चिकन चे लोणचे(झटपट होणारे)

Submitted by जगावेगळी on 5 July, 2012 - 03:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मस्त पाऊस पडतोय त्यामुळे सगळ्यांना काहितरी चटक मटक खावसं वाटत असणार. त्यात पुढ्चा महीना श्रावण असल्यामुळे आता सगळ्यांच्या आषाढी पार्ट्या चालु असणार. तेच ते सुक्कं आणि रस्सा खाऊन कंटाळलेल्या लोकांसाठी हा खास, वेगळा आणि तितकाच चविष्ट मेनु...............

साहित्य :
१ किलो चिकन, १ चमचा मोहरी, १/४ चमचा गरम मसाला, ६ चमचे लोणच्याचा मसाला, १ लिंबु,
१ वाटी कोथिंबीर बारीक चिरुन, तेल, मिठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यात थोडे तेल तापवून घ्या. त्यात चिकन टाकुन थोडा वेळ परता. मग त्यात १ चमचा मिठ टाका.
थोडेसे पाणी घाला आणि चिकन शिजवुन घ्या. एकदम जास्त पाणी घालू नका. चिकन शिजल्यावर कोरडेच राहिले पाहिजे. आता वाफवलेले चिकन बाजुला ठेवा.
एका कढईत थोडे तेल तापवुन घ्या. १ चमचा मोहरी टाका. मग त्यात शिजवलेले चिकन टाका. थोडेसे मिठ आणि कोथिंबीर टाका. थोडा वेळ परतुन एक दोन वाफा आल्या की कढई झाकुन ठेवा आणि गॅस बंद करा.
पाच मिनिटांनी त्यात लोणच्याचा मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि एका लिंबाचा रस घाला. मसाला सगळी कडे लागला पाहिजे.
पेशन्स असेल तर अर्धा तास मुरु द्या. नसेल तर लगेच खाउ शकता.

वाढणी/प्रमाण: 
सहा जणांसाठी पोटभर होइल अगदी
अधिक टिपा: 

-तेल आणि मिठ आपण दोनदा घालणार आहोत. शिवाय लोणच्याचा मसाल्यात पण कधी कधी खुप मिठ असते.
तेंव्हा तेल, मिठ या दोन्हि गोष्टी जपुन, चव पाहुन घालाव्यात.
-हे लोणचे जरी असले तरी टिकाऊ नाही. रेग्युलर चिकन प्रमाणे लगेच संपवा

माहितीचा स्रोत: 
टी. व्ही. वरचा कार्यक्रम
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो चिमुरी. खुप सोप्पी, आणी चविष्ट आहे ही पाकॄ.
लोणच्याचे चिकन नाही केले बर झालं>>..:)
धन्स सस्मीत

छान पाककृती.
हे चिकनचे लोणचे मी हरयाणात कर्नाल इथे असताना खाऊन पाहीलेले, चव अगदि भन्नाट होती. आपल्या समोरच बनवून देतात.
आता 'गटारी अमावस्येला तोंडी लावायला(चकन्याला) बनवावे लागेल. Wink

धन्यवाद.