मुलाचे तुट्क तुटक शब्द बोलत संवाद साधणे - उपाय

Submitted by यशस्विनी on 6 July, 2012 - 03:35

माझ्या मुलाला या वर्षीच्या एप्रिल महिन्यात ३ वर्ष पुर्ण झाली, तरी अजुनही तो पुर्ण वाक्ये बोलत नाही, शब्द शब्द बोलत संवाद साधतो, काही महिने मुंबईत होता त्यावेळी हिंदीभाषिक मुलांबरोबर राहुन खुप सारे हिंदी शब्द देखिल बोलायला लागला........... परंतु त्याच्यापेक्षा लहान मुले देखिल मुख्यत: मुली पुर्ण वाक्यात बोलताना मी बघते. माझ्या मुलाला आम्ही त्याच्याशी काय बोलतो हे पुर्ण समजते परंतु जेव्हा त्याला बोलायचे असते तेव्हा मात्र तो शब्द शब्द बोलतो. TV वर काही चॅनेलमध्ये मुलांना प्रश्न विचारत काही गोष्टी सांगितल्या जातात त्यावेळी तो त्या प्रश्नांची बरोबर उत्तर देतो...........यावरुन आम्हाला एवढेच कळते की त्याला ते काय बोलत आहेत व काय प्रश्न विचारत आहेत ते कळत आहे.... सध्या मी त्याच्याशी खुप बोलत राहते, त्याला बाहेर फिरायला घेउन जाते व त्याला प्रत्येक गोष्ट दाखवते , त्याला काय म्हणतात वगैरे सांगते, तो फक्त शब्द लक्षात ठेवतो व पुन्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो की तो त्या शब्दांचा पुनरुच्चार करतो पण पुर्ण वाक्यात बोलत नाही , तर तो पुर्ण वाक्यात नीट बोलु लागेल , त्याची शब्दसंपदा वाढेल यासाठी मी काय प्रयत्न करु ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वर्षा, जाणकार प्रकाश टाकतीलच, पण थोडंसं मला समजतंय तितकं सांगतो.
(१) काही मुलं लवकर वाक्य बोलू लागतात तर काही उशीरा. वरचं वाचून मला तरी काळजी करण्यासारखं काही दिसलं नाही. कदाचित चक्क कंटाळा करत असेल तो.
(२) तरीही, तुमच्या मनाच्या समाधानासाठी एखाद्या डॉक्टरला दाखवा. ते सगळ्यात उत्तम.

@ मंदार जोशी

१. सध्या तरी खुप काळजी वाटत नाही कारण अजुनही तो लहान आहे, त्यामुळे शिकेल हळु हळु असेच वाटते, परंतु ज्यावेळी त्याच्यापेक्षा लहान मुले देखिल पुर्ण वाक्यात आपल्या आईवडिलांशी बोलतात त्यावेळी मात्र त्याला बोलायला शिकवायचे आमचे प्रयत्न कुठे कमी तर पडत नाहीत ना असे वाटते

२. पीडियाट्रिशियनला विचारले तर त्यांनी सांगितले की कधी कधी वेगवेगळ्या भाषा सतत कानावर पडत राहील्या तर मुले आधी शब्द लक्षात ठेवतात व हळु हळु त्यांना वाक्यरचना कशी करायची ते समजते. त्यांचेही हेच म्हणणे आहे की सध्या काही काळजी करु नका, अजुन १ वर्षाने जर त्याला नीट बोलता येत नसेल तर स्पिच थेरपिस्ट्चा सल्ला घेउ.......

वर्षा,

वर लिहिल्याप्रमाणे काही मुले लवकर बोलायला लागतात काही उशीरा.
तुम्ही त्याच्याशी बोलत राहता हे अतिशय उत्तम आहे. त्याच्या कानावर बोलणे पडत राहील हे पहा. तो नर्सरीत जातो का? त्याच्या बरोबरीच्या मुलांमधे रहायला लागला की त्यांचे ऐकुन ऐकुन त्यांच्याशी संवाद साधताना तो बोलायला शिकेल. (फक्त शब्द उच्चारताना त्याला त्रास होतोय का तेवढे पहा. तसे असेल तर कदाचित स्पीच थेरापीची गरज पडु शकेल).
तुम्हाला काळजी वाटणे साहजिक आहे पण तुम्ही लिहिल्यावरुन सध्या तरी काळजीचे कारण नाही असे वाटते.

मंदार ने अगदी योग्यच लिहिले आहे. वर्षा काळजी करण्यासारखे काही नाही असे वाटते. माझ्या पाहण्यात पण अशी २-३ मुले होती. अडीच तीन वर्षांपर्यंत बोलत नव्हती. पण नंतर जे बोलायला लागलीयेत की बास रे बास.

मी वर्षा,
काळजी करू नका. माझी आई सांगते की मी अगदी १ वर्षाची असताना घडाघड बोलू लागले होते, पण माझी बहिण मात्र ३-४ वर्शाची झाली तरी पूर्ण वाक्य बोलत नसे. मला आठवतेय त्याप्रमाणे ती एका वाक्यात अधे मधे बर्‍याच गाळलेल्या जागा सोडत असे. पण आपोआप बोलायला लागली नंतर. डॉक्टर म्हणत की ती आळशीपणा करते. वर मंदारने म्हटलंय तसं... कंटाळा.

तुम्ही त्याच्याशी बोलत राहता हे अतिशय उत्तम आहे. त्याच्या कानावर बोलणे पडत राहील हे पहा. तो नर्सरीत जातो का? त्याच्या बरोबरीच्या मुलांमधे रहायला लागला की त्यांचे ऐकुन ऐकुन त्यांच्याशी संवाद साधताना तो बोलायला शिकेल.>>> + १

वर लिहिल्याप्रमाणे काही मुले लवकर बोलायला लागतात काही उशीरा>>

माझ्या पाहण्यात पण अशी २-३ मुले होती. अडीच तीन वर्षांपर्यंत बोलत नव्हती. पण नंतर जे बोलायला लागलीयेत की बास रे बास.>>> अगदी माझ्या मुलीसारखेच. ती चालायला सातव्या महिन्यात लागली पण बोलायला उशीरा

असे म्हणतात की चालणे किंवा बोलणे कहितरी एक लवकर होते आणि दुसरे उशिरा. आणि जर doctor सुद्धा म्हणतात की काळजी करु नका तर निवांत रहा.

असे म्हणतात की चालणे किंवा बोलणे कहितरी एक लवकर होते आणि दुसरे उशिरा. >> अगदी अगदी. मलाही राजसच्या बाबतीत सेम अनुभव आला आहे. नऊ महिन्याचा असतानाच शब्द व्यवस्थित उच्चारत होता. त्यास सुमारास त्याच्या वयाची आजुबाजुची इतर मुले भिंतीच्या आधाराने उभे राहण्याचा प्रयत्न करीत होती. पण हा पठ्ठ्या सव्वा वर्षाचा झाल्यावर हळू हळू सुट्टी पावले टाकत होता. दीड वर्षे झाल्यानंतर नीट चालू लागला.

धन्यवाद वरील सर्व प्रतिकियांना,

असे म्हणतात की चालणे किंवा बोलणे कहितरी एक लवकर होते आणि दुसरे उशिरा. >>>>>>

" Early Walker , Early Talker " याबद्द्ल ऐकुन आहे......... माझ्या मुलाने देखिल ७-८ व्या महिन्यात आधाराने चालायला सुरुवात केली व ११ व्या महिन्यात आधाराशिवाय चालु लागला....... त्यावेळी खुपजणी बोलायच्या की हा लवकर चालु लागला ना तर बघ हा कदाचित उशिरा बोलेल, सध्या तरी हे अनुभवत आहे, पण शेवटी या जर-तरच्या गोष्टी वाटतात...... कदाचित असेही असतील ज्यांची मुले लवकर चालु लागली व लवकर बोलुदेखिल लागली किंवा असेच उलट......

तो नर्सरीत जातो का? त्याच्या बरोबरीच्या मुलांमधे रहायला लागला की त्यांचे ऐकुन ऐकुन त्यांच्याशी संवाद साधताना तो बोलायला शिकेल.>>> >>

तो गेल्यावर्षी प्ले ग्रुपला गेला होता व या वर्षी नर्सरीला जाणे सुरु केले आहे........ बाकी इतर गोष्टींमध्ये खुप चपळ व बिनधास्त आहे. पण ज्यावेळी बोलायची वेळ येते त्यावेळी पठठा मार खातो..... सगळ्यांशी मिळुन मिसळुन राहतो व आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत पण आत्मविश्वासाने बोलत असतो ......... इतरांना वाटते की आपल्यालाच नीट ऐकु आले नसेल Lol , पण शेवटी नीट बोलता येणे महत्वाचे , बघु पुढील काही महिन्यात काय प्रगती होते ..........

