मेणबत्ती

Submitted by अनुराधा म्हापणकर on 30 June, 2012 - 02:45

तसं पसंत होतं मला
असं मेणबत्ती होऊन जगणं
तसं फारसं होतंच कुठे
माझं आयुष्याकडून मागणं

तुझ्यापुरतं पेटणं
तुझ्यापुरतंच पेटून उठणं

तू..
तू हवं तेव्हा काडी लावलीस
तू..
तू हवं तेव्हा मला पेटवलंस
आणि तुला नको वाटलं तेव्हा
माझं अस्तित्व तू मिटवलंस

जळताना कळतं होतं
कळताना जळतंही होतं
"मी" ... संपतेय....
"मी" ........... संपतेय ... !!

माझ्या प्रकाशाने तुला उजळवणं
हेच माझं प्राक्तन..
कारण माझा जन्मच मेणबत्तीचा !
.
शेवटी ..
कुणाचे डोळे दिपवून टाकायला
मी सूर्य थोडीच होते ???

वाटलं ते इतकंच..
वा-यावादळाततरी माझ्याभोवती
तुझ्या हातांची ओंजळ धरली असतीस तर !!

अनुराधा म्हापणकर

गुलमोहर: 

वाटलं ते इतकंच..
वा-यावादळाततरी माझ्याभोवती
तुझ्या हातांची ओंजळ धरली असतीस तर !! >>>> अप्रतिम...

तुमच्या कविता विशेषच असतात, अनुराधाजी...

आवडली !