पाऊसव्यथा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

भेगाळल्या डोळ्यांमधे
आता उरेना टिपूस
आटून गेली आसवे
कधी पडेल पाऊस?

नभ ना आता काजळे
फिकुटली शेतेभातें
धरतीचे आभाळाशी
जणु उरले ना नाते

तोंडचे पळाले पाणी
कोरडले नदी नाले
जीवनाचे थेंब सारे
असे का परके झाले?

विषय: 
प्रकार: