घोळ बच्चन (Bol Bachchan - Review)

Submitted by रसप on 7 July, 2012 - 02:12

सिनेमाचं शीर्षक गीत.. 'बोल बच्चन'..
ह्या गीतामध्ये एके ठिकाणी 'पेंड्यूलम' ह्या शब्दावर मस्त हरकत आहे. हे गीत त्या जागेवर खूपच आवडतं. मग आपण सिनेमा पाहातो आणि जाणवतं की सिनेमाही 'पेंड्यूलम'च आहे. धमाल, छान, बरा, वाईट, बंडल.. अश्या वेगवेगळ्या दर्ज्यांवर सिनेमा वारंवार हिंदोळे घेत राहतो.

तीन वेळा फक्त शीर्षकाची नक्कल करून झाल्यावर अखेरीस 'रोहित शेट्टी'ने 'बोल बच्चन' द्वारे हृषीदांच्या खुद्द 'गोलमाल'चीसुद्धा नक्कल केली. आता चित्रपट सही-सही 'गोलमाल'वर बेतलेला असल्याने तुलना होणे अनिवार्य आहे आणि इथेच 'बोल बच्चन' अक्षरश उघडा (नव्हे नागडाच!) पडतो. काही किरकोळ तुलना -
१. गोलमाल मधला 'नोकरी देणारा मालक' एक प्रतिष्ठित, सुसंस्कृत, सुशिक्षित व्यावसायिक असतो. 'बो.ब.' मधला 'मालक' एक अडाणी, अर्धशिक्षित, 'सभ्य' गुंड.
२. 'गो.मा.' मधला नोकरदार माणूस एक चार्टर्ड अकाउन्टन्ट, तर 'बो.ब.' मधला नोकरदार माणूससुद्धा एक एक अडाणी, अर्धशिक्षित, 'सभ्य' गुंड.
३. 'गो.मा.' मधली बहिण 'एम.ए. (हिंदी)' तर 'बो.ब.' मधली बहिण एका डब्बा नाटक कंपनीतली 'नेपथ्यकार/ अभिनेत्री'.
४. 'गो.मा.' मधली नकली आई, एक हौशी प्रतिष्ठित अभिनेत्री तर 'बो.ब.' मधली नकली आई एक कोठेवाली!
५. 'गो.मा.' मधला नकली जुळा भाऊ एक गायक (आनेवाला पल....... आहाहाहा!!) तर 'बो.ब.' मधला नकली जुळा भाऊ एक बायल्या नाच्या ! (काय ते कथ्थकच्या नावाखाली केलेले हिडीस अंगविक्षेप ! ईईईईई !!)

असो.. ह्या झाल्या वर वर तुलना. अधिक खोलात न जाता सिनेमाबद्दल थोडंसं बोलतो.
'अब्बास अली' (अभिषेक बच्चन) आणि 'सानिया अली' (असीन) दिल्लीला राहणारे बहिण-भाऊ. वडिलार्जित घरावर चुलत्यांनी कायदेशीर ताबा मिळवल्याने बेघर होतात. त्यांच्या वडिलांचा जवळचा मित्र 'शास्त्री' (असरानी) 'रणकपूर'मधील सगळ्यात मोठं प्रस्थ असलेल्या 'पृथ्वीराज सूर्यवंशी' (अजय देवगण) कडे कामाला असतो. (कसलं काम? माहित नाही.) तिथेच अब्बासलाही काम मिळवून द्यायच्या विचाराने तो अब्बास-सानियाला दिल्लीहून 'रणकपूर' ह्या त्याच्या गावी घेऊन येतो. पृथ्वी आणि जवळच्याच 'खेरवाडा' गावात राहणारा त्याचा चुलत भाऊ विक्रांत ह्यांच्यात 'खानदानी दुष्मनी' असते. ह्या वैमनस्यामुळे दोन गावांच्या सीमारेषेवरील पुरातन मंदिर बंद पडलेले असते. एका लहान मुलाचा प्राण वाचवायच्या हेतूने अब्बास हे मंदिर उघडतो आणि 'एका मुस्लिमाने मंदिर उघडलं' ह्यावरून गदारोळ होऊ शकतो; असा विचार करून 'शास्त्री'चा नौटंकीबाज मुलगा 'रवी' (कृष्णा) गडबडीत अब्बासचं नाव बदलून 'अभिषेक बच्चन' सांगतो. इथून सुरू होतो खोट्यावर खोटं... खोट्यावर खोटं.. बोलत जाण्याचा नेहमीचा खेळ. पृथ्वीला एकाच गोष्टीचा प्रचंड तिटकारा असतो, 'खोटं बोलणे'! बाकीचा सिनेमा ज्याने 'गोलमाल' पाहिला असेल; त्यासाठी डोळे मिटून पाहाण्यासारखा आहे.

