टर्म इन्शुरन्स कुठला चांगला आहे?

Submitted by mansmi18 on 9 July, 2012 - 09:55

नमस्कार,

टर्म इन्शुरन्स बद्दल काही प्रश्नः

१. टर्म इन्शुरन्स मधे कुठला चांगला आहे (तुमच्या अनुभवानुसार)?

२. आय सी आय सी आय चा ऑनलाईन इन्शुरन्स कसा आहे? (त्याय मेडिकल टेस्ट नाही)

३. आय सी आय सी आय चा सोडला तर इतर बाकी सगळ्यात मेडीकल टेस्ट आहे. मेडीकल टेस्ट न करता इन्शुरन्स घेण्यात क्लेम च्या वेळी गडबड होउ शकते का?

नुकताच एस बी आय च्या एका एजंटकडुन त्यांच्या शुभ निवेश या पॉलिसीबद्दल माहिती मिळाली. त्याने फार रोझी पिक्चर पेंट केले उदा. १५ वर्षात १०% अ‍ॅवरेज रीटर्न इ. पण गुगल केल्यावर कळले की त्यात अ‍ॅवरेज रीटर्न ३-४% आहे आणि रीटर्न किंवा कवरेज काही फारसे चांगले नाही. म्हणुन आता टर्म इन्शुरन्स घ्यायचे ठरवले.
इन्शुरन्स आणि इन्वेस्टमेंट दोन्ही दगडांवर पाय ठेवण्यापेक्षा एक गोष्ट नीट करावी हा उद्देश. असो.
मी ऑनलाईन माहिती काढतोच आहे पण इथे कोणाचा अनुभव कळल्यास निर्णयास जरा आणखी मदत होइल.

आपल्या मतांचे स्वागत.

धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टर्म इन्शुरन्स घ्या.. कुठलाही घ्या. आनंदात रहा...
महागडा इन्शुरन्स घेण्यापेक्षा टर्म इन्शुरन्स घेऊन उरलेले पैसे पोस्टात पी पी एफ ला ठेवा... ते पैसे तर आपल्या वारसाना मिळतीलच. राहिला प्रश्न क्लेमचा.. क्लेम मिळाला तर आनंदच.. नाही मिळाला तरी फारसा लॉस नाही... हाय प्रिमियमचे पोळिसी म्हणजे डोक्यावर टांगती तलवार.

१. टर्म इन्शुरन्स मधे कुठला चांगला आहे (तुमच्या अनुभवानुसार)?

Sad अनुभव कोण सांगणार? टर्म इन्शुरन्स चे पैसे मेल्यावरच मिळतात ... ..

इन्शुरन्स आणि इन्वेस्टमेंट दोन्ही दगडांवर पाय ठेवण्यापेक्षा एक गोष्ट नीट करावी हा उद्देश

हेच उत्तम.

LIC कडेही काही चांगले प्लॅन्स आहेत. एखादा चांगला सल्लागार गाठा. त्यापूर्वी गुगलून चांगले होमवर्क करून ठेवा.

दोन दगडांवर पाय ठेवणे:
१. कंपनीच्या साईटवर जाऊन अभ्यास करा. एजंट फक्त त्याला ज्यात म्याक्स फायदा आहे तीच स्कीम तुम्हाला सांगतो.
२. सरकारी एलाय्सीच्या फंदात पडु नका. महाग पडते.
३. युलिप किंवा टर्म जोही इन्शुरन्स घ्याल, क्लेमसाठी कंपनीशी भांडण करायची तयारी ठेवा.
४. इन्शुरन्स घेताना, तुमची नेट वर्थ 'कागदावर' चांगली पाहिजे. भले खिशात दमडी नसली तरी चालेल. तुमचे रिटर्न्स तगडे हवेत, जेणे करून तुमचे लाईफ व्हॅल्यू योग्य प्रकारे मोजले जाईल.
५. शक्यतो ग्रूप इन्शुरन्स स्कीममधे सामिल व्हा. जसे नोकरीच्या जागी इ. जेणेकरून नाममात्र हप्त्यात जास्त फायदे मिळतील.
६. सर्व 'हेल्थ' रायडर व 'अ‍ॅक्सिडेंट रायडर्स घ्या. पैसे जास्त लागलेत तरी चालतील.
७. युलिप चा फायदा हवा असेल तर अ‍ॅक्सिडेंट रायडर वा हेल्थ रायडर (मेजर आजार उदा. कॅन्सर, किडनी ट्रान्स्प्लान्ट, बायपास इ.) वापरून घ्या. तरच परवडते Wink म्हणजे पॉलिसी काढल्यानंतर ३-४ वर्षांनी हार्ट अ‍ॅटॅक आला तर बरे....

