलेच लोक 'संसार वाचवण्या'च्या महान कामासाठी ही असली पावलं उचलतील का? एवढंच असेल, तर दोघांना समोरासमोर बसवून सोक्षमोक्ष लावतील ना काय तो. घना ज्या मुलाखतीला जाण्यासाठी तडफडतोय त्या मुलाखतीला त्याला जाऊ न देणं, राधाला पपा गंभीर आजारी आहेत असं खोटंच सांगणं.. आपल्याच मुलांच्या भावनांशी हे असं खेळणं म्हणजे अगदीच थम्ब्ज डाऊन!

गाडीने रुळ सोडलाय हे वरच्या पोस्टी वाचुन लक्षात आलय.
मी बरेच दिवस पाहिली नाहि मालिका. काल पहात होतो तर पाणी वाढवलेला रस्साच नुसता...

राधा तिच्या पपांबद्दल किती हळवी आहे हे ते लोक जाणतात. तिच्या ह्या वीक पॉईंटचा चुकीचा वापर करणं किती निर्दय आहे! घरातलेच लोक 'संसार वाचवण्या'च्या महान कामासाठी ही असली पावलं उचलतील का? एवढंच असेल, तर दोघांना समोरासमोत बसवून सोक्षमोक्ष लावतील ना काय तो. घनाला मुलाखतीला जाऊ न देणं, राधाला पपा गंभीर आजारी आहेत असं सांगणं.. आपल्याच मुलांच्या भावनांशी हे असं खेळणं म्हणजे अगदीच थम्ब्ज डाऊन!
<<<<< अगदी अगदी.. +१००. त्यांच्या संसारात इतकं मध्येमध्ये करायचं इतरांना काय कारण आहे?

बर्‍याच ठिसूळ गोष्टींनी पायाभरणी केलेली मालिका आता ढासळत चाललीय बाकी काही नाही.

ते ऑफिसातही जातात हे कळलं. काय तो फुलाफुलांचा शर्ट घातला होता. हापिसात काही ड्रेस कोड आहे की नाही? >> हवाईला जाऊन लाईफ-गार्ड बनायचे त्यांचे स्वप्न होते (काळे कुटुंबात सगळ्यांना स्वप्न बघायची सवय असते) पण सुप्रिया काकुंनी त्यांना तिकडे जाउ दिले नाही. म्हणून मग ते असे फुलांचे शर्ट घालून आपली हौस भागवताहेत्त Happy

आता खरच खूप रखडते आहे मालिका.

बेसिकली असा संसार वाचवायचा प्रश्नच येत नाही. एका पार्टनरने दुसर्‍यावर प्रेम न करता भलत्याच इमॅजिनरी प्रेमात अड्कून तिचा वेळ वाया घालवायचा. तिला मॅनिप्युलेट करायचे. कधी प्रेम तर कधी कोरडेपणा हे बरोबर नाही. पौर्णिमा +१००

ते दोन काका अगदी डिस्ने चॅनेल आहेत.

माधव Happy सुप्रियाकाकूंनी पण जावं ना अमेरिकेला. तिथे 'मॅकवडोनल्डस' काढावं आणि मेन्यूमध्ये बटाटेवडे, मेदूवडे, साबुदाणा वडे वगैरे करून घालावेत.

आता पुढचा एपिसोड काळे कुटुंबात राधाच्या घरच्यांना मदत करायची अहमहमिका लागेल. घनाच्या आईने जेवण पाठवायला सुरुवात केलीच आहे. ते घेऊन उल्काआत्याला जाऊ देत. तिचं तरी कल्याण होईल.