अधिक -
१. अजय देवगण. अगदी सहज वावर आणि उत्कृष्ट अभिनय!
२. अजय देवगण. तोडकं-मोडकं इंग्रजी बोलण्याचा अट्टाहास काही ठिकाणी छानच विनोदनिर्मिती करतो.
३. अजय देवगण. कुठल्याच दृश्यात एक क्षणसुद्धा, किंचितही चंचल होत नाही. अख्खा सिनेमा एकटाच पेलतो!
४. अनेक ठिकाणी सिनेमा पोट धरून हसवतो. अनेक ठिकाणी खसखस पिकवतो.
५. अखेरीस 'तुमचं भांडं फुटलं आहे' हे ज्या प्रकारे अजय देवगण व साथीदार व्यक्त करतात, ते आवडलं.

उणे -
१. अभिषेक बच्चन. ह्याने आयुष्यात कॉमेडी सोडून काहीही करावं, असा वावर.
२. अभिषेक बच्चन. काही दृश्यांत चेहऱ्यावरची माशी उडत नाही!
३. अभिषेक बच्चन. अनेक ठिकाणी ओव्हर ॲक्ट करतो. अख्खा सिनेमा एकट्यानेच उचलून आपटतो.
४. अभिषेक बच्चन. 'कथ्थक' नावाखाली केलेलं हिडीस नृत्य म्हणजे आजपर्यंत पाहिलेला विनोदनिर्मितीचा सगळ्यात विकृत प्रयत्न असावा.
५. अभिषेक बच्चन. वारंवार रडकं तोंड करून विनोदाचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न सिनेमाभर करत राहातो आणि एकदाही जमत नाही.
६. अजय-अतुल ने लौकरच सावरावं.
७. काही ॲक्शन दृश्यं बरी विनोदनिर्मिती करतात! पण रोहित शेट्टीने अशी विनोदनिर्मिती आधीच्या सिनेमांतही केली आहेच !
८. पृथ्वी-विक्रांत च्या कौटुंबिक वैमनस्याचा भाग पूर्णपणे अनावश्यक. त्याने मूळ कहाणीस काहीही हातभार लागत नाही. केवळ काही अचाट मारामाऱ्या दाखवून पिटातल्या पब्लिकला खूष करायचा हेतू असावा बहुतेक.

एकंदरीत, एकदा(च) पाहावा असा, पण नाही जरी पाहिला तरी काहीही दु:ख होऊ नये असा हा "बोल बच्चन" माझ्या मते तरी एका ऑल टाईम ग्रेट निखळ विनोदी सिनेमाची अगदीच भ्रष्ट नक्कल आहे. Watch at your own risk. मी जुन्या 'गोलमाल'चा 'फॅन' असल्याने मला तरी हा प्रयत्न अगदीच पिचकवणी वाटला, पण थेटरातील बहुतेक पब्लिक मात्र बरंच 'खूष' वाटलं!!
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/bol-bachchan-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक बच्चनने थ्री जी च्या अचाट जाहिराती आणि त्यातले अगम्य विनोद करून अभिनेता म्हणून आपली सद्दी संपवलेलीच आहे. टाटा डोकोमोच्या जाहिरातीच्या वेळी अजय देवगणची पण अशीच गत झाली होती पण त्याने सिनेमातून सकस अभिनयाद्वारे पुन्हा स्वतःला सिद्ध केलं.