वर्षा

मुली शक्यतो लवकर बोलायला शिकतात. मुलंही शिकतात पण बरेचदा मुलांचं लक्ष खेळणे आणि तोडफोड अशा कारवायांमध्ये जास्त असतं. त्यांना बोलायला येत नाही असं नाही, पण बोलायचा सराव करण्यासाठी आवश्यक वेळ ते शोधत नाहीत. आईवडील जर ठरवून संवाद साधत असतील तर अशी मुलंही बोलू लागतात. ज्या घरात आजॉ आजोबा असतात त्या घरात शक्यतो मुलं लवकर बोलायला शिकतात.

उशिरा बोलल्याने नुकसान काहीच नाही.

पीडियाट्रिशियन काळजी करत नसेल तर तुम्ही पण करू नका. माझा मुलगा दीड वर्षेपर्यंत ८-१० शब्द बोलायचा. नंतर सुद्धा ' ट्विंकल डायमंड स्काय' किंवा 'ईट्सी स्पायडर रेन' एवढे तीन शब्द म्हणून कविता संपल्याच्या आविर्भावात टाळ्या वाजवणे हा आवडता उद्योग होता. बाकींच्याची मुले घडाघड कविता, हिंदी सिनेमातली गाणी म्हणतात अन आपलं कार्ट tar फाइल किंवा winzip सारखं कविता म्हणतंय म्हणून आम्ही वैतागत होतो.
आता भाषणबाजी आवरता आवरता नाकी नउ येतात

माझी ५ वर्षाची मुलगी गेले काही महिने अचानक अडखळ्त बोलायला लागली आहे म्हणजे जसं "त...त...त. त्याने , म...म... म...मला . तिच्या टीचरला विचारले तर ही इंग्लिश नीट बोलते असं सांगितलं.
आम्ही घरी मराठीच बोलतो. मग हे काय अचानक?
तिची टीचर म्हणाली की दोन भाषा बोलल्या जातात त्यामुळे असेल की विचार समजा इंग्लिशमधे करत असेल आणि मातृभाषेत बोलायचे असेल तर एक्दम अडखळायला होते.
काय करावं यासाठी?

ज्या घरात आजॉ आजोबा असतात त्या घरात शक्यतो मुलं लवकर बोलायला शिकतात.
>>> + १
आमच्याकडे हा अनुभव घेतला आहे. बर्‍याचदा आजी ज्या थाटात बोलते त्या थाटात पूर्ण वाक्य ऐकायला मिळते! आणि मग लगेच कळून येते की साहेब आजीचे बोल बोलताहेत Wink

आपलं कार्ट tar फाइल किंवा winzip सारखं कविता म्हणतंय म्हणून आम्ही वैतागत होतो.
आता भाषणबाजी आवरता आवरता नाकी नउ येतात >>>>> Lol

वर्षा काळजी नको करूस. माझ्या अनुभवावरून, जोपर्यंत समोरच्याला पोचतंय काय कम्युनिकेट करतोय तोपर्यंत गरज न वाटून बोलायच्या फंदात पडत नाहीत मूलं.. आमच्याकडे २१ महिन्याचा होईल नील, अजुन ८-१० शब्द मॅक्स येतात, ते पण आमचं लक्श नसताना पुट्पुटतो. बाकी गाण्यांची अ‍ॅक्टींग व डान्स मधूनच सगळा कारभार. Happy
बोलेल तो नीट.. नेटवर स्पीच थेरपीचे व्हिडिओज पाहिल्याचे आठवतंय मला. गम्मत म्हणून ती टेक्निक्स ट्राय करून बघ, हवं तर! Happy

