एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधाने आता अलिप्त रहायला हवंय, जिथं सगळं मनातलं सांगितल्यानंतर इतके परकेपणाने त्याने हात सोडवून घेतलाय, तिथे हिनेही फर्म आणि स्ट्राँग रहायलाच हवंय.
घनाच्या हाती धुपाटणे उरणार, हे बाकी खरं!

अरे वा! घना पण आला वाट्तं या बाफ वर........... अरे घना, येरे घना, असा निराश होऊ नकोस रे, कैच्याकै प्रतिक्रिया नाहीत काही या... सगळ्यांचं या सिरियलवरचं प्रेम बोलतं आहे हे... हे पण नाहीच ना कळलं तुला? वाटलंच होतं Proud

माधव, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय म्हणूनच सगळं काही स्वच्छ सांगून टाकायला हवं होतं असं माझं मत आहे. असो. हेमावैम.

>>आजही घराघरात तिशीनंतर मुलींनी प्लॅनिंग करु नये, वेळेवर मुलं जन्माला घालावीत असाच विचार दिसतो आणि पालक त्यावरुन प्रेशर आणतात.

पण आपली मुलं आईवडील व्हायला त्यांची मानसिक तयारी आहे की नाही ह्याचा विचार ते करत नाहीत. लहान मुलं म्हणजे बाहुल्या नव्हेत की वेळ घालवायला उचलून घेतली आणि मग कपाटात ठेवली. एका आयुष्याचा प्रश्न आहे तो. आपली मुलं आपली स्वप्नं पुरी करायला जन्माला आलेली नाहित हे ह्या आईवडिलाना कधी कळणार? मुलं जन्माला घालायची की नाही, कधी आणि किती हा त्या जोडप्याचा प्रश्न आहे. समाजात चाललं आहे तेच दाखवायचं असेल तर ते आपल्या डोळ्यांनाही दिसतंच आहे की, त्यासाठी सिरियली कशाला हव्यात? घनाच्या बाबानी हे त्याच्या आईला समजावून सांगितलेलं दाखवायला हवं होतं. असो. माझा कालचा एपिसोड मिसला पण फार काही मिसलं नाही असं दिसतंय

एक प्रश्न डोक्यात आलाय, विचारतेच - घनाच्या मैत्रिणीने 'यू डिझर्व्ह टू बी इन नासा' किंवा 'यू डिझर्व्ह टू हॅव सिक्स पॅक्स' असं म्हटलं असतं तर घनामाऊलीने काय केलं असतं?

'यू डिझर्व्ह टू बी इन नासा' किंवा 'यू डिझर्व्ह टू हॅव सिक्स पॅक्स' असं म्हटलं असतं तर घनामाऊलीने काय केलं असतं? >> पहिल्याचं उत्तर नाही माहित पण दुसर्‍या केसमध्ये घनामाउलींनी काही नसते केले. फक्त राजवाड्यांनी स्वजोच्या जागी उकाला घेतले असते - घनाच्या भूमीकेकरता. मग घना म्हणाला असता -'कसा होणार जाडा? सांग ना कसा होणार जाडा? जिला पॅक्स बनवायचं वचन दिलं तीच पत्त्याच्या पॅकसारखं टाकून गेली मला' Happy

स्वप्ना असा कसा मिसलास तू कालचा एपिसोड?
मला त्या इलाकाकुंच्या ड्राम्याबद्दल तुझ्या प्रतिक्रियेची प्रचंड उत्सुकता होती
ते काही नाही.. जा बघुन ये पटकन आणि लिही इथे येऊन
हे अस चालत नाही बर का.. उद्या पासुन एपिसोड मिसत जाऊ नकोस अजिबात Proud

कोणीतरी इला भाटेंच्या कॅरेक्टर ला समजवा.......नाही समजले तर कानाखाली जाळ काढा............:राग:
इतका मुर्ख पणा नाही शोभुन दिसत....
बाबा आणि आई यांचा संवाद प्रचंड मुर्खपणा आणि तद्दन फालतुगीरी या प्रकारात मोडणारा होता.... इतके कसे फालतु लोक असतील...???????????????????????
.
.इलाभाटेला काढुनच टाका आता ..........बस अतीझाला मुर्खपणा........त्यापेक्षा मिस्टर बिन चे शो बघत जाउ

इला भाटेला बोलतांना पाहिले की अशोक नायगावकरांची का कोण जाणे पण आठवण येते. भयानक लाडीक बोलते ही बाई. ओव्हर करते. असंभव मध्ये जेवढी बरी वाटली तेवढी यात बोअर वाटली.

आता घना पण आला का माबोवर.

येरे घना येरे घना, गिटार वाजव घण्णा घण्णा ...

मि.बीन्...:फिदी:

मी मिसलेल्या एपिसोडांमधे येऊन गेलेलं दिसतंय
>>>>>>>>>

नी + १२१

आणि परदेशात राहिल्याशिवाय आपल्याला काय ते नेटवर एपिसोड पाहायची सवय लागणे अशक्य. Proud

मग घना म्हणाला असता -'कसा होणार जाडा? सांग ना कसा होणार जाडा? जिला पॅक्स बनवायचं वचन दिलं तीच पत्त्याच्या पॅकसारखं टाकून गेली मला >>>>>>> Lol

राधाने आता अलिप्त रहायला हवंय, जिथं सगळं मनातलं सांगितल्यानंतर इतके परकेपणाने त्याने हात सोडवून घेतलाय, तिथे हिनेही फर्म आणि स्ट्राँग रहायलाच हवंय.
>>>>>>>>>>>>>>>>>>>

Proud म्हणूनच म्हटलं होतं मागे की आधीच्या कॅरॅक्टरमध्ये आणि आताच्या अमूलाग्र बदल दाखवलाय. प्रत्यक्षात एवढा ड्रास्टिक चेंज होत नाही Happy

प्रत्यक्षात एवढा ड्रास्टिक चेंज होत नाही>>>>>>>>>>>>> अनुभव बोलतोय........?
>>>>>>>>>>>>

उदयन अनुभव कशाला... दोन्ही डोळे उघडे ठेवून फिरलं की येतं लक्षात Wink Happy

चटका बसल्याशिवाय आग ओळखता यायला हवी Proud

प्राची + १.
आणि परदेशात राहिल्याशिवाय आपल्याला काय ते नेटवर एपिसोड पाहायची सवय लागणे अशक्य.
>>> नेटवर एपिसोड्स पाहिले की नको ते सीन्स FF करता येतात आणि हवे ते पुन्हा पुन्हा कितीही वेळा बघता येतात. बघ विचार करुन Proud

चटका बसल्याशिवाय आग ओळखता यायला हवी>>>>>>>> मी सध्या चटका ओळखतोय........... सवय झाली की आग सुध्दा ओळखु लागेल........ Lol

नेटवर एपिसोड्स पाहिले की नको ते सीन्स FF करता येतात आणि हवे ते पुन्हा पुन्हा कितीही वेळा बघता येतात. बघ विचार करुन>>>>>>>>>>>>>>> मी इला भाटे आली की लगेच पुढे धकलतो.....भले कितीही महत्वाचा सीन्स का असेना तो Lol

आणि परदेशात राहिल्याशिवाय आपल्याला काय ते नेटवर एपिसोड पाहायची सवय लागणे अशक्य.<<<
पाह्यले असते ते पण माझ्याकडे अंबानीचं महागडं इंटरनेट आहे. टिव्हीवर लागतो एपिसोड तेव्हाच बघणे परवडते मला. Happy

पण माझ्याकडे अंबानीचं महागडं इंटरनेट आहे

ह्म्म.. तुझ्याकडे मटेनिली घेता येणार नाही का? टेलेफोनशिवायही देतात वाटते ब्रॉडबँड..
मी ६०० रुपये देते, मग २४ तास लॉगिन करुन बसा.. सगळे अनलिमिटेड ... फक्त तेवढा वेळ मिळत नाही.. Happy

Pages