Submitted by प्राजु on 5 July, 2012 - 01:28
माणसातच आज ना माणूस कोठे सापडे
चालती तिरक्याच चाली .. माणसे की खेकडे!
सूड दंगे, खून-खटले, जाहले हे रोजचे
का बरे लोकांस आहे शांततेचे वावडे?
आंधळी ही न्याय देवी, दोष ना काही तिचा
दुर्जना हाती खवा अन सज्जनाला जोखडे
जागृती करतात हत्या रोखण्या गर्भातली
पण खरे की श्वान शेपुट वाकडे ते वाकडे
पेटुनी आता उठावे वाटते कित्येकदा
पण पुन्हा ओढून घेते सभ्यतेची झापडे
पावसा तूही असा का राज्यकर्त्यांसारखा?
आस लावूनी जिवाला ठेवसी तू कोरडे
देश प्रगतीच्या पथावर सांगना जावा कसा
ठेवली तारण मती जर धर्म-जातींच्याकडे!
माणसा माणूस हो! हे कळकळीचे सांगणे
अन्यथा या भूवरी उरतील केवळ माकडे
-प्राजु
गुलमोहर:
शेअर करा
वा, अप्रतिम...... जमलीये
वा, अप्रतिम...... जमलीये अगदी....
खूपच आवडली ही गजल.
एकदा खेकडे म्हटल्यावर पुन्हा
एकदा खेकडे म्हटल्यावर
पुन्हा माकडे
नाही पटले
निदान शेवटच्या ओळी कोणातरी घाला साकडे
पेटुनी आता उठावे वाटते
पेटुनी आता उठावे वाटते कित्येकदा
पण पुन्हा ओढून घेते सभ्यतेची झापडे>>> वा, सुंदर
पावसा तूही असा का राज्यकर्त्यांसारखा?
आस लावूनी जिवाला ठेवसी तू कोरडे>>> छान
शुभेच्छा प्राजू
छानै.
छानै.
मस्तये....आवडली....
मस्तये....आवडली....
माणसा माणूस हो! हे कळकळीचे
माणसा माणूस हो! हे कळकळीचे सांगणे
अन्यथा या भूवरी उरतील केवळ माकडे
एकदम खणखणीत !!
मस्स्त गझल!
क्या बात! क्या बात!! क्या बात
क्या बात! क्या बात!! क्या बात !!!
खूप आवडली
खूप आवडली
आशय गझलेच्या प्रकृतीला
आशय गझलेच्या प्रकृतीला मानवणारा नाही असे वाटले.