मेधातै, Rofl

वर्षा काळजी करु नको. माझी बहिण तिस-या वर्षापर्यंत शब्द जाऊ दे फक्त अक्षरं बोलायची Happy वाक्यच्या वाक्य फक्त एक एक शब्दात. तेही अगदी चढ उतार, एक्सप्रेशन्ससकट,, हातवा-यासकट Happy जसे, आकोभूफिजा? आता कोणी भूर फिरायला जातं का? ान जवळ जवळ वर्षभर घरातल्यांना तिच्या या शाँर्टकट्स समजुन घ्यायला लागले. अन नंतर ती बोलायला लागली पण खुप भरभर. अगदी आजही तिची गाडी सुपर एक्सप्रेसच असते Happy

माझी ५ वर्षाची मुलगी गेले काही महिने अचानक अडखळ्त बोलायला लागली आहे म्हणजे जसं "त...त...त. त्याने , म...म... म...मला . >>
ह्या वयातील मुलांचे विचार जोरात पळत असतात. त्यामाने त्यांची शब्दांची जोडणी कमी पडते. त्यामुळे अचानक अडखळणे चालू होते. थोड्या दिवसांनी कमी होतो हा प्रकार.
फक्त ह्या गोष्टीवरून सारखं टोकणं टाळावं, असं म्हणतात.

मेधा Lol

अंजली कधीकधी मुलांवर असणा-या ताणांतुन हे घडु शकते. किंवा कसले दडपण, भिती, एखादा मोठा बदल याचाही परिणाम असु शकतो. एकदा डाॅक्टरांशी बोललेले बरे. थोडे जास्त प्रेम, थोडे जास्त केअरिंग अशा वेळेस उपयोगी पडते. Happy

ह्या वयातील मुलांचे विचार जोरात पळत असतात. त्यामाने त्यांची शब्दांची जोडणी कमी पडते. त्यामुळे अचानक अडखळणे चालू होते. थोड्या दिवसांनी कमी होतो हा प्रकार.

+१

शाळेत कुणाचं तरी बघून अनुकरण होत असेल का ?

अवल + १

माझी बहीण प्राथमिक शाळेत असताना चक्क तोतरे बोलत असे.
७ वीत एकदा धीर करून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नि बक्षिस मिळवले

आमचा अंदाज -
१. त्या शाळेत आम्ही बरीच मोठी भावंड शिकून गेल्याने कायम तुलना आणि कदाचित नकारात्मक तुलना होत असे.
२. मी पण हळू लिहीणारी होते आणि मला पण मोठ्या भावंडांचे गुणगान ऐकावे लागायचे, पण पहिल्या बाबतीत शिक्षकांनी समजून घेऊन वेळ दिला आणि दुसर्‍या बाबतीत माझीच गेंड्याची कातडी होती.
३. शलाकाच्या शिक्षिका मात्र तेवढ्या मोकळ्या नव्हत्या आणि ती पण जास्त संवेदनाशील वै. होती.. सातवीपर्यंत ती पण बिनधास्त झाली असेल. Wink
त्यामुळे आजू बाजूचे काही घटक ५-१० वर्षाच्या मूलांचे ताण वाढवत असू शकतात. तिथे थोडेसे लक्ष हवे.

वर्षा.. बाळाचे शब्द सुसंगत आणि क्रमाने आहेत का ते बघ. काही वेळा त्याने पूर्ण वाक्य म्हटले नाही तर त्याला अभिप्रेत क्रिया करू नकोस. छोट्या वाक्यांनी त्याच्याशी बोल.. म्हणजे बाळा ये. खाऊ खा. पुस्तक हातात घे. टोईज छान आहेत. Happy

आणि मुलांना लाडाने पण कार्ट म्हणू नये, इति आजेसाबा. Wink

@ मनस्मि१८

फक्त शब्द उच्चारताना त्याला त्रास होतोय का तेवढे पहा
<<<<<< तो जे काही शब्द उच्चारतो ते नीट उच्चारतो, त्यात तोतरेपणा किंवा बोबडेपणा करीत नाही

@ किरण

मुलांचं लक्ष खेळणे आणि तोडफोड अशा कारवायांमध्ये जास्त असतं. <<<<< अनुमोदन

ज्या घरात आजॉ आजोबा असतात त्या घरात शक्यतो मुलं लवकर बोलायला शिकतात. <<<<<<<<<<< तो मुंबईत होता त्यावेळी आजी आजोबांबरोबर होता पण जास्त काही फरक जाणवला नाही, त्याची आजी तर खुप बोलकी आहे, कदाचित कुटुंबात भरपुर माणसे असतील तर त्यांचे होणारे संवाद सतत ऐकुन फरक पडत असेल

वर्षा,
मग काळजीचे काहीच कारण नाही...