अभिषेकला शुभेच्छा !

गोलमालशी इतकी फारकत आहे तर गोलमालची कॉपी कशी आणि त्याच्याशी तुलना तरी कशाला? समजले नाही. स्वतंत्र सिनेमा म्हणून लिहा. मिडियामधून गोलमालचा रिमेक म्हणून प्रसिद्धी झाली आहे, तर आपण क्लॅरिफाय करू शकतो, किमान आपल्यापुरते तरी.

बाकी, छान लिहीलंत. वैताग पोचला Proud

@ मंद्या - धन्यवाद. पैसे वाचवल्याबद्दल

प्रत्येक सिनेमाच्यावेळी तू हेच लिहीत असतोस. Biggrin खर्च कधी केले ते पण लिही Wink

प्रत्येक सिनेमाच्यावेळी तू हेच लिहीत असतोस. खो खो खर्च कधी केले ते पण लिही>>>>>>>>>>>>> मंदार उत्तर दे...................:हाहा:

मीही पाहिला कालच.

धमाल, छान, बरा, वाईट, बंडल.. अश्या वेगवेगळ्या दर्ज्यांवर सिनेमा वारंवार हिंदोळे घेत राहतो.>>> याच्याशी सहमत.

एकूण मी सिंघम पाहताना जे वाटले होते तसेच हा बघताना वाटले. थिएटर मधल्या वातावरणात आपणही सामील होऊन जातो. कोणतीही गोष्ट एकदम भारी वगैरे नाही. पण पिक्चर पहिली १०-१५ मिनीटे सोडली तर बोअर करत नाही हे नक्की. काही काही विनोद जमलेही आहेत. सिंघम च्या बाबतीत जे सर्व लागू होते ते येथेही होते. त्यामुळे हा चालेल असे दिसते. नाही चालला तर तो 'अगम्य फॅक्टर' काय आहे हे बघायला पाहिजे.

अजय देवगणने तुफान धमाल उडवली आहे, यात वादच नाही. पण ते बेअरिंग त्याने खूप सहज सांभाळलेले नाही हे नंतर नंतर जाणवते. सुरूवातीचा कडकपणा नंतर पार बदलून टाकला आहे त्याचा. वास्तविक एकत्र सीन्स मधे जाणवते की अभिषेकची पर्सनॅलिटी अजय पेक्षा जास्त भारदस्त आहे (ते अजयचे नवीन मसल्स वगैरे धरून्सुद्धा). पण कॅमेर्‍याचे कोन, बॅकग्राउंड म्युझिक वगैरेचा वापर करून अजय देवगणला ते भारी रूप दिलेले आहे. यात चूक काहीही नाही, उलट दिग्दर्शकाचे कौशल्य आहे. अजय देवगण मला विनोदी रोल्स मधे कधीच आवडला नव्हता. येथे मात्र एकदम आवडला.

बाकी कथेतील कोणता भाग का टाकला आहे हे प्रश्न अशा पिक्चरबद्दल पूर्णपणे अनाठायी आहेत. हा असला दंगा पब्लिकला जाम आवडतो असे सध्या दिसते. 'गोलमाल' शी तुलना करण्याची अजिबात गरज नाही. येथे फक्त ते कथाबीज उचलले आहे. पण ठिकठिकाणी असलेले 'गोलमाल' चे संदर्भ मात्र एकदम मजेशीर आहेत.

पण बाकी परीक्षण हे मुळात 'अभिषेक न आवडणार्‍याचे' वाटते Happy अजय देवगण यात जबरी आहेच पण अभिषेकही मला आवडला (हो ते दर वेळेस रडण्याचे केलेले नाटक वगळता). त्याने त्या बायल्याच्या रोल मधे धमाल उडवली आहे, आणि रोहित शेट्टीने तो रोल मर्यादित ठेवून बरे केले आहे. त्यामुळे वरच्या "उणे" मधल्या त्याच्याबद्दलच्या बर्‍याचश्या मुद्द्यांबद्दल असहमत.

अभिषेक अभिनय अत्यंत चांगला करू शकतो, येथेही केला आहे. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स खरे तर एकदम जबरदस्त होऊ शकतो (युवा, सरकार, बंटी और बबली ई मधे ते कळते, किंवा 'दस' मधले सर्वांचे एकत्र सीन्स पाहा. 'दोस्ताना' मधे महिलांनी जॉन ला डोक्यावर घेतला पण अभिषेक चे काम जास्त अस्सल आहे, किमान 'देसी गर्ल' गाण्यात Happy ). पण अमिताभचा मुलगा असूनही कोणतीही स्टाईल त्याच्याकडे नाही. ना नैसर्गिक रीत्या आलेली अमिताभची, ना इतर कोणती कृत्रिम. इन्टेन्स रोल मधे तर माझ्या मते त्याच्यापेक्षा दुसरा कोणीही सरस नाही (अजय देवगण सुद्धा). त्याचे चालणे, कपडे व एकूणच इतर स्टाईलसाठी त्याला कोणाच्या तरी गाईडन्सची अत्यंत गरज आहे.

आता या माझ्या कॉमेंट्स 'मुळात अभिषेक आवडणार्‍याच्या' वाटतील, कारण त्या तश्याच आहेत Happy

तरीच काल इंडीयन आयडलच्या माध्यमातुन खुपच प्रमोगिरी चालली होती. अभिषेक खुपच पुढे पुढे करत होता. खुप दिवसांनी सिनेमा आल्यामुळे आणि अजय देवगण शांत होता.

शेजारी एक स्वतःला फार ब्रिलियंट समजणारे दोन जण बसले होते. वयोगट बहुधा नुकतेच कॉलेज वगैरे पूर्ण केलेले असावेत. चित्रपट सुरू झाल्यावर दोन मिनीटांत 'ये तो बोअर बच्चन दिखता' है ऐकू आले. बाकी कॉमेंट्सवरून 'पॅकेज कळत होते' Happy

मग एक ती अनिवार्य "मॅट्रिक्स स्टाईल फाईट" चालू असताना त्यातील एकजण म्हंटला "हल्ली मला असल्या फाईट्स खूप कॉमेडी वाटतात यार"! माझ्या हातात रिमोट असता तर मी तेथेच चित्रपट पॉज करून त्याला विचारणार होतो,
"हल्ली?"

साधारण हा संवाद आठवला, फ्रेण्ड्स मधला:
Chandler: "so you were trying to save a sandwich from a bullet!"?
Joey: "Yeah yeah I know it doesn't make much sense"
Chandler: "MUCH sense?"

Happy

अमिताभची शप्पथ घेऊन सांगतो, मी 'मुळात अभिषेक न आवडणारा' नाही! "युवा, सरकार, बंटी और बबली" मध्ये मला तो जाम आवडला होता. पण विनोदी भूमिका त्याला झेपत नाहीत, हे मला नेहमीच वाटत आलं आहे.

१. नोकरी सांभाळण्यासाठी जुळा भाऊ असल्याचं नाटक. त्यात एकाला मिश्या असणं आणि एकाला नसणं.
२. नकली जुळ्या भावाने हिरोईनला काही तरी शिकविण्यासाठी मालकाच्या घरी नोकरी करणं.
३. आजारी आई दाखविण्यासाठी नकली आई आणणं, नंतर तिचाही डबल रोल.
४. आपलं बिंग फुटणार ह्या भीतीने नकली आईने बाथरूमच्या खिडकीतून आत शिरणं (गो.मा. मध्ये ती स्वयंपाकघरात शिरते - हा फरक.)
५. अजय देवगणचा - 'तुमने कभी असली हीरा देखा है?..' वाला डायलॉग.

ह्या सगळ्या गोष्टी गो. मा. शी संबंध जोडतातच आणि गो.मा.ची नक्कल केली आहे, हे नक्की करतात. - असं मला वाटतं.

फारएण्ड

पोष्टबद्दल आभारी आहे. फेरविचार करायला हवा आता ( एकदा बघायचा म्हटल्यावर रिव्ह्यू वगैरे विचार मनात येतच नाहीत. आणि या आठवड्यात दुसरा ऑप्शन तरी कुठेय ? Wink

( किमान एण्टरटेण्मेंटची गॅरण्टी दिलेला आणि त्या ब्रीदशी जागलेला कोणताही सिनेमा मी एंजॉय करू शकतो. अगदी टीव्हीवर हल्लीच पाहिलेला राजेश खन्नाचा कुदरत देखील विनोदी सिनेमा म्हनून एण्जॉय केलाच. टीव्ही मालिकांनी एकंदर आपली सहनशक्ती इतकी वाढवलेली आहे कि मनमोहन देसाईचे सिनेमेही लॉजिकल वाटतात ).

- एक अर्क बॉ प्रे

बोलबच्चन मस्त आहे , आणि अभिषेकच्या अ‍ॅक्टींग बद्दल वादच नाही , मस्त काम केलय अभिषेक ने , बघण्याची इच्छा असणार्‍यांनो अजिबात चुकवु नका हा चित्रपट ( मंदार वगळुन Light 1 Proud )
फारेंडा मस्त लिहिलयसं.

मी बघितला....

अगदीच पकाऊ नाहीय पण मुद्दाम आवर्जुन पाहण्यासारखे काहीच नाही. अजय देवगणचे काम आवडले. त्याच्या दोनचार वाक्यांना अगदी मनापासुन हसुह आले.

अभिषेक चांगला आहे असे वर लोक म्हणताहेत म्हणजे कदाचित असेलही. मी त्याची फॅन नाहीय, पण कधीमधी त्याचे काम बरे वाटते . ते नाधिंधिंना प्रकरण तर अचाट... त्याने ते बेअरिंग मात्र बरे घेतलेले (मनात विचार आला, ह्या जागी शाहरुख असता तर त्याने महाहिडीस चाळे केले असते, अभिषेकने त्या मानाने बराच तोल सावरला स्वतःचा) शेवटाच्या सिनमध्येही तो बरा वाटला.

हिरविनीना का घेतलेले?? प्रत्येकी एक गाणे यापलिकडे बिचा-यांना कामच नाही.

रोहित शेट्टीने आता स्वतःला सावरावे.

रसप यांच्या सगळ्या मुद्द्यांशी सहमत.
(('बो.ब.' मधला नकली जुळा भाऊ एक बायल्या नाच्या ! (काय ते कथ्थकच्या नावाखाली केलेले हिडीस अंगविक्षेप ! ईईईईई !!))) +१

मस्त परिचय करून दिला आहे चित्रपटाचा. Happy

फारेंडा, तुझी पहिली पोस्ट वाचत असतानाच मनात मोठी पोस्ट तयार झाली, पण तीतलं शेवटचं वाक्य वाचताच ती डिलीट करून टाकली. Proud
'अभिषेकला गायडन्स हवं' या तुझ्या कॉमेंटला अनुमोदन. ब्लफमास्टर, गुरू, युवा इ. मध्ये अभिषेकने केलेलं काम मला आवडलं होतं. इंटेन्स रोल्स म्हणजे मख्ख चेहरा नव्हे- हे त्याला कुणीतरी सांगायला हवं. इंटेन्स कामासाठी त्याने गेला बाजार देवगणचा तरी क्लास लावायला हवा.

मात्र गोलमालशी तुलना अपरिहार्य आहे. कारण, तेच स्वतः तशी तुलना करत आहेत. कारण, त्यांनाच प्रेक्षकांनीही तशी तुलना करायला हवी आहे. कारण, सिनेमा चालायला हवा आहे. कारण, तो गोलमालचाच रिमेक आहे. कारण, बहुधा रोहित शेट्टीला 'गोलमाल स्पेशालिस्ट' म्हणून ओळख बनवायची आहे.

साजिरा Happy

आणि एक: सिनीयर बच्चन च्या गायकीला एकदम कोंब फुटलेले दिसतात. या चित्रपटानंतर त्याने गायलेले सुरूवातीचे गाणेच लक्षात राहते. 'कहानी' नंतरही तसेच. बुढ्ढा होगा तेरा बाप मधले 'हाल ए दिल' तर सुंदरच आहे.

डिव्हीडी मिळाली म्हणून पाहिला.
आजकाल इतके फालतु सिनेमे येतात की त्यातल्या त्यात एखादा तुलनात्मक दृष्ट्या बरा म्हणावा लागतो.. ईंटरनेटवरचे चोरलेले जोक्स, शेरो-शायरी, अत्यंत पाणचट आणि टुकार विनोदनिर्मिती हे सर्व झेलावं लागतं. आणि आजकाल अशाच सिनेमांची चलती आहे. गल्ला भरला पाहिजे.. बास. बाकी सगळं गेलं चुलीत.

कालच नेटवरुन डाऊनलोड करुन पाहीला, छान मनोरंजन करणारा सिनेमा. Happy
त्यातला तो कथ्थक चा सीन एकदम भारी. Rofl

'अभिषेकला गायडन्स हवं' >>> अहो किती वर्ष द्यायचा ह्या ठोंब्याला गाईडन्स आणि चान्स? त्याला इंडस्टीत येऊन किती वर्ष झालीत? याजागी कुणी दुसरा असता, ज्याच्या खानदानात, रक्तात अभिनय आहे, वडिलांच्या जोरावर ह्याला कित्तेक सेनेमे मिळालेत त्याने एव्हाना ह्या सर्वांचं केंव्हाच चीज करून टाकलं असतं. ह्याला चान्स देण्यापेक्षा विकि डोनर चा हिरो, अमोल गुप्ते, गेला बाजार शाहिद क.यांनाच का नाही द्यायचा चान्स? ह्यांच्यात धम्मक तरी आहे आणि स्वबळावर पुढे आलेत ते.
फक्त युवा पाहुनच कुठे तरी वाटलं होतं की चला गाडी मार्गावर आली, पण कन्सिस्टन्सी म्हणुन काही प्रकार आहे का नाहि हो? @फारेंड आठवा तो दिव्य अभिनय ढाई अक्षर प्रेम के चा Sad
म्हणे इंटेन्स Uhoh

भंकस !!!
काय ते जोक्स आणि काय ते अ‍ॅक्टर्स.. अगदीच सुमार !
तसेही रोहित शेट्टीचा ह्युमर मला कायम 'बंडल-भंकस' कॅटॅगरीतलाच वाटतो .. नॉट माय टाइप, गोलमाल शी तर कंपॅरिझन च नको!
अभिषेक ला एक वेळ कॉमेडी जमेल पण तो देवगण ???? अरारारारा !!!
एक तर महा ओव्हरहाइप्ड आहे देवगण, त्याच्या नशीबाने त्याला त्याच्या पर्सनॅलिटीला सुट असे बरेच क्लासिक रोल्स मिळालेत अत्ता पर्यंत पण प्लिज त्या कॉमेडीच्या वाटेला तरी जाउ नको म्हणावं... प्लिज स्पेअर अस !
कॉमेडीचय नावा खाली भले मोठे डोळे करतो नुसते , त्याच त्या रजनी कडून कॉपी केलेल्या फाइट्स आणि त्याची ती 'इंग्लिश' बोलायची स्टाइल पण या आधी सालाम नमस्ते(जावेद जाफरी) आणि अनिल कपुर (टशन) मधे येऊन गेलीये, पुन्हा काय तेच.. अगदीच पुअर ह्युमर !
बघु नका.