Aeon Reliare बघा, Premium कमी आहे. Aviva देखिल चांगला दिसतोय. policybazaar.com ईथे जाऊन तुम्ही बघु शकता. पण आपला मोबाईल नंबर तिथे देऊ नका, पिडतील फोन करुन.

सरकारी एलाय्सीच्या फंदात पडु नका. महाग पडते.
३. युलिप किंवा टर्म जोही इन्शुरन्स घ्याल, क्लेमसाठी कंपनीशी भांडण करायची तयारी ठेवा.>>>
इब्लिसराव, टर्म इन्सुर्न्सला भांडायला कोठुन येणार. Wink

एलआयसि च बरी असे माझे मत आहे. पण त्यात अ‍ॅक्सिडेंटलचा काही बेनिफिट मिळत नाही. म्हणुन दरवर्षी जनरल इंश्युरंन्स काढावा. म्हहिण्याचा पगार * २० असा काहितरी प्लान आहे. ६० रु ला १०० ०००/-

मेडिकल करुन घेणे कधिही श्रेयस्कर. काही प्रोडक्ट मधे मेडिकल जर चांगली असेल तर प्रिमियम कमी असतात. उदा. तुम्ही ४० लाखाच्या ( नॉन मेडिकल ) टर्म पॉलिसिसाठी प्रोडक्ट १० हजार प्रिमियम भरत असाल तर ५० लाखाची पॉलिसि ( मेडिकल) ८ हजारात मिळु शकते कारण कंपनीच्या दृष्टीने तुम्ही मेडिकल टेस्ट क्लिअयर केल्याने अंडररायटींग रिस्क कमी असते.
टर्म ईंशुरंस किती रकमेचा काढायचा हे ठरवणे पण महत्वाचे. तुमच्या वार्षीक उत्पन्नाच्या साधारण चारपट काढावा, म्हणजे आपल्या पाठी कूटंबीयांकडे पाच , सहा वर्ष सर्व्हाय्वल सहज शक्य होईल.
अ‍ॅक्सीडेंट, क्रीतीकल ईलनेस रायडर्स जरुर घ्या.
काही टर्म पॉलिसि मधे कालावाधी फिक्स असतो त्यात तुम्हाला हव्या त्या वया पर्यंत विमा संरक्षण मिळ्णार नाही. उदा. जर येखाद्या प्रॉडक्ट ची टर्म १५, २०, २५, ३० फिक्स असेल आणि तुमचे वय ३१ असेल तर तुम्हाल विमा संरक्षण ४६, ५१ किंवा ५६ पर्यंत मीळेल . जर मॅक्झिमम कव्हरेज ६० पर्यंत असेल तर तुम्हाल ३० वर्षाची टर्म घेता येणार नाही. म्हणजे जरी तुमचि ईचा असली तरी ५६ वर्षा पऊधे तुम्हाल कव्हर मीळणार नाही. त्यामूळे इथे फ्लेग्झीबीलीटी देणारे प्रोड्क्ट निवडा.

भ्रमर.. policybazaar.com ईथे जाऊन तुम्ही बघु शकता. पण आपला मोबाईल नंबर तिथे देऊ नका, पिडतील फोन करुन.>> +++ १.. अनुभव आहे मला पण..

४० लाखाच्या ( नॉन मेडिकल ) टर्म पॉलिसिसाठी प्रोडक्ट १० हजार प्रिमियम भरत असाल तर ५० लाखाची पॉलिसि ( मेडिकल) ८ हजारात मिळु शकते कारण कंपनीच्या दृष्टीने तुम्ही मेडिकल टेस्ट क्लिअयर केल्याने अंडररायटींग रिस्क कमी असते.>>> इतके काही स्वस्त नाहीय... ५० लाखाला २४००० असं काहितरी आहे मेडीकल क्लिअर . अर्थात वयावर अवलंबुन आहे ते. ३० कि ३५ टर्म्स्च मिळतात बहुतेक.

एल आय सी ची अमूल्य जीवन चांगली आहे. त्यांची मेडिकल टेस्ट किचकट आहे. पण त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे. एल आय सी विश्वसनीय वाटते.