आणि पोरांना लाडाने पण कार्ट म्हणू नये >>>>> मीही असेच ऐकलेय. कार्टे म्हणजे करंटे.. असो..

@ बस्के

नेटवर स्पीच थेरपीचे व्हिडिओज पाहिल्याचे आठवतंय मला. गम्मत म्हणून ती टेक्निक्स ट्राय करून बघ, हवं तर!

<<<<<< ओके, धन्स...... ट्राय करुन बघते Happy

@ अवल

आकोभूफिजा? आता कोणी भूर फिरायला जातं का?

<<<<<< Rofl तुझी बहिण पक्की मायबोलीकर आहे बघ........ मराठी भाषेत शॉर्टकटमध्ये बोलते उदा. तोंपासु (तोंडाला पाणी सुटले), प्रचि (प्रकाशचित्रे),धन्स (धन्यवाद्)

अंजली कधीकधी मुलांवर असणा-या ताणांतुन हे घडु शकते. किंवा कसले दडपण, भिती, एखादा मोठा बदल याचाही परिणाम असु शकतो. एकदा डाॅक्टरांशी बोललेले बरे. थोडे जास्त प्रेम, थोडे जास्त केअरिंग अशा वेळेस उपयोगी पडते.

अनुमोदन

@ जाईजुई

वर्षा.. बाळाचे शब्द सुसंगत आणि क्रमाने आहेत का ते बघ. काही वेळा त्याने पूर्ण वाक्य म्हटले नाही तर त्याला अभिप्रेत क्रिया करू नकोस. छोट्या वाक्यांनी त्याच्याशी बोल.. म्हणजे बाळा ये. खाऊ खा. पुस्तक हातात घे. टोईज छान आहेत.

<<<<<<<< धन्स...... या प्रकारे प्रयत्न करुन बघते Happy

आणि पोरांना लाडाने पण कार्ट म्हणू नये, इति आजेसाबा.

<<<<<<< माझी आई तर "पोरांना" शब्द देखिल वापरायचा नाही सांगते कधीही "मुलांना" बोलावे, ज्या मुलांचे आई वडिल नसतात ती पोरकी असतात व त्यावरुन पोरका, पोरगा शब्द आले असे तिचे म्हणणे आहे Happy ...... Light 1 घ्या

मुलगे सहसा उशीरा बोलतात असा समज वाचलाय कुठेतरी, ख. खो. दे. जा. Happy

पण माझी मुलगी तर १.९ वर्षापर्यंत काहीच श्बद सुद्धा बोलत न्हवती. सगळं कळायचं तिला, कोण काय म्हणतं वगैरे. ती फक्त ते करायची( ते आण, इथे ये असे आम्ही बोलवले तर..) . तिला काय हवय ते सुद्धा कळायचे.
जसे पाणी हवय तर माझा हात धरून ग्लास कडे बोट दाखवायची. मग मी पाणी हवय विचारले तर खूश व्हायची व हसायची, मग आम्ही समजायचो तिला हेच हवेय. आम्ही मोना म्हणायचो तिला. Proud

सूरुवातीला बरेच डॉक कडे घेवून गेलो, बर्‍याच जणांनी घाबरवोन सोडले; शेवटी एक डॉक चेक केल्यावर म्हणाली घाबरु नका. काही मुले उशीरा बोलतात.

मग साधारण दोन वर्षे झाली आणि अचानक बोलायला लागली वाक्येच.. ती सुद्धा छान गाणी पटकन पाठ होवून गायची वगैरे...

माझ्या पाहण्यात पण अशी २-३ मुले होती. अडीच तीन वर्षांपर्यंत बोलत नव्हती. पण नंतर जे बोलायला लागलीयेत की बास रे बास<<<<< अगदी खरं!...माझ्या पाहाण्यात पण हेच आहे. वर्षा मला वाटते अजून तीन्-एक वर्षात येथे अजुन एक धागा असेल "बडबड्या मूलांचे कसे करावे?" Happy

Pages