पुणे अचानक फ्लेक्सविरहीत झाल्याने जनतेत एकदम गोंधळ निर्माण झालेला आहे. एकतर कोण थोर नेत्यांचे वाढदिवस आहेत, कोण कोणाचे प्रेरणास्थान, स्फुर्तीस्थान आहे, कोणाची कोणत्या समितीवर निवड झाली वगैरे मौल्यवान बातम्या मिळत नाहीत. अचानक काही स्पर्धा घोषित होउन काही नेत्यांची नावे त्यासंबंधीच्या फलकात दिसू लागली आहेत पण त्यात रंगीतसंगीत फ्लेक्सची मजा नाही. त्यामुळे गॉगल घालून, दाढ्या वाढवून, फेटे बांधून, बीयर गाल वाढवून, गंध लावून स्वतःचे फोटो काढणार्यांचीही संख्या कमी झाली आहे. तसेच कोठेतरी जाताना कार्यकर्त्यांना हात दाखवत असलेल्या पोजमधलेही. दहावीच्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेच्या खांबावरच्या छोट्या बोर्डवरच्या गुणवत्ता यादीत झळकावे की रस्त्याच्या बरोबर मधे "निवडून आल्याबद्दल अभिनंदन" मधे झळकावे हा "करियर" प्रश्न पडेनासा झाला आहे.
त्यामुळे यातून कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे त्यावर उपाय म्हणून एक शहराबाहेर फ्लेक्स थीम पार्क करावे अशी विनंती करतो. लोक नक्कीच पैसे देऊन बघायला जातील.
तेथील सोयी व इतर आयडिया जेवढ्या सुचल्या तेवढ्या मांडत आहे. जाणकार वाचकांना आणखी भारी सुचतीलच.
पार्किंगः पार्किंगचा प्रत्येक स्टॉल एका आजीमाजी नेत्याच्या, नगरसेवकाच्या नावाने. पार्किंग मधून थीम पार्क मधे नेणार्या शटल्स ना सतत पार्टी बदलणार्या नेत्यांची नावे द्यावीत.
थीम पार्क च्या आतमधल्या राईडस साठी तर भरपूर आयडिया आहेत. नमुन्यादाखल २-३ देत आहे. :
१. पार्टीवाईज राईड्सः त्यात त्या त्या पार्टीतील दिग्गजांचे फ्लेक्स. राईडमधे ब्याकग्राउंडला सिग्नेचर म्युझिक.
काँग्रेस: सुरूवातीला एक गायवासरू व नंतर नुसते रामसेस्टाईल पंजे. वैष्णवजन भजन ज्या सर्वात बेसुर्या गायकीत उपलब्ध आहे ती टेप.
भाजपः एक 'फलकविहार यात्रा' किंवा असेच काहीतरी संस्कृत (व संस्कृती)प्रचूर नाव. बाजूला पाण्यात थोडी कमळे व थोडी दलदल.
सेना: वाघाच्या डरकाळ्या. सुरूवातीला मराठीतून व नंतर हिन्दीतून समालोचन. नंतर सेनेच्या राईडमधून फुटून निघणारी मनसे ची राईड.
मनसे: फक्त खळ्ळ खट्याक ब्याकग्राउंड व राईडच्या मधे एक टोल बूथ जो प्रत्येक राईडला फुटेल व पुन्हा उभा राहील.
२. मेक युअर ओन फ्लेक्सः
चेहर्याची जागा मोकळी ठेवलेले -निवडून आल्याबद्दल अभिनंदन पासून ते दु:खद निधन ते पहिली पुण्यतिथी पर्यंत चेहराविरहीत फ्लेक्स. म्हणजे मागे आपण जाऊन आपला चेहरा तेथे दिसेल असे उभे राहून फोटो काढायचा. चेहर्यावरचा टर्रेबाज पणा दाखवणारा मेकअप, बीयर गाल (विजयराज सुद्धा मोहनलाल दिसेल एवढे), दाढी, गंध, सोनेरी फ्रेमचा गॉगल, इतर दागिने वगैरे तेथेच भाड्याने मिळेल.
३. फ्लेक्स म्युझियमः
यात महाराष्ट्रातील ठिकठिकाणी जे वैविध्यपूर्ण फ्लेक्स लावलेले असतात त्याचा संग्रह. उदा: झब्बा लेंगा घालून, सोन्याचे घड्याळ मिरवत गॉगल लावून सिंहासनावर बसलेला कोणी बंटीशेठ, ज्याचे नाव समजत नाही पण आडनाव एकदम ओळखीचे असते, मोटरसायकलवरून कोठेतरी निघालेले कोणीतरी दादा, थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंबरोबर बिनदिक्कतपणे आपला फोटो लावलेले कोणी भाऊ, दहीहंडीच्या फ्लेक्सला खाली ४०-५० फुटकळ कार्यकर्त्यांची नावे, मधे जरा वट असलेले ८-१० कार्यकारी सभासद व वरती लोणी खाणारा मुख्य नेता असा प्रतिकात्मक फ्लेक्स ई. गोष्टी ठेवता येतील.
अजून काही कल्पना विचाराधीन आहेत. आपणही सुचवा
फारेण्डा, साष्टांग हे तुलाच
फारेण्डा, साष्टांग
हे तुलाच सुचू जाणे!
फेबुवर शेअर करतेय...
चेहर्यावरचा टर्रेबाज पणा
चेहर्यावरचा टर्रेबाज पणा दाखवणारा मेकअप, बीयर गाल (विजयराज सुद्धा मोहनलाल दिसेल एवढे), दाढी, गंध, सोनेरी फ्रेमचा गॉगल, इतर दागिने वगैरे तेथेच भाड्याने मिळेल. >>