ऑनलाईन टर्म प्रॉडक्ट्स इतकीच किंवा याहुन स्वस्त आहेत. कारणे १. ऑनलाईन ला एजन्ट कमीशन नसते २, ऑनलाईन प्रॉडक्ट कस्टमर स्वतःहुन येउन खरिदतो म्हणजे रिटेन्शन जास्त असते

IRDA ने कस्ट्मर एड्युकेशनसाठी येक नविन वेबसाईट चालु केली आहे त्यात ईंशुरंस बद्दल खौप चांगली माहिती आहे.
http://www.policyholder.gov.in./

शक्यतो मेडिकल टेस्ट असलेली पॉलिसी घ्यावी म्हणजे क्लेमच्यावेळी जास्त प्रॉब्लेम्स येत नाहित. सध्या कोटक महिंद्राचा टर्म प्लॅन चांगला आणि बराच स्वस्त आहे. LIC चे टर्म प्लॅन बरेच महाग आहेत. टर्म प्लॅनचा प्रिमियम वय आणि मेडिकल टेस्टचा निकाल यावर ठरतो. मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर ३५ वर्षे वयाला साधारणपणे ८-९ हजारात ३०-३५ लाखाचे (३० वर्ष टर्मचे) कव्हर मिळते.

अ‍ॅक्सिडेंटल डेथ आणि पर्मनंट डिसॅबिलिटी रायडर घ्यायला काहिच हरकत नाही पण क्रिटिकल इलनेस रायडर घेण्यापेक्षा मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली चांगली. क्रिटिकल इलनेस मध्ये फक्त १२ क्रिटिकल आजार कव्हर होतात मेडिक्लेम मध्ये सगळेच कव्हर होतात.

पण त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे. >> हां हेच लिहायचे होते.
मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर ३५ वर्षे वयाला साधारणपणे ८-९ हजारात ३०-३५ लाखाचे (३० वर्ष टर्मचे) कव्हर मिळते.>>> हे मला अजुन्ही मला सांगितलेल्या पेक्षा कमीच वाटते.

निवांत... साधारण एवढ्याच प्रिमिअममध्ये मी स्वतः कोटकचा टर्म प्लॅन घेतलाय आणि माझ्या ५-६ मित्रांना पण दिलाय (जर मेडिकल क्लिअर असेल तरच, मेडिकलमध्ये निकोटिन किंवा अन्य काही सापडले तर प्रिमिअम बरेच वाढते)

धन्यवाद लोकहो.

मी पॉलिसीबझार वर ट्राय केला पण तिथे मोबाईल नंबर कन्फर्म केल्याशिवाय quote च्या पानावर जाताच येत नाही.

कोटकच्या साईटवर पाहतो.

आय सी आय सी आय ऑनलाईन १ कोटीची पॉलिसी ३०,००० मधे मिळत आहे. रेलिगर आणि अविवा स्वस्त आहेत यापेक्षा.

अ‍ॅक्सिडेंटल डेथ आणि पर्मनंट डिसॅबिलिटी रायडर घ्यायला काहिच हरकत नाही पण क्रिटिकल इलनेस रायडर घेण्यापेक्षा मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली चांगली. क्रिटिकल इलनेस मध्ये फक्त १२ क्रिटिकल आजार कव्हर होतात मेडिक्लेम मध्ये सगळेच कव्हर होतात.>>>> पण क्रिटिकल इलनेस चा प्रिमियम खुप कमी असतो आणी मेडीक्लेम मधुन सर्व खर्च मिळाला तरी इन्शुरन्स अमाउन्ट पुर्न मिळ्ते त्यामुळे क्रिटिकल इलनेस घेणे उत्तम...............

तिथे मोबाईल नंबर कन्फर्म केल्याशिवाय quote च्या पानावर जाताच येत नाही.>> मोबाईल नंबर डुप्लिकेट टाका की Wink

http://news.indiamart.com/story/irda-lauds-lic-better-performance-claim-...

Claim settlement ratio of LIC is the best after considering their volume of Business in comparison to pvt life insurance companies.
Secondly in term insurance the nominee of the policy holder gets the Sum assured. Whenever the question of claim arises the policy holder is not alive & the private insurers may start giving reasons that the policy holder has not provided adequate information etc. Hence in Term Insurance adequate health check & good track record in claim settlement should be the main considerations & not the premium amount. The nominee who has lost the dear & near one should not face difficulties in getting the claim.
Cheap is not "The Best" & costly "The Worst". The effects of buying cheap will be known only after the "Death".

मला एका एज्नटने LIC जीवन chhaya योजना काढण्यासाठी योग्य आहे असे सानगीत्ले आहे.माझे वय २७ आहे.जस्ट मेरिड आहे कोणितरि मारगदरशन करा.

ही पॉलिसी मुख्यत्वे ज्या पालकाना आपल्या मुलान्च्या शिक्षणाचे नियोजन करावयाचे आहे अशा पालकासाठी आहे.

विक्र्म आभारि आहे पण या पोलीसीचे फायदे काय आहेत मला कमीत कमी किति प्रिमीयम भरावा लागेल? ज्याने भविष्यात मला फायदा जास्त मिळेल आणि सरक्षण हि मिळेल?..........कीवा इतर कोणती पोलिसि सुचवु शकता?

विक्रम महत्वाचे पोस्ट. सरकारी संस्थांचा कारभार कसाही असला तरे त्या तशा जबाबदार संस्था असतात्.दाद मागण्याची सोयही त्यात असते.बँकात आता तक्रारीसाठी आता 'ऑम्बडस्मन' या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे त्यांची नियमावली पारदर्शक असते आणि पब्लिक डोमेन्स मध्ये प्रसिद्धही होते. याउलट खाजगी संस्थांचा कारभार मिस्टीफाईड असतो. एकतर्फी नियम बदलतात .शिवाय कोणत्याही निर्णयात 'मेरी मर्जी ' असा खाक्या असतो. प्रचंड कारभार असल्याने पर्सनल प्रिजुडीस त्यात नसतात. शिवाय त्या सहजासहजी बुडत नाहीत. त्यात परतावे थोडे कमी असतील पण निश्चिती असते. राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट्ल सिक्युरिटीज, एल आय सी , युटीआय. आणि आता माहितीच्या अधिकाराच्या कक्षेतही अशा संस्था आल्यामुळे त्याना जबाबदारीने वागावेही लागत आहे.
खाजगी संस्थांच्या विरुद्ध प्रत्येक वेळेला कुठे थेट हाय कोर्टात रिट्स दाखल कतीत बसणार ?

Term insurance + SIP in mutual funds is the best option.
Term insurance will provide sufficient risk cover at low premium and SIP in good mutual funds will give good returns over the long run. Endowment plans of Insurance companies is an old idea & ULIP's have failed to live up to people's expectations.

mansmi18 कोणती policy घेतली? अनुभव लिहिले तर बरे. मी पण term insurance घेणार आहे त्या मुळे काही study करत आहे.

विक्रम देशमुख | 1 August, 2012 - 16:33
Term insurance + SIP in mutual funds is the best option.
Term insurance will provide sufficient risk cover at low premium and SIP in good mutual funds will give good returns over the long run. Endowment plans of Insurance companies is an old idea & ULIP's have failed to live up to people's expectations.) +१००

मी स्वतासाठी LIC ची जीवन अमुल्य term insurance policy घेतली आहे.
त्या सोबत पाच वेगवेगळ्या mutual funds companies च्या scheme मध्ये long term investment चालू केली आहे.

Claim settlement ratio of LIC is the best after considering their volume of Business in comparison to pvt life insurance companies.

LIC ची term policy घेण्यामागे हेच एकमेव कारण होते.

LIC ला पर्याय नाही. तुम्हाला जर क्लेम मिळण्याची खात्री पाहिजे असेल तर LIC ला पर्याय नाही. बाकी कंपन्यांचा भरवसा नाही.

LIC महाग पडेल पण अगदी एका वर्षात माणुस मेला तरी क्लेम मिळतो.

आपण insurance पैसे वाचवायला काढत नाही, मेलो तर क्लेम मिळावा म्हणुन काढतो

एल आय सी च फक्त चांगली हा गैरसमज आहे. व्यवस्थित महिती देऊन आणि मेडिकल करून टर्म पोलिसी घेतली तर अडचण यायचे कारण नाही. खाजगी कंपन्यांच्या ऑन लाईन टर्म पॉलिसी तुलनेने स्वस्त आहेत. उदा:भारती अ‍ॅक्सा. सर्वच विमा कंपन्या आय आर डी ए च्या नियंत्रणाखाली आहेत. कंपनी पेक्शा पॉलिसीचा प्रकार आपल्याला योग्य आहे ना हे बघायला पाहिजे.

Pages