"सूनबाई"

Submitted by स श्वेता on 3 July, 2012 - 08:56

"सूनबाई"

वहिनी-वहिनी, नणंद दिरांचा लळा,
हिरव्या पैठणीवर सजल्या सुंदर मोत्यांच्या माळा,
पाय कोवळा घरात पडला,आणि "सूनबाई" शब्द मनी दडला,

लाजू,हसू,रुसू कि बसू !
गोंधळ काही थांबेना,
झरकन वळली मान,
जेव्हा "पोरी" आवाज कानी पडला,
"सासूबाई" शब्द ओठातून माझ्या फुटला.

कधी मिठाई चा गोडवा,तर कधी मिरचीचा ठसका,
कधी मायेचा ओलावा ,तर कधी परके पानाचा धसका.
आनंदाच्या सरीत कधी भिजून चिंब,
तर कधी रागाने अगडबंब.

आनंदाने घराण्याचा मान मात्र मी मिरवला,
अवखळपणा माझा तेव्हाच कोठेतरी हरवला.
मोगऱ्याचा सुगंद आणि चिंचेचा आंबट पणा, मी इथेच अनुभवला.
कोवळा पाय माझा नकळत घट्ट रोवला गेला.
आणि नवी,नवखी म्हणता म्हणता...
हा संसार माला माझाच वाटू लागला.

गुलमोहर: 

वाहिनी-वाहिनी,टायपो सांभाळा,
हा संसार माला माझाच वाटू लागला.>>>हे जरुरी होतं,नाहीतर मी आणि माझा नवरा हाच संसार असतो नव्या नवरीचा.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!

टायपो ठीक केला आहे..सांगितल्या बद्दल मनापासून आभार.