Submitted by प्राजु on 3 July, 2012 - 00:12
कसे म्हणावे नशीब हे फ़ळफ़ळते आहे
उथळ सुखांच्यासवे जरा खळखळते आहे!
नव्हते ठरले कधी आपुले भेटायाचे
कशास मी त्या पाराशी घुटमळते आहे?
थुंकुन देता आयुष्याला नशिबावरती
हळू हळू ते आता थोडे कळते आहे
मन्मानीला लगाम त्यांच्या घालू जाता
नात्यांमधली गोडी का साकळते आहे??
पुरुषासाठी जन्म पणाला नारी लावे
येत तटाशी लाट सुधा आदळते आहे!
आज-उद्याला अथवा परवा येशिल तू रे
पावसा बघ वेधशाळा गोंधळते आहे!
आयुष्याची भुकटी भुकटी होउन गेली
जणू वेदना जात्यावरती दळते आहे
'प्राजू' का ना कधीच धरली खपली त्यावर?
जखम कधीची अजूनही भळभळते आहे!
-प्राजु
गुलमोहर:
शेअर करा
छान नेहमीप्रमाने
छान
नेहमीप्रमाने सुंदर.......
आयुष्याची भुकटी भुकटी होउन
आयुष्याची भुकटी भुकटी होउन गेली
जणू वेदना जात्यावरती दळते आहे>>>>>> वा
गझलही एकंदर मूड सांभाळणारी आहे
मस्तच....!!
मस्तच....!!
छानच.
छानच.
आयुष्याची भुकटी भुकटी होउन
आयुष्याची भुकटी भुकटी होउन गेली
जणू वेदना जात्यावरती दळते आहे
'प्राजू' का ना कधीच धरली खपली त्यावर?
जखम कधीची अजूनही भळभळते आहे!
दोन्ही शेर अफाट.
सगळे शेर आवडले पावसा बघ
सगळे शेर आवडले
पावसा बघ वेधशाळा गोंधळते आहे!>>>>>या ओळीत जरा लयीत वचताना अडखळलो
मस्स्त !!
मस्स्त !!
मस्त
मस्त
छान गझल...
छान गझल...
नव्हते ठरले कधी आपुले
नव्हते ठरले कधी आपुले भेटायाचे
>>> नव्हते ठरले कधीच अपुले भेटायाचे?
गझल छान आहे.. मतला ही
गझल छान आहे..
मतला ही आवडला..
'नव्हते ठरले कधी आपुले भेटायाचे
कशास मी त्या पाराशी घुटमळते आहे?'
सुंदर...
'पुरुषासाठी जन्म पणाला नारी लावे
येत तटाशी लाट सुधा आदळते आहे!'
वरील शेरात 'येत तटाशी' असा सलग दोनदा 'त' चा उच्चार आल्याने गुणगुणताना किंचितसे अडखळायला होते आहे..
'पावसा बघ वेधशाळा गोंधळते आहे!'
या मिसऱ्यात मात्र जरी सारख्या असल्या तरी 'गागागागा गागागागा गागागागा' असे खंड पडत नसल्याने मिसरा लयीत वाचता येत नाहीये..
बाकी सगळे छान.
शुभेच्छा.
भुकटीचा शेर आवडला. बाकी
भुकटीचा शेर आवडला.
बाकी बर्याच शेरातले सुटे मिसरे आवडले.