Submitted by सुधाकर.. on 1 July, 2012 - 12:24
येता भरुन आभाळ
उठे शब्दांचे वादळ
घुंगूरले मन होय व्याकूळ व्याकूळ.
सारे कल्पनेचे भास
तरी लागते का आस ?
रंगवेडी सांज होते उदास उदास.
वारा खेळे अंगणात
बोले पाखरु तृणात
कोकीळेच गाणं हिरव्या पानात पानात.
काजळले निळे पाणी
थरारली पापणी
आठवते जुने काही पुन्हा फ़िरुन फ़िरुन.
जेंव्हा उतरली रात
हले चांदणे पाण्यात
देई मोर केका दूर बनात बनात.
घुमे घुबड रानात
भरे काहूर मनात
दडुनीया गेली सांज खोल पाण्यात पाण्यात.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ऑर्फीअस यांची ही कविता सांज व
ऑर्फीअस यांची ही कविता सांज व रातीचेही अतिशय सुंदर वर्णन करते. इतके सुंदर की "आत्ताच्या आत्ता मला असली सांज दे" असा कुणाकडे तरी हट्ट धरावासा वाटतो. मयुरांच्या नर्तनात जेव्हा रात हळूहळू जळात उतरते तेव्हा आकाशातल्या चांदण्या पाण्यात हलतात ही कल्पना व तदनुषंगाने डोळ्यांपुढे उभे रहाणारे दृष्यच किती विलक्षण सुंदरतेचं आहे. एकीकडे, भरून आलेल्या आभाळाच्या साक्षीने कवीच्या मनात शब्दांचे वादळ ऊठत असताना रंगवेडी सांज मात्र उदास होत रहाते. वाचता वाचता कवीबरोबर रसिकांचेही मन व्या़कूळ करते. सुंदर प्रतिमांच्या सान्निद्ध्यात आपलीही संध्याकाळ मनोरम बनत चालली असतानाच शेवटच्या कडव्यातलं घुबडाचं घुमणं जीवाचा थरकाप करतं. सुकोमल संध्येला खोल पाण्यात दडवतं.
संपूर्ण कवितेत सामान्य वर्तमानकाळ वापरला असताना फक्त चौथ्या कडव्यात भूतकाळाची क्रियापदे जरासा रसभंग करतात; तसेच 'वदळ' हा टायपो (?).
कविता अतिशय आवडली.
मस्तच्,आवडली.
मस्तच्,आवडली.
<<<< भरे कहूर मनात >>>> काहूर
<<<< भरे कहूर मनात >>>> काहूर असे पाहिजे ना.
बाकी उत्तमच.....
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
मस्त कविता, आवडली
मस्त कविता, आवडली
मस्त मस्त कविता...........मन
मस्त मस्त कविता...........मन सांज आठवनिंनी ओलं झालं अगदी.........
शामली- योगुली तुमचे ही खुप
शामली- योगुली तुमचे ही खुप खुप आभार
मस्त रे ऑर्फी......... खूप
मस्त रे ऑर्फी.........
खूप छान रे .
धन्यवाद वैभवा.
धन्यवाद वैभवा.