उदास रात्र पडकी हवा
खळ्यात हरवलेला चंद्र
नजर फिरत राहते उगाच
नभी हसती प्रकाशसर्प
दृष्टीभ्रम म्हणावा हा .. कि मेघांची अंदाधुंदी
काळोखाच्या कप्प्याकप्पात.. रात्रीची नजरबंदी
एकेक कप्पा निरखत जातो
उलगडतात चोरकप्पे
कुठे गुहा, कुठे लेणी..
सताड उघडे अंधारटप्पे
मागे पुढे उभा माझ्या .. काळाकभिन्नसा कातळ
अंधारातून उतरतेस तू.. जसं ओघळणारं काजळ..
अंधुरका आकार होतो
सुबक सुंदर दाटत जातो
मनकुंचला, मनःपटल
उमटत जाते चित्रकमळ..!
ते रात्रीचं चालत राहणं..
तुझं मनात उतरत जाणं..
तुझे श्वास, तुझे स्पर्श....ओठात विलगणारं हासू ,
तुझे भास, तुझी स्वप्नं.....एक ओघळणारा आसू
अंधाराचा देखावा विरतो
आवंढा एक दाटत जातो
डोळे हळु ओझल होतात
तारे मंद होत जातात
गालावर टप्पोरे थेंब
आठवांत मी ओलाचिंब !!
कुठुनशी एक झुळुक येते, शिरशिरणारी कळ उमटते
रात्र निरभ्र होत जाते, मळभ दूर होत असते........!
झिम्माड ता-यांभोवती आता,
चांदण्यांचा पिंगा असतो
दबा धरून लपलेल्या,
सर्पांचाही दंगा असतो .
नजर मग मन होते, अंधाराला भेदत जाते
चिरून सा-या देखाव्याला, एकच झाड उंच जाते...
- Kiran
(No subject)
छान....... ते रात्रीचं चालत
छान.......
ते रात्रीचं चालत राहणं
तुझं मनात उतरत जाणं..
तुझे श्वास, तुझे स्पर्श....ओठात विलगणारं हासू ,
तुझे भास, तुझी स्वप्नं.....एक ओघळणारा आसू
हे मस्तच्.............आवडले.........
एक जबरदस्त अस्वस्थ करणारा भाव
एक जबरदस्त अस्वस्थ करणारा भाव कवितेतून प्रभावीपणे व्यक्त झालाय.
योगुली थँक्स ! उकाका .. कविता
योगुली थँक्स !
उकाका .. कविता धन्य झाली !
( एक टायपो ठीक केला फक्त... बदल नाही केलेला )
एक जबरदस्त अस्वस्थ करणारा भाव
एक जबरदस्त अस्वस्थ करणारा भाव कवितेतून प्रभावीपणे व्यक्त झालाय. >> + १
छान
छान
(No subject)
छान किरन
छान किरन
छानच!!!
छानच!!!
किरण, जबर्या रे ! काय सही
किरण, जबर्या रे ! काय सही उतरवली आहेस ही उदास हुरहुरणारी रात्र.
एक जबरदस्त अस्वस्थ करणारा भाव कवितेतून प्रभावीपणे व्यक्त झालाय. >> अगदीच.
मित्रांनो धन्यवाद रे
मित्रांनो धन्यवाद रे तुम्हाला
माऊ.. तुझी दाद स्पेशल असते. बरं वाटतं नक्कीच
(No subject)
मस्तच,आवडली. तुझे श्वास, तुझे
मस्तच,आवडली.
तुझे श्वास, तुझे स्पर्श....ओठात विलगणारं हासू ,
तुझे भास, तुझी स्वप्नं.....एक ओघळणारा आसू>>>.
<<<तुझे भास, तुझी स्वप्नं.....एक-एक ओघळणारा आसू
कविन, विभाग्रजजी आभारी आहे..
कविन, विभाग्रजजी
आभारी आहे..
_/\_
_/\_
किरण जी , कविता आवडली.