आवडलं फ्लेक्स थीम पार्क.
सॉलीड!!! फ्लेक्सवरच्या
सॉलीड!!!
फ्लेक्सवरच्या गाढवाला शेपुट, माकडाला शेंडी लावा.
बीयर गाल..आणिक काय काय
बीयर गाल..आणिक काय काय

फारेण्ड.. ___/\___ सॉलिड आहे फ्लेक्स थीम पार्क!!!
फ्लेक्स म्युझियमः ची कल्पना
फ्लेक्स म्युझियमः ची कल्पना छान.
इथे एका नेत्याच्या वाढदिवसाला एक फ्लेक्स लागल्यावर एका धाडसी व कल्पक व्यक्तीने त्याशेजारी त्या व्यक्तीच्या कुत्र्याच्या वाढदिवसाचा फ्लेक्स लावला. त्यात मुख्य भागात नेत्याचे असते तसे एका कुत्र्याचे
भव्य चित्र व गुणवर्णन. त्याखालील ओळीत नेत्याच्या शुभचिंतकांचे असतात तसे विविध प्रकारच्या कुत्र्यांचे छोट्या वर्तुळात फोटो होते. प्रत्येक वर्तुळाखाली बंटी, सायबर, खैबर, लायका अशी नावे.
सर्वात खालील वाक्य होते.
आमच्या टायगरच्या वाढदिवसाला सर्वांनी यायचं बरं !
आता नेत्याच्या फोटोशेजारी जवळ्जवळ त्याच डिझाईन्चा फ्लेक्स म्हणजे 'आ बैल मुझे मार'!
अपेक्षेप्रमाणे त्या फ्लेक्स ची गती झाली त्यामुळे म्युझियमसाठी तो उपलब्ध नाही . पण जर कोणी फ्लेक्स्चा इतिहासही लिहिणार असेल तर त्याने या आगळ्या वेगळ्या फ्लेक्सची नोंद करावीच.
(No subject)
भारी. मुं. ठाणे कधी फ्लेक्स
मुं. ठाणे कधी फ्लेक्स मुक्त होणार? जागोजागी लटकवलेले इतक्या मोठ्या आकाराचे भयानक चेहेरे पाहुन धडकीच भरते
हा हा, हे भारी आहे (ते
हा हा, हे भारी आहे
(ते सोन्याचे दागिने घालूनही असतात फोटू)
कल्पना आवडलीच
बाप्रे जबरी ते फ्लेक्स
बाप्रे जबरी


ते फ्लेक्स म्युसियम १ ते ४ बंद राहील तेवढी तळटीप राहिली
मेक युअर ओन फ्लेक्सः >>>>
आमचा मोती, आमची मनी, आमचा
आमचा मोती, आमची मनी, आमचा राघू असे पाळीव प्राण्यांचे फ्लेक्स हवेत ना ? शिवाय फ्लेक्सचे बाकी उपयोग !!!
भारताची अर्थव्यवस्था कोलमडली
भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कामं मिळंना झाली.
त्यात तुम्ही फ्लेक्स बी नको म्हणता, प्रिंटिंगच्या बिझनेसवाल्यांना जगू देत नाय तुम्ही राव!
जबरीच.
भन्नाट आयडिया !! मनपाला कळवा
भन्नाट आयडिया !!

मनपाला कळवा
अंगावर दागिने घालून फोटो लावण्याची सोय असलेले फ्लेक्स
याच धर्तीवर एक पुतळे पार्कही
याच धर्तीवर एक पुतळे पार्कही करावे अशी विनम्र सूचनावजा विनंती आहे! समस्त धूळ खात पडलेले, कावळे-कबूतरे-कुत्र्या-मांजरांच्या पदखुणांनी पुनीत झालेले, तारांच्या / ब्यानरांच्या / अतिक्रमणाच्या इत्यादी भक्ष्यस्थानी पडलेले पुतळे पार्कात माहिती + मनोरंजन + कलाभ्यासाचे व उद्बोधनाचे काम रस्त्याच्या ट्राफिकमध्ये अडथळा येऊ न देता साध्य करतील!
वरती लोणी खाणारा मुख्य
वरती लोणी खाणारा मुख्य नेता>>>

भारी आयडिया आहे, फ्लेक्स थीम
भारी आयडिया आहे, फ्लेक्स थीम पार्क
आता अशा या फ्लेक्स थीम पार्क च्या जाहिरातींचे, कि.मी. अंतराचे, त्यासाठीच्या शुभेच्छुकांचे दाढी-गॉगल, सोन्याचे दागिन्यांमध्ले फ्लेक्स रस्त्यारस्त्याला लागले नाहीत म्हणजे मिळवले 
सोनेरी नेतृत्व !
सोनेरी नेतृत्व !
छळवाद आहे खरंच.
छळवाद आहे खरंच.
(No subject)
(No subject)
आयडिया क्र.२ सर्वात भारी आहे
आयडिया क्र.२ सर्वात भारी आहे !!
(विजयराज सुद्धा मोहनलाल दिसेल
(विजयराज सुद्धा मोहनलाल दिसेल एवढे>>> फुट्लो
फ्लेक्सवरील माजोर्डा 'लूक' अचूक येण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे!
ते फेअर अॅन्ड लव्हलीच्या
ते फेअर अॅन्ड लव्हलीच्या जाहीरातीसारखे फ्लेक्स राहीले की ज्यात व्यक्तिचा फोटो ३ शेडसमध्ये देतात. कृष्ण्वर्ण ते श्वेतवर्णाच्या छटा ज्यात उजळलेला चेहरा हा थोडा मोठा दाखवीला जातो. जेणेकरुन लोकांनी विरुद्ध क्रमाने बघु नये..:)