>>>>>>>>>>>इथे तो सीन बर्‍याच जणांना आवडला होता, पण मला तो तेव्हाही अतिशय बालिश वाटला होता. <<
+१

एक उल्का पात होणार आणि घना धूमकेतू होणार. राधा मंजे ध्रुवतारा, स्पृहा चांदणी, प्रभात म्हणजे एक कसला तरी ग्रह. दोन काकडे राहू केतू, काकवा बुध शुक्र, इला भाटे मिल्की वे. राजवाडे सूरय.
वंडर्स ऑफ द एल दुगो युनिवर्स. Happy

आपल्याच मुलांच्या भावनांशी हे असं खेळणं म्हणजे अगदीच थम्ब्ज डाऊन!>> मुलांनी सो कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट मॅरिज करून तरी काय वेगळं केलंय?? दोन परिवारांच्या अनेक लोकांच्या भावनांशी केलेला खेळच तो...

>>राधा मंजे ध्रुवतारा

ध्रुवतारा तुमच्यावर केस करेल हा अश्विनीमामी Proud राधा म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचं तर 'ह्या ना त्या कारणाने डोलणारं इंद्राचं सिंहासन' आहे.

राधाचं हे असं स्वत्त्व पूर्णपणे विसरणं खूप खटकतंय. नॉट डन बॉस.
>>>>>>>>>>>

मी २५ एपिसोड आधीपासून हेच म्हणतोय राव.... Proud आता तू म्हटल्यावर सगळ्यांना पटेल Wink

रच्याक, स्वप्ना.. सोनाराच्या पेढीवर कामाला आहेस काय?? कान चांगले टोचतेस Proud Rofl
(राजवाडे आणि मंडळींना :दिवा:)

मला आधीपासुनच राधाचे त्या गाढव घनावर प्रेम करणे पटत नाहीय. तो अमेरिका डिजर्व करतो की काय ते माहित नाही पण ही डजन्ट डिजर्व राधा. अँड राधा शुड नॉट स्टुप सोSSSSSSSSSs लो... फॉर सच अ‍ॅन इडियट,......

या वेळेस घना सिलेक्ट होईल अस दाखवतील. आणि राधाने घनाला एवढे "बेनिफिट ऑफ डाउट" Happy देऊनसुद्धा त्याच अमेरीकेला महत्व देण हे एक लिमिट क्रॉस केल्यासारख राधाच्या डोक्यात जाणार आहे. आपल्या बाबांच्या आजारपणात हे घनाच अमेरीकेच खुळ बघुन आता राधा आरपारचा निर्णय घेऊन घनाची या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासुन सुटका करणार आणि डिओर्ससाठी आग्रह धरणार हे नक्की. बाकी या अपेक्षीत घडामोडींमध्ये राजवाडे काय काय चिरकुट टी.पी. टाकतायत ते बघुया....
बाकी त्या राधाला रडवुन रडवुन तीचा चेहरा फारच सुजवुन ठेवलाय या राजवाडेने आता राधाला थोडा ब्रेक देऊन त्या घनाला रडवारे जरा.....

इथे तो सीन बर्‍याच जणांना आवडला होता, पण मला तो तेव्हाही अतिशय बालिश वाटला होता. सहमत. मी तर तो सीन अर्धा अधिक पळवला होता.
सध्या मी ही मालिका पहायची विसरून जाते.
काका लोक फारच बावळट दाखवलेत. घना आपल्याला सोडून जाईल याचे इतके वाईट वाटले ते पटले नाही. अमेरिकेला जाण्यासारखे आणखी मेंबर, उदा. ज्ञाना आणि गंगा, यमुना आहेत की! तेही अमेरिकेला जाऊ शकतात. आणि अमेरिकेला जाणे म्हणजे मनुष्य कुठेतरी यमयातना भोगायला निघालाय जणू! Wink
बर्‍याच प्रसंगांना मनातून असहमती यायला लागल्याने मालिका पाहणे नको वाटते.
स्वप्नील जोशी आणि राधा हे चाचरत का बोलतात? एकही वाक्य पूर्ण म्हणू न शकणारे आधी तर चांगले स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे दाखवले होते.
सध्या तर मालिकेतला जीव गेल्यासारखेच वाटत आहे. अगदी पायरीपायरीने खालावला दर्जा!

Pages