किरण जी ,
कविता आवडली. तुमच्या दृपाल्ची आरती ह्या कवितेतील दृपाल ह्या शब्दाचा अर्थ मला माहिती नाही. कृपया सांगाल का?
वैवकु शिल्पा -- धन्यवाद (
वैवकु
शिल्पा -- धन्यवाद
)
( अवांतर : दृपलचं नेमकं उत्तर मला देता आलं नसतं, त्याच धाग्यावर कुणीतरी त्याचं उत्तर दिलंय. माझ्यासाठी मायबोली हे संस्थळ जेव्हां बंद पडतं तेव्हां "दृपल /दृपाल " हा मेसेज दिसतो इतकाच अर्थ त्याचा
दृपाल हे प्रत्यक्षात Drupal
दृपाल हे प्रत्यक्षात Drupal आहे. ती कम्प्युटरवरील एक प्रभावी Content Management System आहे, व या सॉफ्टवेअरवरच आपल्यासारख्या ब-याचशा 'साहित्य व्यवस्थापन' वेबसाईट्स चालत असतात.
किरण.. क्या रे एकदम सिरिअस
किरण.. क्या रे एकदम सिरिअस ??
अस्वस्थ करून सोडणारी कविता.. खरंच!!
माहिती सांगितल्याबद्दल
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
शिल्पातै दृपलची चौकशी इथे
शिल्पातै
दृपलची चौकशी इथे कशासाठी हे कळाले नाही. कधी कधी एखादी शंका अनुत्तरीत राहू शकते. कारणे अनेक असतात. त्यासाठी प्रत्येक धाग्यावर त्या शंकेचा पाठपुरावा करण्याची गरज नाही. त्यासाठी विचारपूसची सोय आहे. त्या आधीच्या धाग्यावर तुम्हाला उत्तर दिलं गेलंय हा खुलासा इथे केला गेलाय. अशा प्रकारच्या प्रतिसादांनी आपली कविता वर यावी हे प्रत्येकालाच आवडेल असं नाही. कृपया या प्रतिसादावर पुन्हा चर्चा नको.
किरण - या अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व !
किरण्या, हुरहुरणारी रात्र छान
किरण्या, हुरहुरणारी रात्र छान व्यक्त झालीये.
चिरून सा-या देखाव्याला, एकच झाड उंच जाते... >>> शेवटच्या ओळीने कवितेला एक वेगळीच उंची मि़ळतेय.
"ओझल" हा हिंदी शब्द जरा खटकतोय! ओझल चा अर्थ धूसर ना?
वर्षु तै... ये भी मूड मंगता
वर्षु तै... ये भी मूड मंगता है
थँक्स 
निंबुडा
खरंय तुझं...
ही कविता व्हॅन गॉगच्या स्टारी नाईट्सचा परिणाम आहे. हे चित्र कांढताना त्याची मनःस्थिती कशी असेल ? काय विचार असतील मनात ? कसली वादळं असतील याचा हा काव्यमय विचार.
छान नभी हसती प्रकाशसर्प वा,
छान
नभी हसती प्रकाशसर्प
वा, उपमा आवडली
-ही कविता व्हॅन गॉगच्या
-ही कविता व्हॅन गॉगच्या स्टारी नाईट्सचा परिणाम आहे. हे चित्र कांढताना त्याची मनःस्थिती कशी असेल ? काय विचार असतील मनात ? कसली वादळं असतील याचा हा काव्यमय विचार.
ग्रेट. किरण, हे कळल्यावर कविता अधिकच भावली कारण माझंही हे आवडतं चित्र.इथे संदर्भ म्हणून द्यायचा मोह आवरत नाही.माबोवर आले तेव्हा माझा फोटो म्हणून दिलं होतं :)) !!
(No subject)
भारतीताई, धन्यवाद या
भारतीताई, धन्यवाद या चित्राबद्दल
.
.
सर्व वाचकांचे मनापासून आभार.
सर्व वाचकांचे मनापासून आभार.
मस्तय...!
मस्तय...!
Pages