माझ्या मुलाला या वर्षीच्या एप्रिल महिन्यात ३ वर्ष पुर्ण झाली, तरी अजुनही तो पुर्ण वाक्ये बोलत नाही, शब्द शब्द बोलत संवाद साधतो, काही महिने मुंबईत होता त्यावेळी हिंदीभाषिक मुलांबरोबर राहुन खुप सारे हिंदी शब्द देखिल बोलायला लागला........... परंतु त्याच्यापेक्षा लहान मुले देखिल मुख्यत: मुली पुर्ण वाक्यात बोलताना मी बघते. माझ्या मुलाला आम्ही त्याच्याशी काय बोलतो हे पुर्ण समजते परंतु जेव्हा त्याला बोलायचे असते तेव्हा मात्र तो शब्द शब्द बोलतो. TV वर काही चॅनेलमध्ये मुलांना प्रश्न विचारत काही गोष्टी सांगितल्या जातात त्यावेळी तो त्या प्रश्नांची बरोबर उत्तर देतो...........यावरुन आम्हाला एवढेच कळते की त्याला ते काय बोलत आहेत व काय प्रश्न विचारत आहेत ते कळत आहे.... सध्या मी त्याच्याशी खुप बोलत राहते, त्याला बाहेर फिरायला घेउन जाते व त्याला प्रत्येक गोष्ट दाखवते , त्याला काय म्हणतात वगैरे सांगते, तो फक्त शब्द लक्षात ठेवतो व पुन्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो की तो त्या शब्दांचा पुनरुच्चार करतो पण पुर्ण वाक्यात बोलत नाही , तर तो पुर्ण वाक्यात नीट बोलु लागेल , त्याची शब्दसंपदा वाढेल यासाठी मी काय प्रयत्न करु ?
मुलाचे तुट्क तुटक शब्द बोलत संवाद साधणे - उपाय
Submitted by यशस्विनी on 6 July, 2012 - 03:35
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी ३ वर्षाची जुळी मुल आहेत.
माझी ३ वर्षाची जुळी मुल आहेत. यापूर्वी आम्ही अमेरिकेत होतो, तिथे असताना दोघाही जण जास्त बोलत नव्हती. त्यांची स्वताची भाषा होती आणि त्यातून त्यांना काय हवाय ते मला समजायचे. पण मला सतत भीती वाटायची कि यांच्या वयाची इतर मुल व्यवस्थित बोलतात आणि याचं काय? ४ महिन्यापूर्वी भारतात आलो आणि मुलगी बरच बोलू लागलेय. मुलगा मात्र अजूनही जास्त बोलत नाही. दोन चार शब्दांव्यातिरिक्त गाडी पुढे जात नाही. स्वताच्या मतलबाची वाक्ये " लाडू दे, बिकीत हवाय" तो व्यवस्थित बोलतो. माझ्या अनुभवावरून मला असं वाटत कि मुलगे एकंदरीतच जरा आळशी / late असतात. :))))
गमतीचा भाग सोडला, तर मला असं वाटतंय कि तो २/३ महिन्यात कदाचित बोलायला लागेल. आणि डॉक म्हणतात कि आत्ता जर त्याला speech therapy सुरु केली तर ती तिथे बसणार नाही. ते जे शिकवतील ते तो accept करणार नाही. ते म्हणतात कि autism नसणारी मुल एंक ना एंक दिवस नक्की बोलतील याची आम्हाला खात्री असते. कदाचित उशीर होऊ शकतो. अजून ६ महिने वाट बघायला सांगितली आहे. शाळेत जायला लागली कि मुल साधारणपणे १ महिन्यात बोलायला लागतात असं शाळेतल्या बाई म्हणाल्या. मी अजून त्याला शाळेत घातलेलं नाही. पण वर्षा, मला असं वाटत कि तू काळजी करू नकोस. तुझा मुलगा शाळेत जातोय तर कदाचित १/२ महिन्यात बोलायला लागेल.
' मी वर्षा. बदल केलाय..
' मी वर्षा. बदल केलाय..
अंजली कधीकधी मुलांवर असणा-या
अंजली कधीकधी मुलांवर असणा-या ताणांतुन हे घडु शकते. किंवा कसले दडपण, भिती, एखादा मोठा बदल याचाही परिणाम असु शकतो. एकदा डाॅक्टरांशी बोललेले बरे. थोडे जास्त प्रेम, थोडे जास्त केअरिंग अशा वेळेस उपयोगी पडते. >>>>
तिला कसला ताण असेल? बहुतेक घरात बाळ आल्यामुळे थोडी इन्सिक्युरिटी वाटत असेल तिला, त्यातून तर होत नाही ना? आम्ही उलट तिच्याकडेच थोडं जास्त लक्ष देतो.
थोड्या दिवसांनी कमी होतो हा प्रकार.>>>> असं झालं तर बरंय
>>>कु. कमला सोनटक्के | 6
>>>कु. कमला सोनटक्के | 6 July, 2012 - 10:04
माझे बाळ बाबा म्हणते. आजी म्हणते.
>>>अहो सोनटक्के बाई, आता आयडी बदलून कु चं सौ करायला हरकत नाही
सायो.. आप भी ना!!!
सायो.. आप भी ना!!!

धन्यवाद झंपी आणि चंबु...... @
धन्यवाद झंपी आणि चंबु......
@ चंबु
वर्षा मला वाटते अजून तीन्-एक वर्षात येथे अजुन एक धागा असेल "बडबड्या मूलांचे कसे करावे?"
<<<<< तो मीच काढीन माझ्या मुलासाठी विचारायला -- असे होउ दे रे देवा
धन्यवाद मीमराठी स्वताच्या
धन्यवाद मीमराठी
स्वताच्या मतलबाची वाक्ये " लाडू दे, बिकीत हवाय" तो व्यवस्थित बोलतो.
<<<<< अग माझा मुलगा देखिल असाच बोलतो, त्याला ज्या गोष्टींसाठी संवाद साधण्याशिवाय पर्याय नाही तेवढीच वाक्ये नीट बोलतो
@ जाईजुई
छान छान
@ सायो
माझा ४वर्षे ३महिन्याचा मुलगा
माझा ४वर्षे ३महिन्याचा मुलगा २/३ दिवसापासून अडखळत बोलतोय म्हणजे त_त - तू अस .. अस कश्यामुळे होत असेल?? आदी असा नव्हता बोलत हे अताच सुरू झालंय...
स्वनिक, तुम्ही प्रेग्नन्सीत
स्वनिक, तुम्ही प्रेग्नन्सीत शाखा चे मुव्हीज खूप बघितले होते का?


मला कॉलेजला असल्यापासून माझं बाळ शाळेत जाईपर्यंत मला शा खा प्रचंड आवडायचा. त्यामुळं लेक असा बोलतो असे प्रतिसाद मला मिळायचे
माझा लेक ही असच बोलायचा काही वर्षे. आम्ही कुठं दाखवलं/ विचारलं नव्हतं खरं. पण ते आपोआप बंद ही झालं. त्या मुलांना खूप काही बोलायचं असतं ते ही एकदम फास्ट . मग तेव्हा असं होतं असावं. मी त्याला मग सावकाश सांग काय ते असं सांगायचे.
आदी नव्हता बोलत आताच २-३दिवस
आदी नव्हता बोलत आताच २-३दिवस जाले.. मग म्हणतो मला बोलत येत नाहीये मी त्याला सांगते तू हळू बोल पण तो लाजतो मग .. आदीच तो इतका फ्री नाहीये ..
^^^^^
बाळ शाळेत जाईपर्यंत मला शा खा प्रचंड आवडायचा. त्यामुळं लेक असा बोलतो असे प्रतिसाद मला मिळायचे Proud
^^^^^
यावरून आठवले, माझा मुलगा बोलतो व्यवस्थित, पण त्याला मिमिक्री करायचा छंद आहे. हल्ली तो मी बकरी आहे म्हणत हसतो. ते सेम शाहरूखचे हसणे वाटते. आणि शाहरूख मलाही आवडतो (हे मायबोलीवरील नवीन सभासदांना माहीत नसल्यास म्हणून नमूद केले ) तर त्याचा लवकरच एक विडिओ काढायला हवा हे या निमिताने लक्षात आले. कारण मुलांच्या या लकबी त्या त्या काळापुरता असतात.
बाकी मुलांच्या बोलण्याची लगेचच फार चिंता करू नये असे वाटते. आमच्याकडे माझ्या मुलीच्या सोबत आणखी दोन मुलांनी त्याच महिन्यात कन्म घेतलेला. ती बोलायला लागली, पण आमची मुलगी तितकीशी नाही. झाले. आमच्या घरच्यांना उगाच तुलना करून टेंशन. मला बिल्कुल नव्हते. कारण तिचा ईतर बाबींतला स्मार्टनेस दिसून यायचा, शब्द तिच्या डोक्यात तयार आहेत, फक्त तोंडातून फुटत नाहीयेत, ईट्स जस्ट मॅटर ऑफ टाईम हे माहीती होते. आणि मग जेव्हा ती बोलायला सुरुवात झाली तेव्हा तिचे बोलणेच तिच्यातील एक क्वालिटी झाली आहे.
याच पण असच होतय बहुतेक
..
थोडे दिवस त्याच्याकडे
थोडे दिवस त्याच्याकडे(बोलण्याकडे) दुर्लक्ष करा. मुलाच्या नकळत, बोलण्यावर लक्ष द्या.त्या गोष्टींची चर्चा त्याच्यादेखत करू नका.
हो, देवकी +७८६
हो, देवकी +७८६
घाबरतो म्हणजे नकळत आपण तर अतिरीक्त काळजीने त्याच्यावर प्रेशर नाही टाकत ना हे चेक करा.. प्रत्येक छोटीमोठी प्रगती टाळ्या वाजवून एंकरेज करा..
कारण एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून चारचौघात लाजणे, ती करायला घाबरणे हे मोठ्यांचे लक्षण आहे. लहानग्यांनी नवनवीन गोष्टी शिकताना बेफिकीर वागायला हवे..
.. पण खुप म्हणजे खूप activ
.. पण खुप म्हणजे खूप activ आहे ... सर्व येकलेल लगेच acsept करतो पण हे आताच सुरू जालय .. कदाचित मीच जास्त tention घेत असेन ..
Pages